“जवा बघाव तवा जुन्याच गप्पा , जुनेच सिनिमा , जुनीच गाणे , जुन्याच आठवणी ! तुम्ही नुसती भूत झालात ,भूत ! आजच्या काळात का नाही जगत ? अस काय आहे त्या तुमच्या काळात जे आज आमच्या काळात नाही ?” असा खडा सवाल ,एका सो called ‘तरुणा’ने (जो जेष्ठ नागरिक वाटत असलातरी पन्नाशीच्या आसपास लोंबकळतोय ) ,’ अस काय आहे त्या मोहिनीत जे माझ्यात नाही !’ या उषा चव्हाणने दादा कोंडकेना विचारलेल्या प्रश्ना प्रमाणे त्याने मला प्रश्न विचारला . […]
“मग काय म्हणतंय तुमचं ड्रायव्हिंग?” हा प्रश्न विचारून लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या जखमांवर का मीठ चोळतात कळत नाही. म्हणजे अशा प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हा एक प्रश्नच असतो. बर्याचदा हा प्रश्न निर्मळ मनाने विचारला जातो की उगाचच डिवचायला हे समजणे अवघड असते. बरं ड्रायव्हर लोकांना नवीन गाडी शिकणार्याची व्यथा तरी समजते पण ज्याला ड्रायव्हिंगचे ओ का ठो […]
मित्र अथवा मैत्री हा शब्द ऊच्चारताच आपल्या नजरेसमोर अनेक मित्र व त्यांची मैत्री ऊभी रहाते. मित्र किंवा मैत्री करताना कधीही ऊच्च निच, जात, धर्म स्त्री पुरुष असा विचार मनात येत नाही. किंबहूना मैत्री केली जाते म्हणण्यापेक्षा मैत्री होते असेच म्हणणे जास्त ऊचीत होईल. […]
त्या दिवशी माझे भिजलेले अंग , कपडे , डोक कोरड झालाय. पण सगळ नसलं तरी मनाचा एक कोपरा अजून ओलाच आहे ! तो क्षण ,तोच पाऊस , तोच मी ,तीच उषा परत येणार नाही . मला माहित आहे . तरी ओला जीव कोठेतरी गुंतलाच आहे ! […]
‘आरोग्यम् धनसंपदा-’ या उक्तीचा साक्षात्कार झाला की मी व्यायाम चालू करतो आणि ते वेळापत्रक दोन दिवसात कोलमडते. एरव्ही व्यायामाची मला आवड आहे अशातला भाग नाही. कोणतरी हार्टफेलने गेला किंवा कुणाचे बीपी वाढलेले कानावर आले की मी नेमाने व्यायाम सुरू करतो. आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवायचेच म्हणून आपोआप आतून स्फुरण येते, पण ते फारच कमी टिकते. […]
मी 1977 ला इस्टर्न कोलफिल्डस् लि. या कंपनीत नोकरी करण्यासाठी राणीगंज जवळच्या परसिआ या खाणीत 18.1.1977 ला जॉईन झालो.तो दिवस मला महत्वाचा वाटला होता ,माझ्याकरता.कारण एक चांगली वरचे पैसे कमवू देऊ शकणारी पीडब्ल्यूडी ची तीन वर्षांची महाराष्ट्रातील नोकरी सोडून मी इतक्या दूर बंगालमध्यें आलो होतो. […]
आपण अनेक मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेली प्रवास वर्णने वाचली असतील व त्याचा मनसोक्त आनंदही घेतला असेल. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य नवशिक्या लेखकाने प्रवासवर्णन लिहावे हे थोडेसे धाडसच होतंय याची मलाही जाणीव आहे. पण एखादा प्रवास किती मजेशीर होऊ शकतो याची एक झलक म्हणून हा लेखनप्रपंच. या प्रवासातील सर्व घटनाच इतक्या मजेशीर होत्या की आज जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षे झाली तरी त्यातील प्रत्येक प्रसंग माझ्या पूर्ण आठवणीत आहे. […]
रविवार या एकाच दिवशी मनासारखे झोपायला मिळते म्हणून जाग आलेली असतानाही मी आणि माझा दहा वर्षाचा मुलगा अंथरुणावर लोळत पडलो होतो. बायको उठली आहे हे किचनमधल्या भांडयाच्या आवाजावरून कळत होते. कुठलेही भांडे गॅसवर ठेवण्याआधी ते टिकाऊ आहे की नाही हे आपटून बघते की काय कळत नव्हते. “अरे दहा वाजले, उठा आता दोघेही.” “काय यार मम्मी पण, […]
आडगेवाडीतल्या अण्ण्याचं लग्न व्यवस्थित पार पडलं. जास्त काही नाही, फक्त दोन डोकी फुटली. एका आगाउु आडगेवाडीकराने वर्हाडातल्या पोरीला शिटी मारली म्हणून थोडा दंगा झाला, पण बापूच्या चोख व्यवस्थापणामुळे लगेच आटोक्यात आला. लग्न होउुन चार दिवस उलटले. पूजा झाली, फक्त गोंधळ तेवढा बाकी होता. आईबापाला काही पडलेली नव्हती, ते गोंधळात इंटरेस्टच घेत नव्हते. म्हणून अण्ण्याने बापूला सांगून […]
नेहमी प्रमाणे मी मुडक्याच्या टपरीवर चहाचे घुटके घेत होतो . शाम्या आपला ‘खारीचा ‘ वाटा सम्पवत होता . आत्ता पर्यंत त्याच्या खारीनी दोन कप चहा पिवून टाकला होता . तिसऱ्या कपात शाम्या शेवटची खारी मोठ्या तन्मयतेने बुडवत होता . “सुरश्या ,तुमच्या चहाचे बिल माझ्या कडे !मुडक्या मला कॉफी आण !” जमिनीत मुंडी खुपसलेल्या शहमृगा सारखा, मोबाईल […]