नवीन लेखन...

‘उरी-दी सर्जीकल स्ट्राइक’

 

भारतीय सिनेमातून दहशतवाद या विषयावर अनेक सिनेमे बनले आहेत. मग त्यात अगदी सुरवातीला गुलजार यांचा ‘माचीस’ पासून मणी रत्नम यांची Trilogy (‘रोजा-बॉंम्बे-दिल से’), गोविंद निहलानी यांचे ‘द्रोहकाल’, ‘एक हजार चौरासी की माँ’ व ‘देव’, विधू विनोद चोप्रा यांचा ‘मिशन कश्मीर’, खालीद मोहम्मद यांचा ‘फिजा’, निरज पांडेचा ‘A Wednesday’, अनुराग कश्यपचा ‘Black Friday’, राम गोपाल वर्मा चा ‘The Attacks of 9/11’, यांशिवाय ‘कुर्बान’, ‘न्यूयॉर्क’ हे चित्रपट मला प्रामुख्याने आठवतात.

या सर्व सिनेमांमधून एक समान धागा आपल्याला जाताना दिसतो तो म्हणजे दहशतवाद व त्या संदर्भाने घटणाऱ्या घटना़ंना सामाजीक परिस्थितीची, संदर्भांची जाणीवपूर्वक दिलेली जोड. या चित्रपटांनी ज्या प्रश्नांचा उहापोह या चित्रपटांनी केला ते म्हणजे..

सामान्य भारतीय किंवा समूह कटूतेकडे का वळतो?
त्याला त्या त्या वेळची परिस्थिती कशी कारणीभूत ठरते?
दहशतवाद्याच्या मनात नक्की काय चालत असतं?
ते खरोखरच कृर निर्दयी असतात की ते फक्त अंगावर घेतलेली कामगिरी पार पाडत असतात?
निष्पाप लोकांचे बळी जातात तेंव्हा त्यांना पश्चाताप होतो का?

या सर्व चित्रपटांनी आपापल्या पद्धतीने ‘दशहतवाद’ वा विषय मांडला आहे. बऱ्यापैकी या चित्रपटांनी आपल्याला असेच ठसवलय की दहशतवादी ही देखील भावनाशील माणसे असतात, त्यांना भडकवलं जातं, ब्रेन वाॕश केलं जातं अन त्यामुळे ह्या व्यक्ती भरकटतात आणि यांच्याकडून चुका होतात..

पण खरंच असं असतं का? आपले सिनेमे चुकीच्या विचारसरणीचे समर्थन करत होते का?

बाँबस्फोट करुन वेळोवेळी पोलीसांच्या गाड्या उडवणारे नक्षलवादी असोत की उरी मधे झोपलेल्या भारतीय लष्करी छावनीवर ॲ‍टॅक करणारे दहशतवादी असोत की पुलवामा मधे RDX वापरुन लष्कराच्या गाड्यांजवळ बाँबस्फोट घडवून अनेक लष्करी सैनीक मारणारे कश्मीरी दहशतवादी असोत, भारतीय सिनेमे फक्त या आधी या दहशतवादाची कारणे आणि त्यांची भूमिका, भारताविषयक नकारात्मक विचार आपल्यासमोर मांडताना दिसले. वर दिलेल्या यादीतले अनेक सिनेमे या प्रकारात मोडतील. (सारेच तसे नकारात्मक नव्हते हेही मी इथे नक्की मांडतो)

हा ट्रेंड मोडणारे दोन सिनेमे बॉलीवूडने दिले..त्यात एका होता 2014 मधे आलेला ए.आर.मुरुगादास्स यांचा अक्षयकुमार अभिनीत ‘हॉलीडे’ आणि दुसरा होता ‘उरी-द सर्जीकल स्ट्राईक’

दोन्ही चित्रपटात दशहतवादाची उगाची कारणमिमांसा न करता सरळ सरळ दहशतवादी आणि त्यांच्या कारनामे यांना स्पष्टपणे चुकीचे ठरवून त्याला भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेले प्रत्युत्तर अगदी प्रभावीपणे मांडलय. No romance with Terrorism.

त्यातही ‘उरी’ पाहिल्यानंतर, पहिल्यांदाच असा आशावाद, असा confidence, आपल्याला सिनेमा संपल्यावर मिळतो की जोपर्यंत एक जबरदस्त लष्करी ताकत भारताच्या सिमांवर उभी आहे तोवर परकीय शक्तींनी व आपल्या चीन-पाकीस्तान सदृश्य शेजारील देशांनी कितीही आपल्या देशात अंशाती फैलावण्याचे प्रयत्न केले तरी आपले जाँबाज लष्करी अधीकारी त्याला प्रत्युत्तर देतील व ते प्रयत्न फोल तर ठरवतीलच, पण त्यापुढे जात त्यांना असा सणसणीत धडा देतील की अशी अगळीक पुन्हा करताना हे दहशातवाद पोसणारे देश शंभर वेळा विचार करतील.
उरी हा 2019 चा सर्वार्थाने यशस्वी चित्रपट.

या चित्रपटाला प्रचंड लोकाश्रय तर मिळालाच (350 कोटी कमाई) पण समिक्षकांकडूनही हा सिनेमा नावाजला गेला. 2016 मधे कश्मीर मधे उरी मधे लष्करी कँपवर झालेल्या खरोखरच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेला खरोखरचा सर्जीकल स्ट्राइक, थोड्याशा सिनेमॕटीक लिबर्टीज घेउन, नवोदीत दिग्दर्शक आदित्य धर याने इतका जबरदस्त बनवलाय, की आजही हा सिनेमा भारताच्या सर्वाधीक प्रभावी लष्करी कारवाईच्या आठवणी जाग्या करत राहते.
पहिल्यांदाच भारताने ‘कडी निंदा’ चा फालतूपणा सोडून सरळ सरळ सिमेपलिकडे आपले कमांडो पाठवून तिथे दहशतवादी पोसणारी जी बांडगुळे उगवली होती ती पूर्ण उध्वस्त केली गेली. सिनेमात मेजर विहानसिंग शेरगील (विकी कौशल) याच्या नेतृत्वाखाली ही कारवाई होते. ज्या थरारक पद्धतीने ही कारवाई हौते, त्यामधे जे तंत्रज्ञान वापरले गेलय, त्यात भारतीय कमांडो जे असीम धाडस दाखवून loc पार करुन आपली मोहीम फत्ते करतात ते सिनेमात पाहताना अक्षरशः रोमांच उभे राहतात.

मला वाटते ‘उरी’ या सिनेमाने नव्या भारताने सर्जीकल स्ट्राइक्स करुन शत्रु राष्ट्रांच्या व त्यांनी पोसलेल्या दहशतावाद्यांच्या मनात धडकी भरवण्याचे व भिती बसवण्याचे जे काम केलय ते हुबेहुब या सिनेमात प्रतिबिंबीत केलय. ‘ये नया भारत है..ये घुसेगा भी और मारेगा भी..’ हे वाक्य भारतीय लष्कराने दोन सर्जिकल स्ट्राईक करुन अधोरेखित केलय. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी हा लेख लिहीताना मला हा पूर्णतया नव्या भारताचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा वाटतो.

त्यामुळेच जेंव्हा जेंव्हा या सिनेमात मेजर विहानसिंग आपल्याला सहकाऱ्यांना ओरडून विचारतो…
Guys…How is the Josh??
तेंव्हा आपसूक आपली छाती फुलून येते, एक जोश आपल्याही अंगात येतो, अपार देशप्रेमाने भारुन आपणही एकसुरात म्हणतो..
High Sir….!!!

— सुनील गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..