नवीन लेखन...

“बुनियाद-टेलिव्हिजन सिरीजचा शोले”

कासवाच्या गतीने वाढणाऱ्या भारतीय टेलिव्हिजन क्षेत्राला खरा बुस्टर मिळाला तो ऐंशीच्या दशकात. १९८२ मधे दिल्लीतील एसियाड गेम्स च्या निमीत्ताने क्रिडा स्पर्धेचे थेट प्रक्षेपण, १९८३ मधे एकदिवसीय क्रिकेटमधे भारतीय टीमचा विश्व विजय, आणि १९८४ मधे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लाइव्ह टेलेकास्ट झालेला त्यांचा अंत्यसंस्काराचा सोहळा, या सर्व घटनांमुळे भारतात घरोघरी टेलिव्हिजनचा प्रसार झपाट्याने होउ लागला होता. टिव्ही […]

तब्बुचे ‘ते’ तीन रोल

नव्वदच्या दशकाच्या शेवटी एक मस्त हॉलीवूडपट आला होता. ‘What Women Want?’ नावाचा. पाहिलाय तुम्ही? हेलेन हंट…? मेल गिब्सन..? अरे..नाही पाहिला? नो प्रॉब्लेम..!! केदार शिंदेंचा ‘अगबाई अरेच्चा’ पाहिलाय ना? हां…येस्स.. तर, अगबाई अरेच्चा आणि What Women Want एकाच थिमवर होते. अर्थात कथा आणि ट्रिटमेंट पूर्ण वेगळी होती. दोन्हीत एकच विषय हाताळला होता.. ‘बायकांना आयुष्यात नक्की काय हवं […]

‘नुक्कड’ची पस्तीस वर्षे

ही सारी पात्रं रसरशीत जिंवतपणा काय असतो हे दाखवणारी होती. कितीही अडचण असो, एकमेकाच्या सहाय्याला धावणारी, दुसऱ्याच्या सुखात आपलं दुःख विसरुन सहभागी होणारी, एकमेकांच्या दुःखात मात्र जवळ करणारी ही सारी नुक्कड मंडळी. याच्या टायटल साँग मधेच एक वाक्य होतं..’अजब तमाशा है ये नगरी, दुख मे हसते गाते है..अपने बर्बादीका यारो ये तो जश्न मनाते है..’ बस्स..यातच नुक्कडचे सार आहे. […]

मास्टर-द-ब्लास्टर

भवानीचे दहा बारा ट्रक त्याची सगळी काळी संपत्ती घेउन बॉर्डर क्रॉस करुन पळत असतात. पण मास्टरला हे कळते आणि तो दोन तीन तासांचा प्रवास पाच मिनीटात तर कव्हर करतोच..पण बरोबर आपल्या मैत्रीणीला घेउन येतो..जी असते तिरंदाजी चँपीयन. […]

रफी नावाचं दैवत

डिस्क्लेमर- मी आधीच सांगतो की किशोरदांचा जबरदस्त फॅन आहे. पण… रफी आपलं दैवत आहे. कळायलं लागलं तेंव्हापासून या आवाजाने जादू केली आहे. आमच्या लहानपणी एफ एम नव्हते. पण आमची सांगली आकाशवाणी होती..आजही आहे. त्यावर सकाळी भजन सदृश्य गाणी लागायची. त्यात बऱ्याचवेळा ‘शोधीशी मानवा’ किंवा ‘प्रभु तू दयाळू’ नेहमी लागायचे. त्यांच्या त्या भारदस्त आवाजात त्या कोवळ्या मनातही […]

मिशन इंपॉसिबल

तगडा हँडसम टॉम क्रुज तसा आधीच टॉप गन पासून ॲ‍क्शन हिरो म्हणून लोकांना खूप आधीपासूनच आवडला होता. पण MI ने जगभर इतकी जबरदस्त कमाई केली की स्वतः टॉमने MI Franchise चे हक्क घेत 1996 ते 2018 या 22 वर्षात MI-2, MI-3, MI-Ghost Protocol, MI-Rogue Nation, MI-Fallout असे तब्बल सहा सिनेमे या फ्रँचाइज अंतर्गत काढलेत. […]

गॉडफादर(१९७२) / गॉडफादर-२(१९७४)

हॉलीवूडच्या इतिहासात काही विलक्षण सिनेमे बनले आहेत. या सिनेमांनी पूर्ण जगभरात आपला प्रभाव पाडला आहे. जगाभरात या सिनेमांचे चाहते आहेत.. पिढ्यान पिढ्या या सिनेमांची पारायणे होताहेत.. अशा सिनेमांमधला बिनीचा शिलेदार म्हणजे अर्थातच ‘गॉडफादर’. गॉडफादर बद्दल प्रचंड अख्यायीका आहेत.. याच्याबद्दल लिहीले गेलय तितके फारच कमी सिनेमांबद्दल झालय किंबहुना साडे चार दशके होउनही ही फिल्म बघितली जातेय.. आजही […]

‘जब भी कोई कंगना बोले’

जगात दोन प्रकारची माणसे सापडतात… पहिली असतात फक्त रडतखडतच जगणारी.. अगदी बचपनसे बुढापे तक.. ही लोक भरभरुन जगणं कधी समजूच शकत नाहीत.. अगदी मरेपर्यंत.. यांच्या अगदी विरुद्ध जगणारे लोकही असतात..आहेत.. जिवनाच्या प्रत्येक स्टेजमधे ते जगाला फाट्यावर मारुन जगतात…अगदी..अर्धी लाकडं ‘वैकुंठा’ला पोचली तरीसुद्धा..(विनोद पुण्या बाहेरच्या लोकांनाही कळेल म्हणून टाकलाय बरं..) तर या दुसऱ्या जातकुळीतल्या लोकांसाठी हे गाण […]

“वळू”-एका डॉक्यूमेंट्रीचा सिनेमा

हा..कॅमेराकडे बघून बोला.. हो..हो तुम्हीच.. डूरक्याबद्दल बोला.. वळू म्हणजे देवाला सोडलेला बैल… बाया माणसांचा फोटो काडू नये.. अशा अतरंगी बाईट्सनी वळू हा सिनेमा सुरु होतो.. आणि मग सुरु होते हास्याच्या सागरातली एक रोलर कोस्टर राईड.. दोन तासांची अशी राइड जी पूर्ण चित्रपट तुम्हाला खूपच हसवते.. एका वळूला पकडण्याचा झगडा..त्यावर बनलेली एक अनोखी डाक्यूमेंट्री..आणि त्यातली सर्व बहुरंगी, […]

बेन हर (१९६०)

एखाद्या सिनेमाचा आस्वाद करताना त्याचे थिम म्युझीक त्या सिनेमाशी किती एकरुप होउ शकते याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे बेन हर. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेमला जिवंत करणारे एक विलक्षण पार्श्वसंगीत बेन हर हा सिनेमा पाहताना तुम्ही अनुभवत राहता. इतके की सिनेमा संपल्यानंतरही बरेच तास ते तुमच्या डोक्यातून जात नाही. ते सारे प्रसंग तुम्हाला राहून राहून आठवत राहतात..अगदी तुमच्या स्वप्नातही..ही कमाल मिल्कस रोजाच्या जबरदस्त थीम संगीताची आहे. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..