नवीन लेखन...

जीवनरंग

‘जिंदगी का सफर, है ये कैसा सफरकोई समझा नही, कोई जाना नही..’

जीवनाविषयी भाष्य करणारं हे गोड गाणं. खरतर जीवन देखील गाण्या सारखंच आहे. मात्र कधी त्याचा सुर लागतो तर कधी सुर लागतच नाही. ज्यावेळी सुर लागतो त्यावेळी जीवनाचे माधुर्य लक्षात येते. त्याचा गोडवा कळू लागतो.

जगण्याची नवी आस निर्माण होते. जीवनातील विविध रंगांची मनावरील मोहिनी अधिक गडद आणि स्पष्ट होत जाते. जीवनाचे हे रंग हळूहळू उलगडू लागतात. त्यातील रंग मनाला मोहिनी घालू लागतात. पण जेव्हा केव्हा जीवनगाण्याचे सूर जुळत नाही तेव्हा मात्र चित्र पालटतं. तेच जीवनरंग निरस वाटु लागतात. सुरातील ती जादू हरवत चाललीय असेच वाटु लागते. हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी नको वाटू लागतात… कशामुळे हे होत असलं पाहिजे.. हा खरा शोध आहे… अर्थात आपला आपणच घ्यायचा असतो तो. मनाच्या तळाशी खोल खोल उतरून… तरीही

जीवन सुंदर आहे. विविधरंगी आहे. विविध घटना घडामोडींनी भरलेलं आहे. त्यात नाविन्य आहे, कारुण्य आहे, हसू आहे, आनंद आहे, कला आहे, संस्कृती आहे, संगीत आहे, चित्र आहे, हसणं आहे, रुसणं… सगळं.. अगदी सगळं काही आहे जीवनामध्ये. हे इतकं वैविध्य जीवनात असल्याने त्याच्या प्रवासाबाबत आपण भाष्य करूच शकत नाही. तिथे आपल्या मर्यादा फिक्या पडतात.

पण तरीही जीवन आपल्याला हवेसे वाटते. आपले वाटते. जीवनरंगात अखंड डुंबून जावेसे वाटते. जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक मुक्काम येत असतात. काही चांगले असतात. काही वाईट असतात. काही मुक्कामाचे क्षण डोळ्यापुढुन, मना पुढुन सरकतच नाहीत. ते कायम मनाच्या कप्प्यात कोरले जातात. त्यांच्या आठवणी तशाच कायम राहतात… अगदी स्पष्ट सूर्य प्रकाशा इतक्या लख्ख… काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक विसरतो. ते आपल्याला नकोच असतं. काही गोष्टी मनाला त्रास देणाऱ्या असतात, जीवनरंग विखुरणाऱ्या असतात म्हणून त्या नकोशा वाटतात..

जीवनरंगाचे नाविन्य रोज नवे असते, वेगळे असते आणि वैशिष्ट्येपूर्ण देखील असते. काल पाहिलेले जीवनरंग आज आपल्याला दिसत नाही, रोज ते नवे असतात. उगवणारा सूर्य तोच असतो मात्र रोज तो नवे रुप घेऊन, नवे तेज घेऊन येत असतो. त्याची उगवण्याची पद्धती जरी तीच असली तरी त्यात नाविन्य असते, वेगळेपण असते, जीवनाबद्दलची ओढ असते. ही ओढच माणसाला जीवन जगण्याला भाग पाडत असते. या ओढीमुळेच कदाचीत जीवनरंगाची रंगाची ही सावली मनावर कोरली जात असावी.

जीवनरंग वेगळे असले तरी माझे म्हणूनही वेगळं जीवन असतेच म्हणा आणि ते आतल्या पातळीवर वेगळेच रंग धारण करणारं असतं. कुठेतरी सूर्याची कोवळी किरणं सर्वत्र पसरत असताना मनाच्या पातळीवर निराशेची वेगळीच अनुभूती येत असते. कुठेतरी टपोर चांदण्यात बसलेलो असतानाही एकटेपणाची तिव्र जाणीव निर्माण होते. जीवनरंगाची ही दोन टोकं आपल्याला अनेकदा अनुभवायला मिळतात. अशा अनेक प्रसंगातून प्रत्यक्ष आणि अंतरातलं जीवन वेगळंच असल्याचं वारंवार जाणवू लागतं. हे जाणवत असताना मग पुन्हा एका चांगल्या गाण्याची आठवण होते…

सूर मागू तुला मी कसा ?
जीवना तू तसा मी असा…
तू मला मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दु:ख माझातुझा आरसा..
जीवना तू तसा मी असा…

– दिनेश दीक्षित (२ ऑगस्ट २०१८)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..