नवीन लेखन...

मास्टर-द-ब्लास्टर

 

Hey..no matter what they say..
Master the blaster..
Hey no matter what they do
Mr. master the blaster
असं गाणं सुरु होतं आणि ‘त्याचं’ आगमन होतं..
त्याची एन्ट्रीच्या सिनचं वर्णन म्या पामरानं काय करावं ..
आधी चेहऱ्याच्या हनुवटी पर्यंतचा भाग दिसत राहतो..
पण अंहं…थलपथी विजयला पहिल्याच शॉटमधे दाखवले तर!! त्याच्या एंट्रीची क्रेझ ती काय राहणार..?
आपल्याकडे हिरोंची एंट्री फारतर वरुन खाली म्हणजे vertical होते, पण इथे थलपथी विजयची एंट्री ही horizontal होते.
म्हणजे ‘उर्वसी’ गाण्यात प्रभूदेवा उडत गाडीतून बाहेर येतो तसा.

त्याबाबत ह्या साल्या साउथवाल्यांना मानलंच पाहिजे यार..
लोकांचा उत्साह सुपरस्टारच्या एन्ट्रीला crescendo म्हणजे परिसिमेला कसे न्यायचे याचे ट्रेनिंग यांच्याकडूनच रितसर घ्याव आपल्या बॉलिवूड वाल्यांनी…क्लास लावून.
असो..

आता या संपूर्ण सिनेमात हा माणूस अचाट शक्तीचे असे काही प्रयोग करतो की आपल्याला याच्यापुढे शेवटी नतमस्तक व्हावेच लागते. कारण ..
Got the man with the plan right here
Bringing swag with the man right here
Livin’ it up and sippin’ on beer
Yeah clap for me man right here
Hey..no matter what they say..
Master the blaster..

तर असा हा मास्टर..
हा मास्टर कॉलेजमधे शिकवतो बरं का..!!
तो कॉलेजमधे कोणता विषय शिकवतो हे विचाराल..?
छे हो..इंग्रजी, मॅथ्स, सायन्स असले विषय सामान्य प्रोफेसर शिकवतात. ‘हे’ मास्टर काही शिकवत वगैरे नाहीत.
त्यांच्यासाठी एक स्पेशल पोस्ट आहे
‘Dean of Student Affairs’.

तर हे जे काही Student Affairs बघतात ते काही तर खासच आहे.. असणार. का म्हणून विचारताय..?
कारण कॉलेजमधे कार्यक्रमसाठी मिनीस्टर आलेले असताना कार्यक्रम थांबवत, कॉलेजची मुले ही दारु पिउन टुन्न होउन झोपलेल्या या प्रोफेसरला घरी जाउन उठवून, वाजत गाजत, (वाती म्हणजे Master coming च्या धुनवर ) प्रेसिडेंट चा ताफा नेतात तसे गाडीत घालून आणतात…ऐसे मास्टरमे उसमे कुछ तो होगा ना बॉस..!!

बरोबर, जो मास्टर मुलांबरोबर डान्स करतो, गाणी म्हणतो, तोंडात कॉलर, डोळ्यावर काळा गॉगल घालून कॉलेजमधे येउन स्टाईल स्टेटमेंट्स शिकवतो, मुलांना अफेअर्स शिकवतो…
तो मुलांसाठी डेमी गॉड नसेल तरच नवल.
Hey..no matter what they say..
Master the blaster..
तर या मास्टरचे नाव असते JD.

आता नाव JD असल्याने हा स्कॉच देखील ‘जॅक डॅनियल्स’ पित असतो. बघा हं..आपल्या इथे प्रोफेसर लोकांना पगार मिळत नाहीत..तिकडे तामिळनाडू मधे प्रोफेसर JD पितात. (बघा विचार करा..तिकडे नोकरी वगैरे मिळते का बघा…)
आणि जेंव्हा याला उपरती होते आणि दारु सोडायचं ठरवून जेंव्हा तो JD च्या खंबेच्या खंबे बेसीन मधे ओततो..अर्र..तेंव्हा आम्हाला बघताना काय दुःख झाले असेल याचा विचार करा.

‘अबे साल्या..तुला नाय प्यायची तर न पी..पण आमाला दे ना यार..आमच्या डोळ्यासमोर ओतून आमचं काळीज असं चिरु नको ना भावड्या..’
असे ओरडून सांगावेसे वाटले. पण काय करणार…
No Matter What They Do..
Mr Master The Blaster..

मग त्याची जंग होते ती आमच्या ‘मक्कल सेल्वन’ विजय सेतुपथीशी. भवानी नावाचा हा डेंजर माणूस जो सुधारगृहातल्या मुलांकडून आपली बेकायदा कामे करुन घेत असतो. हा भवानी हाताच्या एका ठोशात हत्तीसारख्या गुंडांना लोळवू शकतो एवढी त्याच्या ठोशात ताकत आहे. फार शांतपणे तो आपल्या साम्रज्याच्या आड येणाऱ्यांना संपवतो. (वाइट वाटलं राव…अरे कुठे नेउन ठेवलाय ’96’ चा के रामचंद्रन माझा…)

आता अशा भवानी नावाच्या या व्हिलनला आपला मास्टर त्याच्याच अड्ड्यावर जाउन धमकी देतो. आणि त्यासाठी तो भवानीच्याच गळ्याला…hold your breath…पेन लावतो पेन…आणि तरीही भवानीला वॉर्नींग देउन सहीसलामत घरी येतो..कसं म्हणून विचारु नका…कारण तुमाला तर ठाउकच आहे..
Bringing swag with the man right here..
Yeah clap for me man right here..
Mr Master The Blaster…
मग आपण क्लायमॅक्सला येतो..

भवानीचे दहा बारा ट्रक त्याची सगळी काळी संपत्ती घेउन बॉर्डर क्रॉस करुन पळत असतात. पण मास्टरला हे कळते आणि तो दोन तीन तासांचा प्रवास पाच मिनीटात तर कव्हर करतोच..पण बरोबर आपल्या मैत्रीणीला घेउन येतो..जी असते तिरंदाजी चँपीयन.

मग तिच्या धनुष्यातून जे बाण सुटतात ते या ट्रक्सच्या काचा आणि हेडलँप्स नाही, तर ट्रकचे टायर देखील बस्ट करतात..अय्यो..!!
यात शेवटी मास्टर तिचाच धनुष्यबाण घेउन सगळ्या ट्रक्स वर बाणांची बरसात करतो तेंव्हा तर मला साक्षात बाहुबलीच परतून आल्यासारखे वाटले आणि एकच सिनेमात दोन सिनेमे पाहण्याचा आनंद मिळाला.
कसं सराइतपणे करतात ना हे सगळं हे साउथवाले..!!
पण शेवटी..
No Matter What They Do..
Mr Master The Blaster..

सिनेमाचा क्लायमॅक्स कसा आहे हे सांगून मी तुमचं काम सोपं करणार नाही. तुम्ही पण त्रास घ्या ना राव बघायचा..!!
प्राइमवर आहे..

ता.क.-
थलपती विजय भक्तांनी हा लेख खेळीमेळीत घ्यावा.
मला मारायला भवानीला पाठवू नये.
ते ‘उंडियल’ नावाचं ‘बारकं’ मात्र लई आवडलं आपल्याला.
आणि हो..अर्जून दासचा तो ‘बेस’ आवाज देखील..

— सुनील गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..