लहानपणापासून माझ्या मनात बरीच कुतुहले आहेत. मोठा झाल्यावर त्यातली बरीच कमी झाली‚ काही आणखी नवी आली. बालपण खेडयात गेले असल्याने सुरवातीची बरीच वर्षे दुरच्या डोंगराच्या पायथ्याची वाहने बघून ती आपोआप कशी धावतात याचे कुतूहल वाटायचे. वाहन चालवायला ड्रायव्हर असतो हे आमच्या ध्यानीमनीही नव्हते. सगळयाच वाहनांना ड्रायव्हर असतो हे समजल्यावर तर मला धक्काच बसला होता. पोपट हा […]
हजाराहून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या (१०४२ ). गिनीज बुकानी त्याची नोंदहि घेतली. पण साहित्यिक या उपाधी पासून दूरच राहिले. त्यांच्या लेखनाचे एक गरुड होते. त्यांच्या पुस्तकांची वाट पहाणारे माझ्यासारख्या वाचकांचा एक वाचक वर्ग होता. लता मंगेशकर आपल्या बिझी शेदुल्ड मध्ये सुद्धा त्यांचे पुस्तक सोबत ठेवत आणि सवड मिळाली कि वाचत. […]
कथा वाचनाच्या घनदाट जंगलातून वाट काढत असताना, वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व. पु . नावाचा एक ‘कथा’ळ पहाड लागतो. तो पार केल्याशिवाय मराठी कथा वाचनाचा प्रवास संपन्न होत नाही. […]
प्रमोद माझा चुलत भाऊ. गांवाकडेच राहिलेला, शिकलेला. लहानपणी माझं गांवाकडे फारसं जाणं झालं नसल्यानं, मला माझा गांव आणि गावातले नातेवाईक तसे फारसे समजले नाहीत. परतु मी जरी गांवी जात नसलो तरी माझ्या गांववाल्यांचं मुंबईतल्यी माझ्या घरी येणं होत असायचं, म्हणून मला त्यातले काही माहित. प्रमोद, त्याचा थोरला भाऊ अरुण आणि या दोघांचे वडील बाळाप्पा त्यांच्यापैकीच एक. […]
सूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट झाली कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले . […]
तुम्ही परंपरा समजून मंगळसूत्र घालता का ? की सौभाग्याचं लेणं म्हणून ….स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र असलं म्हणजे तिचं रक्षण होतं असं कुठे आहे भर दिवसा विवाहित स्त्रीच अपहरण बलात्कार होतोच आहे . मग शहर असो की खेडे दिल्ली पासून गल्लली पर्यंत हे वावटळ थांबलेलं नाही …. […]
संसारीक जीवनाशी तीळ मात्र सबंध नसताना ते कुंडलीत कसे प्रवेश करतात हेच मला कळतं नाही . राशी ग्रह , जन्म कुंडली , राशी देवता ह्या साऱ्याचा प्रभाव माणसावर पडतंच नाही जशी निसर्गानी मानवाची निर्मिती केली . तशीच निर्मिती सर्व नैसर्गिक घटकांची झाली आपण त्याकडे निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे हे समजून न बघता आध्यत्मिक कल्पना करतं बसने किती मूर्खपणाचे लक्षण आहेत हे समजून येईलच . […]
रफींच्या गायनशैलीचा विचार करता काही ठाम मते मांडता येतील. त्यांचे नाव बहुतेकवेळा तयार स्वरी, सुरेल पण काहीशा नाटकी गायनशैलीशी निगडित झाले. अर्थात, यासाठी त्यांचे काही रचनाकार देखील तितकेच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल. […]
आडगेवाडीत वीस वर्षे तळ देऊन बसलेल्या माळी मास्तरांची बदली झाली आणि त्यांच्याजागी दिवटे मास्तर आले. पहिल्या दिवशीच ते आल्या आल्या एका कारटयाने तक्रार केली, “गुर्जी, आज मुक्या आला नाही.” […]