कथा लिहिताना फ्लॅशबॅक तंत्राचा , वर्तमानातल्या भानाचा , छोट्या छोट्या प्रसंगांचा , आशयघन संवादाचा उपयोग केल्याने कथेला वेगळी गती प्राप्त झाली . कथेतील किचन , आरसा , बस ही सगळी पात्रं म्हणून अवतरली . १९९९ मधली कथा असली तरी आत्ताच्या गतिमान युगातील जोडप्यांची व्यथा मांडणारी कथा म्हणून आजही ती तितकीच वाचनीय वाटते . आजही ड्रॉवर उघडला की ड्रॉवर ची निर्मिती प्रक्रिया आठवते. […]
वाटलं , आपण आपल्याच काही निवडक कथांकडे अलिप्तपणे पाहिलं तर … त्या कथांचा सांगोपांग विचार केला तर… लेखन करताना , कथा प्रसिद्ध झाल्यावर , त्यावर वाचकांचा प्रतिसाद लाभल्यावर जसा आनंद मिळत होता , तसा आता इतक्या वर्षांनी , जरा वेगळ्या पद्धतीने कथांकडे पाहिल्यावर आनंद मिळू शकतो. तोच हा प्रयत्न आहे. कथा सांगोपांग ! […]
तसं पाहिलं तर ब्रम्हांड आठवणे, तोंडचे पाणी पळणे, पायात गोळे येणे, मटकन बसणे, जीव भांड्यात पडणे वगैरे शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकतो, कधीमधी त्यातल्या एखाद्याचा आपल्याला अनुभवही येतो. पण या सगळ्याच्या सगळ्या अवस्थांचा अनुभव पंधरा वीस मिनिटात येणे हे तसे दुर्मिळच. आम्हा उभयतांना मात्र हा अनुभव आला. त्याचं झालं असं – […]
दात दुखी अन कानदुखी या दोन दुखण्याचं सूर्यनारायणाशी काय वैर्य आहे माहित नाही. हि दोन दुखणी सुर्यास्थानांतर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर, जेवण खाण करून अंथरुणाला पाठ टेकवली कि डोकं वर काढतात! कानातला ठणका आणि दाढेची कळ साधारण रात्री अकरा नंतर जोर धरते! का माहित नाही. आमच्या लहानपणच्या सगळ्या गोष्टी बदलून गेल्यात. पण या दोन दुखण्याच्या वेळात काडीचाही फरक पडलेला नाही! […]
डॉक्टर आणि शिक्षकी पेशा हे दोन थोर व्यायसाय आहेत. याना नोबल व्यवसाय म्हटलं जात. माझा एक मोठा भाऊ इंजिनियरला होता. त्याकाळच्या अपेक्षेप्रमाणे एक पोरगा इंजिनियर आणि एक डॉक्टर असावा हि आमच्या घरच्यांची पण इच्छा होती. पण ‘आशा हे दुःखाचे मूळ कारण आहे!’ हे तत्व, ते जरी विसरले असले तरी, नियती विसरली नव्हती! आणि मलाच मुळात ‘शिक्षक’ व्हायचे होते! […]
इथ शाकाहार कि मांसाहार किंवा काय चांगल काय वाईट ? हा विषय च नाहीये. कोणी काय खाव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण एवढच सांगण आहे कि कोणाच्या दबावाखाली किंवा एखाद्या बंधनात अडकून आपल मन मारू नका .. […]
‘डॉक्टर म्हणजे डॉक्टर असतो, तुमचा आमचा सेम असतो!’ असं कोण म्हणत? तर असं मीच म्हणतो. मंगेश पाडगावकरांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत.’ या त्यांच्या कवितेला रट्टाऊन टाळ्या दिल्या तशी दाद माझ्या वाक्याला देणार नाही हे मी जाणून आहे. कारण तुम्ही म्हणाल, ‘याला काय माहित आमचे डॉक्टर?’ हे अगदी खरं आहे. पण मला माझे काही डॉक्टर चांगलेच माहित आहेत. ते मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही तुमचे डॉक्टर त्यांच्याशी ताडून पहा. काही साम्य सापडले तर मात्र, टाळी द्यायला विसरू नका. […]
मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘ ऊठ लेका, जागा हो, तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे, त्यांना म्हणावे, हे आमचे सर्वसामान्यांचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी. तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस, हे बरे. म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’ […]
मी प्रथम समुद्र पाहिला तो….. अरबी समुद्र ! बी.एड्.च्या शिक्षणासाठी एक वर्ष कारवारला होतो. रोज सायंकाळी बीचवर जायचो. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या जिवाला तिथे कांहीसा गारवा मिळायचा. पुढे गोवा, मुंबईला जायचा अनेकवेळा योग आला नि अरबी समुद्राचे दर्शन वारंवार घडत गेले. परंतु महासागराचं महाकाय रूप पहायला मिळालं ते कॅनडामध्येच! कॅनडाला जशी समुद्र किनारपट्टी लाभली आहे, […]