नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

कुछ तो गडबड है

एका सकाळी महेशचा फोन आला व त्यानं डेक्कनवरील हाॅटेल ‘परिचय’मध्ये आम्हाला भेटायला बोलावलं. आम्ही दहा वाजता रुमवर पोहोचलो. महेश भेटला. चर्चा झाली. एवढ्यात त्या रुममध्ये एका धिप्पाड व्यक्तीने प्रवेश केला. आम्ही त्यांच्याकडे पहातच राहिलो. महेशने आमची त्यांच्याशी ओळख करुन दिली, ‘शिवाजी, हे नावडकर बंधू. आपल्या चित्रपटाची पब्लिसिटीचं काम करताहेत.’ […]

कैलास दर्शन – भाग 1

गोष्ट फार जुनी आहे. चाळीस वर्षे झाली त्या गोष्टीला. मी सरकारी नोकरीत होतो. उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ औरंगाबाद विभाग प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली होती तेव्हाची. […]

एक परीस स्पर्श… ( भाग – १९ )

दिव्या आणि विजयची भेट एका पतपेढीत झाली होती. आणि ती विजयच्या बाबांच्या ओळखीची होती. विजयच्या आयुष्यात आलेली ती सर्वात बिनधास्त मुलगी होती. म्हणजे कोणा मुलासोबत बोलताना आपल्याला कोणी पाहिलं तर वगैरेची तिला अजिबात चिंता नव्हती. […]

अनवट पर्यटन – (उगवता छत्तीसगड – १)

मध्य प्रदेश राज्यातील दहा छत्तीसगढी आणि सहा गोंडी भाषिक दक्षिण-पूर्व जिल्ह्यांचे विभाजन करून १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड या राज्याची स्थापना झाली. रायपुर हे छत्तीसगड राज्याचे राजधानीचे शहर. छत्तीसकिल्ले असलेले राज्य म्हणून ह्या राज्याला छत्तीसगड असे नांव दिले. ह्या प्रदेशाचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून होता. वैदिक आणि पौराणिक काळापासून छत्तीसगड अनेक संस्कृतीच्या प्रगती आणि विकासाचे केंद्र होते. येथील पुरातन मंदिरे आणि त्यांचे अवशेष असे दर्शवित आहेत की वैष्णव, शैव, शक, बौद्ध संस्कृतीचा विविध काळात ह्या प्रदेशावर प्रभाव होता. […]

रंगीबेरंगी

श्रावणात येणारी नागपंचमी. पावसाळ्यात सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत असतो. आणि लेकींना माहेरची ओढ लागते. पंचमीचा सण येईपर्यंत खूपच वाट पहात असते. माहेरी गेल्यावर तिचे अल्लड वय. झाडांना बांधलेले झोके. त्यावर बसून गाणी म्हणते उंच माझा झोका. […]

कम्पॅनियन गोमु (गोमुच्या गोष्टी- भाग १)

रविवारी गोमु बावाजीला खुर्चीवरून बागेंत म्हणजे सीबीडीच्या मॅंगो गार्डनमध्ये घेऊन गेला होता. तो अगदी काळजीपूर्वक खुर्ची ढकलत होता. अचानक बागेंत त्याला शकु दिसली. ती “अभ्यंकरांची शकु” अशी ओळख गोमुने मला दिली पण त्याआधीच मला ती आठवली होती. आधी आमच्या शाळेत आणि मग माझ्या कॉलेजमध्ये ब्यूटी क्वीन होती. मी आणि गोमु बालपणापासून तिला ओळखायचो. ती दिसल्यावर गोमुचं भान हरपणं साहाजिक होतं. तिच्याशी बोलतां बोलतां तो बावाजीलाच काय पण खुर्चीलाही विसरला. […]

सुरा मी वंदिले

सदाशिव पेठेत असताना घरात रेडिओ नव्हता. समोरच्या जबरेश्वर हाॅटेलमध्ये बुधवारी ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम मोठ्या आवाजात लावला जात असे. तेव्हा अमीन सयानीच्या टिपीकल बोलीतून दहापासून पहिल्या ‘पायदान’पर्यंत एकेक गाणी ऐकलेला आशाताईंचा आवाज अजूनही कानात गुंजतो आहे. […]

गुरुदक्षिणा

गुरुकुल शिक्षण पद्धतीत शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुंच्या आज्ञेनुसार विद्यार्थी स्वगृही जायचे. तिथे अध्यापनात सर्वांगीण विकास होण्याचे संस्कार केले जात असे. अशी ही एक पद्धत होती की गुरुकुल सोडून जातांना गुरुदक्षिणा दिली जायची. ती पण ऐच्छिक व ऐपतीप्रमाणे. […]

‘पाऊल’ आणि ‘पाय’

जेव्हा मराठीच्या अस्मितेबद्दल सांगायचे असते तेव्हा ‘मराठी पाऊल, पडते पुढे’ असे अभिमानाने आपण म्हणतो. दरवर्षी वारकरी आषाढीला पंढरपूरला पायी वारी करतात, तेव्हा त्यांच्या तनामनात एकच ध्यास असतो तो म्हणजे ‘पाऊले चालती, पंढरीची वाट..’ ती ‘पाऊलेच’ त्यांना विठ्ठलाच्या पायापर्यंत घेऊन जातात. […]

थेंब

सकाळच्या प्रहरी प्रसन्न होऊन अनवाणी पायांनी गवतावर चालताना दवबिंदू पायाला गुदगुल्या करतात आणि दिवसभर त्या जाणिवेचे हसु येतं. आळवावरचा थेंब पाहून बरेच जण बरेच काही अर्थ काढतात. शेवटी थेंबच आहे तो रुप लहान पण अर्थ महान. […]

1 173 174 175 176 177 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..