जालना शहराच्या रस्त्यावरील कलंदर कवी : शम्स जालनवी
जालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलतेसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायऱ्यासाठीही परिचित आहे. […]
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
जालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलतेसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायऱ्यासाठीही परिचित आहे. […]
आपली भारतभूमी ही साधुसंतांच्या वास्तव्याने पावन झालेली मंगलभूमी आहे. ईश्वरी साक्षात्कार हेच सर्वोच्च मूल्य मानून त्याच्या प्राप्तीसाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले अशा हजारो सत्पुरुषांची ही कर्मभूमी आहे. […]
एक चित्रकार होता. फारच सुंदर अशी चित्रे काढायचा तो. त्याची चित्रे पाहून लोक अत्यंत प्रभावीत होत असत. दूरवर त्याची ख्याती पसरली होती. त्यानं काढलेलं चित्र प्राप्त करण्यासाठी लोकांची नेहमी धडपड चालत असे. या प्रतिभावान कलावंताचे चित्र मिळविण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी लोक दाखवीत. प्रचंड अशी लोकप्रियता, प्रसिद्धी अन् पैसा मिळाला तरी हा चित्रकार अहंकारापासून दूर होता. त्याचा स्वभाव अगदी सरळ होता. त्याला पैशाचा मोह मुळीच नव्हता. एखादा रसिक त्याच्या चित्रासाठी मोठी रक्कम द्यायला असमर्थ असला तर तो त्याची अडवणूक करीत नसे. तो देईल त्या रकमेत आपलं चित्र त्याला देऊन टाकी. कमविलेल्या संपत्तीचा बराचसा भाग तो रंजल्या-गांजलेल्यांना मदत करण्यात खर्च करीत असे. […]
एक म्हातारी बाई तिनं घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकीसुनांना न्हाऊ घातलं. गाईवासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं. चार तांदुळाचे दाणे घेतले. दोन बेलाची पानं घेतली आणि वाटीभर दूध घेतले. दुपारी म्हातारीबाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. “जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं; तुझा गाभारा भरला नाही. माझ्या वाटीभर दुधाने भरणार नाही. पण मी आपली खुलभर दूध भक्तीनं अर्पण करते.” […]
शक्ती, युक्ती, बुद्धी आणि कणखर मनगटातील दमदार समशेरीबरोबरच या ज्ञातीच्या लेखन चातुर्याच्या अनेक बाबींबरोबरच समयसूचक योग्य व कमी लेखात खोचक, बोचक आणि भावनात्मक लिखाणशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे सी. के. पी. ज्ञाती असे समीकरण इतिहास पूर्व काळापासून ऐकायला व वाचायला मिळते. परंतु आज आपला समाज नेमका कुठे आहे? राजकीय किंवा सामाजीक समीकरणात त्याचे नेमके स्थान काय? […]
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात असे. तो दारिद्र्याने फारच त्रासलेला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. तिनं आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीने तिला शुक्रवारचं व्रत संगितलं. ती म्हणाली, “ बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास धरावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावेत, तिला हळद कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी. […]
श्रावण म्हणजे काळ्या मातीला पडलेलं हिरवं स्वप्न. वृक्षवेलींनी टाकलेली कात म्हणजे श्रावण. काळ्या मातीशी गूज सांगणारा ऋतु म्हणजे श्रावण…. नव्या उल्हासाला उधान आणणारा ऋतु म्हणजे श्रावण…या श्रावणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच… […]
कवडी (संस्कृत: कपर्दिका; इंग्रजी: Cowry) हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर डाव टाकण्यास करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गाई, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवडयांचा वापर करण्यात येतो. जुन्या काळी कवडीचा उपयोग नाणे म्हणून करीत […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions