नवीन लेखन...

गुरुदक्षिणा

गुरुकुल शिक्षण पद्धतीत शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुंच्या आज्ञेनुसार विद्यार्थी स्वगृही जायचे. तिथे अध्यापनात सर्वांगीण विकास होण्याचे संस्कार केले जात असे. अशी ही एक पद्धत होती की गुरुकुल सोडून जातांना गुरुदक्षिणा दिली जायची. ती पण ऐच्छिक व ऐपतीप्रमाणे. नंतर काळ बदलत गेला. शिक्षणाचे सार्वत्रिककरण सक्तीचे झाले. सरकारी. खाजगी. तर काही ठिकाणी गुरुकुल पद्धतीने शिक्षण सुरू झाले.
दहावीच्या परीक्षेआधी विद्यार्थ्यांना निरोप दिला जायचा आजही ही पध्दत आहे. आमच्या काळी या समारंभाला सगळे विद्यार्थी जमल्यावर शिक्षक मुलांना उपदेश करायचे आणि विद्यार्थी रडायचे. शाळा सोडायची म्हणून. परत काळ बदलला मुलांना आता या दिवशी उपदेशा बरोबरच खाऊ किंवा जेवण दिले जायचे . मग विद्यार्थी पैसे जमवून शाळेला एखादी वस्तू भेट द्यायचे. त्यात. घड्याळ. घंटा. नकाशे असे काहीतरी. गरजेनुसार. आणि शाळेत नोंद ठेवली जायची.हे सगळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच.
आता हे सांगतांना मला खूप आनंद होतो आहे याचा. माझी मोठी मुलगी सौ. अनुराधा कुलकर्णी हीने एका ग्रामीण भागात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. आणि ही शैक्षणिक वेल गगनावर जात आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला आहे. त्यांना स्वखर्चाने अल्पोपाहारा सह हाही एक उपक्रम पार पडला आहे. कारण या वर्षी शाळा ऑनलाईन होती म्हणून अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत. मुलांनी पैसे जमवून शाळेतील मैदानावर रोपे लावली आहेत.
आत्ताची पिढी खरच खूपच हुशार. आणि जागरूक आहेत. परिस्थितीचा साधकबाधक विचार करून काळाची गरज ओळखून ही रोपे दिली आहेत. मला वाटते की त्यांच्यातील सूज्ञ नागरिक उदयाला येत आहेत. शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे आजुबाजुला सुंदर निसर्ग सौंदर्य आहे आणि मुख्य म्हणजे तिच्या मालकीची जागा आहे म्हणून आता शाळेत गरज आहे ती मोकळी शुद्ध हवा. सावली याची जाण ठेवून रोपे लावण्यात आली आहेत. त्यामुळे कधी कधी वाटते की जे भान लहान मुलांना आहे ते मोठ्यांना नाही. पण नेमके हेच का केले असावे याचे कारण स्पष्टच दिसते आहे त्या शाळेत झालेले संस्कार.
घरानंतर शाळा संस्कारक्षम करणारे एक पवित्र क्षेत्र आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक. मुख्याध्यापिका यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद. लेकीने सांगितले आहे की ही रोपे मोठी होऊन झाडाच्या रुपात येतील तेव्हा त्या त्या झाडावर त्या मुलाच्या नावाची पाटी लावली जाईल. या मागचा उद्देश हा आहे की इतर मुलांनीही हा आदर्श समोर ठेवून त्याचे अनुकरण करावे. मुलांनी दिलेली रोपे नक्कीच कौतुकास्पद. गौरवास्पद. व अभिमानास्पद आहे.
धन्यवाद.
सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..