नवीन लेखन...

‘जब भी कोई कंगना बोले’

जगात दोन प्रकारची माणसे सापडतात…
पहिली असतात फक्त रडतखडतच जगणारी..
अगदी बचपनसे बुढापे तक..
ही लोक भरभरुन जगणं कधी समजूच शकत नाहीत..
अगदी मरेपर्यंत..
यांच्या अगदी विरुद्ध जगणारे लोकही असतात..आहेत..
जिवनाच्या प्रत्येक स्टेजमधे ते जगाला फाट्यावर मारुन जगतात…अगदी..अर्धी लाकडं ‘वैकुंठा’ला पोचली तरीसुद्धा..(विनोद पुण्या बाहेरच्या लोकांनाही कळेल म्हणून टाकलाय बरं..)
तर या दुसऱ्या जातकुळीतल्या लोकांसाठी हे गाण बनलय..हे लोक आपलं आयुष्य उतारवयातही मजा करत घालवतात…म्हणजे ‘गळ’ टाकतात..फ्लर्ट करतात..प्रेमात पडतात..
ही माणसं अगदी मुन्नाभाई एम बी बी एस मधल्या गाण्यासारखे..’बचे चार आणे..वेस्ट न करना यार..’ असे ठणकावून सांगणारे..अन ‘डंके की चोटपर’ तसे वागणारेही..
शौकीन मधले तीन म्हातारडे असलेच अवलिये आहेत..
(होते म्हणवत नाही,तिघे काळाच्या पडद्याआड गेले तरी)
अशोक कुमार, ए.के.हंगल आणि (अच्छाs)उत्पल दत्त..
आपापल्या इलाक्यात गुलहौशीपणा करणारे तीन मित्र..
ए के हंगल हा बिझनेसमन आहे आणि आपल्या सेक्रेटरीलाच पटवायचा प्रयत्न करतोय..
उत्पल दत्त घरमालक आहे व विधवा भाडेकरु बाईवर जाळे टाकतोय..
आणि आपले दादामुनी…
रोज घरासमोरुन जाता येता दिसणाऱ्या फटाकडीला डोळे भरुन पाहतात.. दुरुनच.’चंदा को चकोर निहारे’ हे गाण्यातले वाक्य या सिनसाठीच..
तर असे हे तिघे शौकीन..खरं तर आंबट शौकीनच..
जीवाचा गोवा करायला निघतात. एका गोड तरुण पोरीला पटवायसाठी (हाय..हाय…रती अग्निहोत्रीss) काय काय उद्योग करतात हे या सिनेमात दाखवलाय.
अर्थात सिनेमाची सगळी स्टोरी सांगणार नाही कारण हा लेख यातल्या गाण्यावर आहे..पण नमनाला घडाभर तेल यासाठीच की पार्श्वभूमी माहित असेल तर गाणे बघताना पटकन रिलेट होईल..
हे गाणे मी हा सिनेमा दूरदर्शनवर रात्री पाहिला तेंव्हा पहिल्यांदा ऐकले..अन त्याच्या प्रेमात पडलो..
परदेशी गेलेल्या मैत्रीणी प्रमाणे अनेक वर्ष हे गाणे फक्त मनात राहिले..कारण रेडिओवर हे फार वाजत नाही..
तेंव्हा युट्यूब आणि गाण्याला वाहिलेले साइट्स नव्हते..
तीन चार वर्षापूर्वी परत गाणं शोधून काढलं..
अन पुन्हा या गाण्याच्या प्रेमात पडलो..
गीतकार योगेश हा माणूस दिग्दर्शक बासू चॅटर्जीचा आवडता..पण यात संगीतकार म्हणून सलीलदांऐवजी आर.डी..आणि गाणे गायला किशोरकुमार..
आहाहा..
मग काय म्हणता…अशी मस्त भट्टी जमलीय..
की इथे पिउन उठणारा फुल्ल टाईटच..
एकतर योगेशजींनी हे गाणं इतकल चपखल लिहिलय की बस्स..आंबटशोकीन म्हाताऱ्यांची मनोवस्था बरोबर पकडलीय त्यांनी. आर.डी.ने खरे तर वडिलांच्याच एका बंगाली गाण्यावरुन ही चाल बेतलीय म्हणे.. (मेरे बापका माल है..तेरेको क्या..?)पण या गाण्यासाठी चाल इतकी भारी जमलीय की यंव रे यंव..
आणि त्यात त्याने मधला अंतऱ्यातला जो जिवघेणा म्युझीक पिस टाकलाय की प्रत्येकवेळेला मी ऐकताना मी मागे जाउन तो पुन्हा ऐकतो..आई.ग..ss
आणि किशोरदानचे तर काय सांगावं…
आमच्या सांगली कोल्हापूरच्या भाषेत ‘जाळ आणि धुर संगाटच’..! एकतर किशोरच्या आवाजातल्या गाण्यात अशोककुमार डान्स करताहेत हा दुग्धशर्करा योग या गाण्यात आलाय..किशोरदाने इतक तब्येतीत गाणे गायलय की बस्स..आपण फक्त म्हणायचं..मजा आ गया..
तर असे हे गाणे..
किशोर-आर डी च्या ‘बडव्यां’ना नक्कीच माहित असणारे..पण हा लेख प्रपंच इतर वारकऱ्यांसाठी आहे..
बघा मग गाणं…लिंक देतोय..

ता.क- हे गाणे ऐकून दादामुनी इस्टाईल नाचावेसे वाटल्यास ते काम घरात न करता बिल्डींगच्या टेरेसवर करावे.. लॉकडाउन मुळे घरीच असणाऱ्या बायका पोरांना (आणि शेजारणींना) फेफरं यायला नको..

इत्यलम..!

https://youtu.be/ZWkucLNdyKE

— सुनील गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..