नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

बोल मेरे साथिया (ललकार)

१९७२ च्या भुसावळमध्ये अमरदीप टॉकीज ला प्रीमियर रिलीज झालेला हा चित्रपट (खरं तर युद्धपट!) सकाळी सहापासूनचे शो! धर्मेंद्र,राजेंद्र आणि माला सिन्हा ! अवचित हे गाणं भेटलं आणि भिडलं. ” जितनी सागर की गहराई , जितनी अंबर की उंचाई ” अशी प्रेमाची ग्वाही देणारं ! […]

सप्तसुरांची भैरवी

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगाला, घटनेला जुळणारी गाणी लतादीदींनी गायलेली आहेत. ती ऐकली की, आपण त्या काळात जाऊन येतो. म्हणूनच त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता शतकानुशतके अबाधित राहील. […]

आदर्शाचार्य

“अहो त्या वाह्यात गुरुजींना आदर्शाचार्य पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात. त्याला पंधरा दिवस होऊन गेले आता. त्यातला ताजेपणाही निघून गेला. तरीही त्यांची मुलाखत तुम्ही अजूनही घेतली नाहीत? कुठे होता तुम्ही सूर्याजी रविसांडे?” ‘रोजची पहाट’ चे संपादक आणि विशेषांक सम्राट आपल्या प्रमुख वार्ताहरवर म्हणजे काका सरधोपट यांच्यावर फारच नाराज झाले होते. […]

गोमुचे-प्रेम-सेवा-शरण (गोमुच्या गोष्टी – भाग ४)

परदेशात माहित नाही परंतु भारतांत तरी मॉलमधे वस्तु विकत घेण्यापेक्षां त्या पहाणे आणि मग कांही न घेतांच खायला फूड कोर्टमध्ये जाणे, अशी ग्राहकांची प्रवृत्ती जास्त असते. आम्ही, मी आणि माझे मित्र, मात्र या नियमाला अपवाद आहोत. आम्ही इथे तिथे न पाहतां सरळ फूडकोर्टमध्ये खायलाच जातो. असाच एकदा मी आणि गोमु दोघे सेंट्रल मॉलच्या फूड कोर्टमध्ये बसलो […]

आर्त

हे आर्तपण मला वळणावळणावर भेटलंय. काही वर्षांपूर्वी ग्रेसची कॅसेट आणली होती. नंतर “निवडुंग ” ची भेट. पण त्याआधी सदर कॅसेट. तिथे एक आर्त काव्य भेटलं- […]

रोझी आणि चमको

चंदेरी दुनियेत कारकिर्द करताना, अनेकजण संपर्कात येतात. मग ते नायक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ कोणीही असू शकतं. त्यांच्याशी पाऱ्यासारखं अलिप्त रहाणं ज्याला जमलं, तोच खरा! अन्यथा जीवनात नैराश्य येतं. दोघींच्याही जीवनात तशा गोष्टी घडलेल्या आहेत. वहिदानं त्या गोष्टींवर पडदा टाकलाय. दिप्ती विसरण्याचा प्रयत्न करतेय. […]

बस्तरचा दशहरा  सोहळा (उगवता छत्तीसगड – Part 4)

जगदलपुर मधील धरमपुर भागात उभारलेले विभागीय मानववंशशास्त्र संग्रहालय (zonal anthropological museum Z.A.M.) म्हणजे छत्तीसगडराज्याच्या मुकुटातील मानाचा तुरा आहे. मानव वंशशास्त्र, त्याचा विकास व संस्कृती शास्त्र या विषयावर आधारीत बस्तर मधील विविध आदिवासी जमातीचा जिवंत वाटणारा इतिहास म्हणजे विभागीय मानववंशशास्त्र संग्रहालय. ह्या संग्रहालयात आदिवासींचे अनेक पुतळे आहेत. त्याच बरोबर आदिवासींची घरे, त्यांचे दाग दागिने, शेतीची अवजारे, प्राण्यांची शिकार करण्याची आयुधे, शिकार केलेल्या प्राण्यांची डोकी, शिंगे, नदीत चालणाऱ्या होड्या, मासे पकडण्याची अनेक तऱ्हेची आयुधे या सर्व गोष्टी भव्य दालनात काचेच्या कपाटात  मांडलेल्या आहेत. […]

दिवंगत आत्मीय बाबासाहेब पुरंदरेंची आठवण !

त्या दिवशीचा नाट्यानुभव (दृक् -श्राव्य) तोही मोकळ्या मैदानात महानाट्याच्या रूपात आमच्या नातीसाठी नवा होता. वयाच्या पाचव्या वर्षी लावणी – कव्वाली , अभंग ,ओव्या, भजन, भारूड, पोवाडा या श्रीमंत परंपरा तिला एका छताखाली भेटल्या. बुरुज होता पण हिरकणीला ती शोधत राहिली. गोष्टींमध्ये ऐकलेली बरीचशी पात्रं तिला अनुभवायला मिळाली. तिने वेळोवेळी ताल धरून दिलेली दाद आम्हीं उभयता एन्जॉय करीत होतो. […]

खरं तर मी हे करू शकतो/ते

जीवन ही एक सुंदर भेटवस्तू आहे , त्यामुळे आयुष्य गृहीत धरू नका. काहीवेळा मनासारखे होणार नाही मात्र तुम्हाला पेलणार नाही असे आव्हान तुमच्या कधी वाटयाला येणार नाही. ही आव्हानेच तुम्हाला अधिक ताकतवर बनवतील. […]

जसबीरची फरफट

अमिताभ बच्चन बरोबर ‘डाॅन’, ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘पुकार’, ‘महान’, ‘दोस्ताना’, ‘लावारिस’ चित्रपटात तिची केमेस्ट्री छान जुळली. फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील तिच्यावरील चित्रीत ‘आप जैसा कोई, मेरे जिंदगी में आए..तो बात बन जाए..’ या नाझिया हसनच्या गाण्यामुळे ती चित्रपटाचा केंद्रबिंदू ठरली. […]

1 169 170 171 172 173 489
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..