नवीन लेखन...

जयदेव- एक दुर्दैवी संगीतकार

 

एक दावा काही लोकं कायम करतात कि तुमच्याजवळ जर प्रतिभा, हुनर असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणी अडवू शकत नाही मग जयदेवजवळ काय नव्हते जे इतर संगीतकारांकडे होते. ज्यांना फक्त दुर्दैवाने साथ दिली? ४२ चित्रपटाना संगीत देऊनही एका खोलीत पेइंग गेस्ट म्हणून राहायची शिक्षा मिळाली. 3 ऑगस्ट 1918 ला नैरोबीत जन्मलेल्या जयदेवनी कुटुंब लुधियानात स्थायिक झाल्यावर वयाच्या १५ व्या वर्षी मुंबईत येण्यासाठी घरून पळ काढला.बरकत राय,कृष्णराव जावकर,व जनार्दन जावकर यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले.अली अकबर खान सारख्या मातब्बराकडे शागीर्दकी केली.म्हणजे किती शास्त्रीय संगीताचे ज्ञान त्यांच्याकडे होते. नवकेतनच्या “TAXI DRIVER“ पासून एस डी बर्मन यांच्या कडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. कालापानी मधील “हम बेखुदिमे तुमको पुकारे” गाण्याची कम्पोजीशन जयदेव यांची होती.पण स्वाभाविकपणे संगीतकार म्हणून नाव लागले सचिनदाचे.

सुजाताचे संगीत दिले जात होते.”जलते है जिसके लिये” ची चाल तयार झाली. सचिनदानी सांगितले उद्या रफीला रिहर्सलसाठी बोलवा. जयदेवनी हळूच दादांना बाजूला घेतले व म्हणाले “ “दादा,ट्यून जरा ध्यान से सुनो, ये ट्यून रफिसाब कि नही, ये SOFT ट्यून तलत कि है “ दादानाही ते पटले. देव आनंदने निर्णय केला कि एक  चित्रपट जयदेवना देऊ या. म्हणून “ हम दोनो “ चित्रपट जयदेवना दिला. त्यावेळी लतादीदी सचिनदाकडे गात नसत. जयदेव सचिनदाचे सहायक होते त्यामुळे लतादीदी आपल्याकडे गातील याची त्यांना खात्री नव्हती म्हणून त्यांनी दीदींना विनंती केली “ कृपया माझ्या कडे गा नाहीतर हा चित्रपट माझ्या हातून जाईल” लतादीदी तयार झाल्या.” झायलोफोन वर वाजवलेली लायटरची ट्यून, चित्रपटाची सिग्नेचर ट्यून झाली.पण नंतर कधीही देव आनंदने जयदेवना स्वतंत्र चित्रपट दिला नाही. याच चित्रपटातील “कभी खुद्पे,कभी हालातपे रोना आया, बात निकली तो हार एक बात पे रोना आया “गाण्यासारखे जयदेव जगले. ऋषिकेश मुखर्जींचा “आलाप” व अमोल पालेकर यांचा “अनकही” हे चित्रपट तर पूर्णपणे रागदारीवर आधारित होते. गमन चित्रपटात त्यांनी गायक हरिहरन यांना ब्रेक दिला.

आयुष्यभर ते अविवाहित राहिले आणि चर्चगेट येथील रिट्झ हॉटेलसमोरच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यात एका खोलीत राहिले. कधी कधी ते दरवाज्याला कुलूप न घालताच बाहेर जात. तेव्हा त्यांना विचारले जाई कि “तुम्ही कुलूप न घालताच बाहेर कसे जाता तेव्हा ते म्हणत “माझ्या कडे चोरून नेण्यासारखे आहेच काय? एक माझं संगीत जे माझ्या हृदयात आहे आणि दुसरे माझं दुर्दैव जे माझं कधीही साथ सोडत नाही.” त्यांना मध्य प्रदेशचे एक लाख रुपयाचे लता मंगेशकर पारितोषिक मिळाले ते घेतल्यावर त्यांना विचारले “ तुम्हाला पारितोषिक मिळाल्यावर कसे वाटते?” ते म्हणाले “आयुष्यात मी कधी एकत्र एक लाख रुपये पाहिले नाहीत “ चेक घेऊन ते कामासाठी दिल्लीला गेले.मुंबईला आल्यावर त्यांनी तो चेक बँकेत भरला.तो क्लीअर होण्या आधीच ६ जानेवारी १९८७ला त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांनी संगीत दिलेल्या ४२ चित्रपटापैकी कितीतरी चित्रपटाची गाणी गाजली होती.त्यांची गैरचित्रपट गाणी गाजली होती.हरिवंश राय बच्चन यांच्या मधुशालामधील कवीताना चाली देऊन मन्नाडे कडून गाऊन घेतली होती त्यांना तीन वेळा उत्कृष्ठ संगीतकार रेश्मा और शेरा,गमन,अनकही चित्रपटांना मिळाले.आणि सूर सिंगार ४ चित्रपटाना मिळाले. त्यांची गाणी गाजलेले चित्रपट.

१) जोरूका भाई २) हम दोनो ३) किनारे किनारे ४) मुझे जिने दो ५) रेश्मा और शेरा ६) प्रेम पर्बत ७) परिणय ८) आलाप ९) तुम्हारे लिये  १०) घरौंदा ११) गमन १२) अनकही

— रवींद्र शरद वाळिंबे.

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..