तिची गाडी गचके खात, थोडी वेडीवाकडी होत थांबली. त्या थंडीतसुद्धा निशाला चांगलाच घाम फुटला. ‘आधीच उल्हास नी त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था झाली. तिनं गाडी थोडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि मोबाईलच्या उजेडात ती गाडीला काय झालं ते पाहू लागली. […]
जीवनरंगाचे नाविन्य रोज नवे असते, वेगळे असते आणि वैशिष्ट्येपूर्ण देखील असते. काल पाहिलेले जीवनरंग आज आपल्याला दिसत नाही, रोज ते नवे असतात. उगवणारा सूर्य तोच असतो मात्र रोज तो नवे रुप घेऊन, नवे तेज घेऊन येत असतो. […]
भाग एक निशा, 22 वर्षाची, गहूवर्णाची, कुरळ्या केसांची, रेखीव बांधा, हसरा चेहेरा, डोळ्यावर चष्मा असलेली, थोडीशी मितभाषी मुलगी, घरातून बाहेर पडण्यासाठी आवरत होती. तिनं लाल रंगाचा टॉप, निळ्या रंगाची जीन्स घातली होती. त्यावर लेमन कलरचा, फुलांची सुंदर प्रिंट असलेला मोठ्ठा स्टोल घेतला होता. तिची सॅक तिनं पाठीवर अडकवली होती. तिच्या स्कूटरची चावी तिला मिळत नव्हती त्यामुळे […]
आजपर्यंत भयंकर संकट आली.. पण निश्चल असणाऱ्या मुंबईने आपली जीवन रेखा असणारी… ‘लाईफ लाईन’ नावाने परिचित असणारी ही रक्ताची शिर कधीच बंद झाल्याचे पाहिले नव्हते. अविरतपणे चालणारी, मृत्युशी झुंज देणारी, संकटाशी भिडणारी लाइफलाइन दहशतवादी हल्ला, महापुरात सुद्धा बंद झाली नव्हती… आणि आज कित्येकांची पोटं भरण्यासाठी त्यांना तारण्यासाठी निरंतर धावणारी ‘ती’आज शांत पहुडली आहे. […]
अशा वेळी कोणाला कोरोनाची लागण झाली तर काय होईल ह्या भीतीने प्रत्येकजण हादरला आहे. जहाजावर कोणी नवीन माणूस येऊ नये असे सुद्धा प्रत्येकाला वाटत आहे. नवीन येणार असतील तर सगळ्यांनाच एकदम जाऊ द्या असेही काहीजणांना वाटते आहे. परंतु हे शक्य नाही कारण प्रत्येक जण हेल्पलेस आहे. […]
माझ्या खूपशा अप्रकाशित कथानकांचा नायक म्हंटल तर वावगं ठरणार नाही, अशा जीवलग मित्रांवर काही चार पाच टिपण्या कराव्या असं सतत वाटत होतं… पण सतत शैक्षणिक कामाची माझी व्यस्तता अन् त्यात म्हणजे औचित्य सापडंना हे महत्वाचं……….. आपल्या जवळच्या व्यक्तीचं आस्तित्व, त्याची गरज समजण्यासाठी (थोडक्यात चिंतन) थोडेच क्षण असतात त्यामध्ये आत्ता वाढदिवसाची भर पडली….झुकेरबर्ग दादाच्या फेसबुक वर असंच […]
एक चिमणी एका शहरात रहात होती. तिच्या सोबत तिची मुलगी, म्हणजेच छोटी चिमणी (चिऊताई) सुद्धा होती. कधी एखाद्या बिल्डिंगच्या खिडकीच्या कोपर्यात त्यांचा निवास असायचा, तर कधी एखाद्या पाईपमध्ये. […]
एक विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भरताना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर. […]
एखाद्यावर भरभरून प्रेम करणाऱ्याला प्रेमाच्या बदल्यात कधी कधी प्रेमच मिळतं नाही. मग त्याची मानसिकता प्रेम करणाऱ्यांच्या आणि प्रेमाच्याही अगदी विरोधी बनते. आणि त्याचा प्रेमावरून विश्वास उडतो. मग तो एकेवेळी प्रेमात वेडा झालेला प्रेमीक प्रेमाचा विरोध करतो आहे असं आपल्याला भासतं. […]
मनाला शांत करणाऱ्या या भजनाच्या ओढीने जेंव्हा ज्ञानमंदिराकडे मन धाव घेते तेंव्हा, अंगात चिंध्यांचा अंगरखा, एका कानात फुटक्या बांगडीची काच आणि डोक्यावर मडके घेतलेल्या एका पुरुषसिंहाचे दर्शन घडते… ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज अर्थात संत गाडगेबाबा …. […]