साहित्य
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
पहिला विमान प्रवास
आपण आयुष्यात अनेकवेळा काही ना काही कारणाने प्रवास करत असतो. प्रवास करणेसाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत असतो. आयुष्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रवासाची गम्मत काही औरच असते. […]
संघर्ष यात्रा
डॉ. अनुराधा यांना आज जिवन सार्थकी झाल्याचे समाधान वाटत होते. त्यांच्या दोन्ही मुलांचे विवाह होऊन ती आता त्यांच्या जिवनात रमणार होती. मोठा मुलगा अमीत एम. डी. झाला होता व त्याने स्वताचे स्वतंत्र हॉस्पिटल सुरू केले होते. त्याने स्वतः मुलगी निवडली होती. तिही डॉक्टर होती. डॉ. अनुराधानी मागच्या वर्षी मोठ्या ऊत्साहात मुलगा अमीत व अनुपमा यांचा विवाह […]
बायका आणि चंद्रावरच्या खड्ड्यांचं रहस्य..
बायका कुणाला, कधी, कुठे आणि काय विचारतील आणि कुठून कुठे पाठवतील याचा थांग ब्रम्हांड निर्मात्या ब्रम्हदेवालाही लागणार नाही, हे मात्र खरं. हे सर्व नाट्य दादर स्टेशनवरच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक चारवर अवघ्या ४५ सेकंदात घडलं. ४५ सेकंद अवधी मुंबई बाहेरची जनता जमेसही धरत नसेल, मुंबईत मात्र या वेळेत चंद्र ते व्हाया पृथ्वी पुन्हा चंद्रावरचा आणखी एक खड्डा एवढा प्रवास सहजपणे होतो.. […]
प्रोजेक्ट – ‘मय्यत’ !
हि माझी कथा -विदूषक १९९९च्या दिवाळी अंकात सु र आळंदकर या नावाने ‘भोवनीच मयत ‘ या शीर्षका खाली लिहली होती. […]
सावली प्रेमाची
अॉफीसमधून घरी आल्यावर नेहमीप्रमाणे बॅग बायकोकडे दिली व फ्रेश व्हायला गेलो. पंधरा मिनिटांत फ्रेश होऊन किचनमधे आलो. तो पर्यंत अंजूचे पोहे तयार झाले होते. मी व अंजू पोहे खात होतो त्याचबरोबर तिची चहाची तयारी चालू होती. मी म्हणालो “अग पोहे तरी शांतपणे खा मग चहा कर.” नको, मला आता इतके वर्ष तुमच्या बरोबर राहून माहिती झालंय की पोहे संपले की शेवटच्या घासाबरोबर तुम्हाला चहा प्यायला आवडतो. […]
माझे आवडते कथा लेखक – आनंद साधले
आत्माराम नीलकंठ अर्थात आनंद साधले यांची ‘ मातीच्या चुली ‘ (आत्मचरित्र ) आणि ‘ हा जय नावाचा इतिहास आहे ‘(महाभारतावरील ) हि पुस्तके चोखंदळ वाचकांच्या नजरेतून सुटणार नाहीत, तुम्हीही ती वाचली असतीलच. पंचाहत्तर वर्ष्याच्या आयुष्यात त्यांनी साठ पुस्तक लिहिली आहेत ! त्यांच्या लेखनाबद्दल लेखक / वाचक मंडळीत खूप प्रवाद आहेत.आपण त्या प्रवादांत न पडता आता फक्त त्यांच्या ‘ हटके ‘ कथान बद्दल बोलू. […]
मैत्रीचे नाते
“मैत्री” म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एखादं छानसं जाळीदार पान आहे.जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातो.आपल्या life index मधला सगळ्यात वरचा कप्पा… […]
माझे आवडते कथा लेखक – पु.ल.देशपांडे
पु.ल.नी विपुल लिखाण केल आहे,पण त्या पेक्षाही त्यांच्या लिखाणावरील लिखाणासाठी इतरांनीच अधिक झरण्या झिजावल्यात! (त्यात अस्मादिक सुद्धा आहेत.) पु.ल.नच्याच भाषेत सांगायचे तर ‘नाका पेक्षा’ उपऱ्या लेखनाचा मोतीच जड! […]
माझे आवडते कथा लेखक – द.मा.मिरासदार
द.मा.मिरासदार यांचा कथांची वैशिष्टे किती आणि कशी सांगावीत? त्यांची कोणतीही कथा घ्या. ती एक सारखी चालूच रहावी आणि ती आपण ती सारखी ऐकत राहावी असे वाटते. त्यांची कथा एकाच वेळेस वात्रट आणि गंभीर असू शकते. त्यांच्या कथा गोष्टी वेल्हाळ असतात पण कंटाळवाण्या नसतात. त्यांच्या कथात एक मिस्कीलपणाची झाक असते. कथा कधीच एकसुरी होत नाही. एक गमतीदार विक्ष्कीप्तपणा त्यात भरलेला असतो. […]
