नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

द लास्ट सीन

The last seen…. हेच ते तीन शब्द… बारकाईने वाचल्यास लक्षात येईल की आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हाट्सअपचं एक अनमोल फीचर. हे ॲप तुम्ही शेवटचे केव्हा पाहिले त्याची नोंद दाखवणारं… पण हेच last seen जर पुस्तकांना लागू केलं तर काय असेल उत्तर…? 2 महिने… […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ३

किती अथांग आणि भव्य दृश्य होतं ते! ही अथांगता आणि भव्यता निसर्गच आपल्याला शिकवत असतो. पण एका चहासाठी आडून स्वतःचा खुजेपणा जास्तच जाणवतो. गाडीचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि मन अधीर झाले. […]

निर्णय (कथा)

खिडकीतून नजरेस पडणारी सूर्याची लालबुंद चकती एव्हाना क्षितिजाआड लुप्त झाली होती. आकाशात चंद्राची चंद्रकोर डोकं वर काढीत होती. ताऱ्यांचा अंधूक प्रकाश धुक्यातून वाट काढीत आल्यासारखा वाटत होता. कातरवेळेने परिसराचा कब्जा घेतला होता. तोच दरवाजाची बेल वाजली. मम्मीने दार उघडलं. महेश कामावरून परतला होता. येतायेताच त्याने विचारलं, “रुबी कुठाय?” […]

मोठ्यांचा चरण स्पर्श

आपले आई वडील आपल्याला जो आशीर्वाद देतात त्या सारख अमूल्य ह्या जगात काहीही नाही. त्यांच्या पावलांना स्पर्श करण्यात जो आनंद असतो तो कशातही नसतो. आई चे उपकार तर कधीही न विसरण्या सारखे असतात. आपला जन्म म्हणजे तिचा सुद्धा दुसरा जन्म असतो, एवढ्या मरण यातना तिला सहन कराव्या लागतात. […]

“क्रॉस कीज” चा भाडे-करार (संक्षिप्त रूपांतरीत कथा १५)

द लिज ऑफ द क्रॉस कीज’ मधे केवळ गैरसमजावर आधारीत विनोद आहे. अप्रत्यक्षपणे चर्चच्या अधिकाऱ्यांवर विनोद आहे. चर्चचे अधिकारी वाईट नसूनही केवळ गैरसमजांतून दुय्यम अधिका-याला बिशपबद्दल खात्री वाटत नाही. चर्चच्या प्रमुखाचे नांव खराब होऊ नये म्हणून चर्चचा दुय्यम अधिकारी टपरीच्या मालकाला टपरीचा भाडेपट्टा चौदाऐवजी एकवीस वर्षांसाठी वाढवून द्यायला सहज तयार होतो. मात्र ज्याच्यामुळे हे घडतं त्या वार्ताहराचं पुढे काय झालं, हे कथेत सांगितलेलं नाही. वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडलं आहे कारण तें फार महत्त्वाचं नाही. […]

मुडदा (कथा)

आपल्यापैकीच एक जण मरण पावला. तो कसा मरण पावला हे बघवत नाही. मग कुणीतरी सहन न होऊन चादर पांघरतो. जिवंतपणी बिचाऱ्याला पांघरायला काही नव्हत. थंडी-जी काय थोडीफार वाजते तिच्यामुळे अर्धमेला झाला. गेल्यावरती पांघरुण मिळालं बिचाऱ्याला. मग त्या प्रेतावर डोळा ठेवून, त्यावर मयतासाठी पडणाऱ्या पैशांवर नजर ठेवून बसणारे महाभागही असतात. त्यांना दोष देण्यात तरी काय अर्थ ? त्यांनाही थंडी वाजतच असते. […]

वीस वर्षांनंतर (कथा)

बीटवरचा हवालदार मोठ्या तत्परतेनं आपलं ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’चं काम बजावत रस्त्यावर गस्त घालत होता. त्याची ही तत्परता कोणाला दाखवावी म्हणून नव्हती हे नक्की ! कारण रस्त्यावर रहदारीच नव्हती. रात्रीचे दहाच वाजत आले होते. पण कडाक्याची थंडी आणि बोचरं वारं या दोघांनी मिळून लोकाना घराबाहेर पडण्यापासून परावृत्त केलं होतं हे खरं. […]

चतुर्भुज गोमु (गोमुच्या गोष्टी – क्रमांक २०)

गोमुच्या आणि परीच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात मी तुम्हांला सांगितली.
पण माणूस योजतो तसंच सर्व तडीस गेलं तर आयुष्य किती सोपं होईल. कांहीजणांच म्हणणं असतं की आयुष्य आपणच कठीण करत असतो. आपला दृष्टीकोन सकारात्मक असला की अर्धा भरलेला ग्लास दिसतो आपल्याला. अर्धा रिकामा आहे हे जाणवत नाही वगैरे, वगैरे. पण ज्याच्यावर प्रसंग येतो, त्यालाच त्याची गंभीरता कळते. इतरांना “त्यात काय एवढं !” असंच वाटतं. […]

शंभर मैलांवरची माती (कथा)

फुलांचा पंचवीस हजारांचा ताटवा काळ्या लाकडी पेटीवजा कुंडीत ठेवलेला होता. खऱ्या फुलांची ही दफनपेटीच म्हणायला हवी. वर्ष वर्ष डांबराच्या गोळ्यांसारखी उग्र वास देणारी तैवानी फुलं हवीत की, क्षणभर फुलून दिवसांचा गजरा सकाळी मावळणारी फुल हवीत, हे प्रत्येकान आपल्याशी ठरवायला हवं. […]

चिनी मकाव (कथा)

चायनीजच वेड किती आहे सांगायलाच नको. प्रत्येकाला वाटत, एकदा तरी चायनीज जेवण जेवाव. पण अस्सल चायनीज लोक मुंबईत भरपूर आहेत. पण ते शोधायला हवेत. गेली तीन-चार पिढया ही चायनीज मंडळी मुंबईत स्थायिक आहेत आणि उत्कृष्ट  बम्बय्या हिंदी बोलतांत. शोधा म्हणजे सापडतील. […]

1 153 154 155 156 157 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..