मुक्ती बाहिनी (वाहिनी) प्रसिद्ध नेता बागा सिद्दिकी किंवा टायगर सिद्दिकी अब्दुल कादीर सिद्दीकी म्हणून तो प्रसिद्ध होता. (श्रीलंकेचा तामिळ नेता प्रभाकरनप्रमाणे) तो फक्त २७ वर्षांचा तरुण होता. इतिहास शिकतानाच मुक्ती बाहिनीचा नेता बनला. त्यावेळच्या बांगलादेशामध्ये त्याची जबरदस्त क्रेझ व पावर होती. तेव्हा त्याच्या हाताखाली सतरा हजार तरूणांची सेना होती. शासनामध्ये कुठल्या पदावर नव्हता. पण प्रचंड दबदबा होता. सगळं शासन त्याच्यासाठी खुलं होतं. पंतप्रधान व राष्ट्रपती यांचे दरवाजे त्याच्यासाठी कायम खुले होते. […]
शिवापूर गांव सहयाद्रीच्या कुशीत वसलेला.वळणा वळणाच्या रस्त्यानी वेढलेल्या या गांवचा सौंदर्य काय सांगायचा. मनोहर मनसंतोष गड, रांगणा गड या सारख्या गडाच्या पायथ्याशी वसलेल्या या छोटयाश्या गांवात गणेश नार्वेकर नांवाचो व्यक्ती रहायचो. घर तसा मातयेचाच. पण नळयांनी शाकारलेला. लोक आवडीन त्येका गणो नार्वेकार म्हणान ओळखत. घरात आवशी बापाशी सोबत गणो – हवा. […]
प्रत्येक विवाहित पुरुषाच्या आयुष्यात बायको माहेरी जाणे असे आनंदाचे प्रसंग येतात. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी असा प्रसंग आला आणि तिला एकट्यालाच माहेरी जाणे आवश्यक असेल तर तशी (खुश) खबर बायकोच तुमचा मूड बघून अतिशय लाडीकपणे सांगते. काही वेळेस तुम्हाला देखील सोबत येण्याचे आग्रही निमंत्रण असते. तुम्हाला ऑफिसच्या कामातून सुटी मिळणे अशक्य असेल तर सूट मिळू शकते. पण अशा वेळेस तुमच्या कौशल्याचा कस लागू शकतो. […]
सृष्टीमध्ये प्रारंभ आणि अंत हे चक्र सदैव सुरूच असतं. एखाद्या रोपट्याचंच उदाहरण घेऊया. पहिला कोंब फुटतो आणि प्रारंभ होतो रोपट्याचा. तो कोंब उमलतो, ज्याला आपण पान असं म्हणतो. अगदी हिरवंकंच असतं ते. कालपरत्वे उत्कर्षबिंदूनंतर हळूहळू पानाचा रंग बदलायला लागतो आणि नंतर ते पान सुकायला लागतं आणि एके दिवशी ते पान गळून पडतं. पानाचा रंग बदलायला सुरूवात होणे आणि ते सुकायला लागणे ही झाली निवृत्ती. […]
कॅनडात मी जे पाहिलं, अनुभवलं ते कधीच विस्मृतीत जाणारं नव्हतं! मी जेंव्हा एकांतात बसतो तेंव्हा एकएक गोष्ट माझ्या नजरेसमोरून तरळू लागते. माझ्याशी बोलू लागते. तिथल्या निसर्गाची किमया व निसर्गाशी अनुरूप मानवनिर्मित कलाकृती मनाला भुरळ घालतात, एक अनोखा आनंद देऊन जातात. त्यापैकीच एक अविस्मरणीय पर्यटन क्षेत्र म्हणजे अटलांटीक महासगराच्या किनारपट्टीवरील पेगीची खाडी (पेगीज कोव्ह) व शतकाचा शाक्षिदार ठरलेले तिथले लाईट हाऊस! […]
एखाद्या संहितेचं भागधेय असतं. प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही. पण मी नाराज नाही. कारण माझी संहिता दमदार आहे. कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे. दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी मिळणार आहे आणि … आणि बरंच काही आहे त्या संहितेत. […]
हा पुर्ण भाग विंद्य पर्वत रांगेमुळे घनदाट झाडीचा आहे. मंडल्याच्या दक्षीणेलाच प्रसिध्द कान्हा किसली अभयारण्य आहे. कान्ह्याचा हा भाग तसा नर्मदेच्या खुप जवळ नाही पण हे घनदाट जंगल पुर्वी असलेल्या समुद्राच्या जवळते मुळे असु शकते. […]
त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कथा , कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या आणि मला स्वतःची अशी ओळख दिली. त्यावेळी महाराष्ट्रभर जाणाऱ्या माहेर , मेनका या लोकप्रिय मासिकांमधून आणि रविवारची जत्रा या लोकप्रिय साप्ताहिकामधून त्यांनी मला प्रचंड प्रसिद्धी दिली ,जी रत्नागिरीसारख्या ठिकाणी असणाऱ्या मला दुर्मिळ होती. यथावकाश अन्य पुस्तकं प्रसिद्ध झाली. मानसन्मान , पुरस्कार लाभले. पण त्या पहिल्या पुस्तकाच्या आठवणी काही औरच! […]
आम्हाला मुजीबुर रहमान यांचे पहिले दर्शन झालं ते एका कुठल्यातरी कार्यक्रमात! ते व्यस्त होते. त्यावेळी त्यांच्या बाजूला कोणी जवळ जाऊ नये म्हणून बॉडीगार्ड होते. संबंधिताशी आम्ही बोललो. दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी भेटायला वेळ दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांच्या घरी ३२ धनमंडी या पत्त्यावर गेलो. तो दोन मजली बंगला होता. सकाळी त्यांच्यासोबत चहा घेतला. त्यांनी आमचं कौतुक केलं आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला. अतिशय प्रसन्न सहृदय आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. इतका साधा प्रेमळ माणूस अशा लढ्याचे नेतृत्व करू शकतो? यावर विश्वास बसत नव्हता. पण ते सत्य होतं. […]
तात्या म्हणजे त्यावेळचे काँग्रेसचे खासदार मोरोपंत जोशी. नवकोकण या नावाच्या साप्ताहिकाचे ते मालक , मुद्रक , संपादक होते. तेव्हा आम्ही टिळक आळीत रहात होतो. नवकोकण चा छापखाना आणि कार्यालय टिळक आळीत होते. तात्यासुद्धा टिळक आळीत राहायचे. ते वृद्ध होते , राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याबद्दल सर्वाना आदर होता. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते काहीतरी लिहीत होते . मी त्यांना हाक मारली . तेव्हा चष्मा थोडा पुढे ओढून त्यांनी माझ्याकडे पाहिले . […]