नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

पुरखुती मुक्तांगण (उगवता छत्तीसगड – २)

हा संपूर्ण परिसर म्हणजे एखादे नन्दनवनच आहे. सूर्यास्ताच्या संधीप्रकाशात उजळून जाणारा जलाशय म्हणजे चित्रकाराचे दिवा स्वप्नच आहे असे वाटते.जलाशयाच्या बाजूनी उत्तम बाग, नाना तर्हेच्या फुलांचे,  हिरव्यागार झुडपांचे ताटवे ह्यांची लागवड केली आहे. हा नयनरम्य आनंद मनमुराद लुटण्यासाठी छत्तीसगडपर्यटन विभागाने  शिशवी रंगात राहण्यासाठी  प्रशस्त कॉटेजीस् तयार केली आहेत. […]

शेअर बाजारात उडी (गोमुच्या गोष्टी – भाग २)

पाच सहा दिवसांनी सुरेश मेहता मला शोधत आला. गोमु माझ्याबरोबरच होता. सुरेशला कसा चुकवतां येईल ह्याचा मी विचार करत होतो. त्याला न सांगता त्याच्या पाहुण्याशी व्यवहार केला होता, त्यामुळे किंचित अपराधीपण वाटत होतं. पण सुरेश सरळ आमच्याकडेच आला. […]

सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

असो. विषय वासाचा आहे. नाकाला सुगंध न येणे हे कानाला संगीत न कळण्या  इतकेच दुर्दैवी आहे. आणि हे दोन्ही एका व्यक्तीत एकवटणे म्हणजे दुर्दैव-परमावधीच म्हणायची. सकारात्मकच बोलायचे असेल तर वास न येणे याचेही वेगळे फायदे असतातच. असो. पण विषय (सु)गंधगप्पांचा आहे. मूलतः ‘सुगन्धिं पुष्टिवर्धनम्’ हा शब्द समुच्चय महा-मृत्युंजय मंत्रातील महेश्वराला उद्देशून असला तरी मोठा मौलिक आणि मानवी मनाला मोहविणारा, जवळचा आहे हे त्रिकालाबाधित सत्य –  म्हणूनच केवळ हा गंध पुराण-प्रपंच. […]

मी मराठी माझीही मराठीच

२७ फेब्रुवारीला दरवर्षी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा केला जातो. मराठी भाषेचे गोडवे सांगणाऱ्या ‘पोस्ट’ एकमेकांना टाकल्या की, वर्षभराचं ‘मराठी भाषेबद्दल प्रेम दर्शविण्याचं’ काम होऊन जातं असा कित्येकांचा समज आहे. खरंतर उजाडणारा प्रत्येक दिवस हा मराठी भाषेचाच मानला गेला पाहिजे. तरच ही ‘अमृताहून गोड’ भाषा टिकून राहील. सकाळी उठलं की, ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती l करमुले […]

कैलास दर्शन – भाग 2

ठरल्याप्रमाणे खानसाहेबांकडून कार्यभार घेतला. त्यांना निरोप दिला आणि आम्ही खुलताबादल जायला तयार झालो. देशपांडेंनी गाडी मागवली. एक जुनाट जीप गाडी आली. […]

एक परीस स्पर्श ( भाग – २० )

आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे विजय सूक्ष्म निरीक्षण करत असल्यामुळे त्याला कळले की बऱ्याचदा त्याच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात आणि त्याच्यावर येणारे संकट टळते. कारण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी देवाला नाही तर आपल्या प्रारब्धाला गृहीत धरले. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी विनाकारण घडत नाहीत यावर विजयचा आजही विश्वास आहे म्हणूनच तो कोणत्याही परिस्थिती स्थिर असतो. […]

सतत DOING व्हर्सेस काहीवेळ BEING !

सारखे DOING करत असू तर दिवसातील काहीवेळ तरी BEING साठी आपण राखून ठेवतो का? याचं कारण असं की आपणांस आसपास आवाजाची, गोंधळाची इतकी सवय झाली असते की थोडावेळ जरी शांतता असली तर आपण दचकतो/भांबावतो. आजूबाजूला काही नसेल तर आपल्याला कसंनुसं होतं. कामातून बाहेर पडून या शांततेला कवटाळलं तर आपल्याला चैन पडत नाही. […]

आजारपण.. नको रे देवा !

काही जुने किस्से सांगणार होते; पण फ्रेश स्टॉकसुद्धा तयार झालाय! …म्हणजे काय.. तर कोरोनातून अगदीच उठतोय आम्ही..! हा आजारपणाचा अनुभव माझ्या मुलींसाठी खास् होता. गेली दोन वर्षे घरात सुरक्षित राहून साधा सर्दी खोकला सुद्धा मुळी नव्हता, आणि आता झालं ते एकदम सगळंच! शिशुवर्गांत जायला लागल्यापासून अगदी नेमाने २-३ महिन्यांतून एकदा दोघी किंवा दोघींपैकी एक, कसलंसं इन्फेक्शन घेऊन यायची, आणि मग सगळं घर झोपायचं..! …सांगते! 🙂 […]

कुछ तो गडबड है

एका सकाळी महेशचा फोन आला व त्यानं डेक्कनवरील हाॅटेल ‘परिचय’मध्ये आम्हाला भेटायला बोलावलं. आम्ही दहा वाजता रुमवर पोहोचलो. महेश भेटला. चर्चा झाली. एवढ्यात त्या रुममध्ये एका धिप्पाड व्यक्तीने प्रवेश केला. आम्ही त्यांच्याकडे पहातच राहिलो. महेशने आमची त्यांच्याशी ओळख करुन दिली, ‘शिवाजी, हे नावडकर बंधू. आपल्या चित्रपटाची पब्लिसिटीचं काम करताहेत.’ […]

कैलास दर्शन – भाग 1

गोष्ट फार जुनी आहे. चाळीस वर्षे झाली त्या गोष्टीला. मी सरकारी नोकरीत होतो. उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ औरंगाबाद विभाग प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली होती तेव्हाची. […]

1 171 172 173 174 175 489
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..