नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

झुरळाने काटा काढला! – भाग 3

मला खूप बरे वाटले. सकाळपासून मी जाम वैतागलो होता. त्यांचे चांगले शब्द ऐकून वाटले, चला, आज पहिलाच दिवस होता, रोज काही असे होणार नाही. हळूहळू होईल दोस्ती. पण हा माझा विचार किती भ्रामक होता याची चुणूक मला लगेचच दिसून आली. थोड्या वेळाने गोपाळ आला आणि रजिस्टर घेऊन गोरेसाहेबांना नेऊन दिली. माझे काम पाहून गोरेसाहेब आणि मॅनेजर […]

क्रेडिट कार्ड (अलक)

आयुष्यातलं पहिलंवहिलं क्रेडिट कार्ड घेऊन तो घरी आला. कौतुकानं त्यानं ते बायकोला दाखवलं. तिनं नुसतंच नाक मुरडलं. थोड्या वेळानं म्हणाली, “पोहे करतेय. आठ आण्याची कोथिंबीर घेऊन या.” “आणतो, पण सुटे नाहियेत, तेवढे दे.” “आणा क्रेडिट कार्डावर!”. “?” संजीव गोखले, ०३ जून २०२२.

आवड तुमची अंदाज आमचा

न्याहरीची तऱ्हा या नावाने कविता पाठवली होती. आणि अनेकांच्या प्रतिसादांतून आम्ही काही स्वभावाचा अंदाज बांधला आहे. आर्थात अंदाज म्हणजे अगदी खरा किंवा चूक असा नसतो म्हणून फार मनावर घेऊ नये आणि तसेही मी फार मोठी मानसशास्त्रज्ञ नाही. त्यामुळे विनंती आहे की वाचा आणि सोडून द्या. आहे काय नाही काय. पण अंदाज यासाठी गाढा अभ्यास करावा लागतो? म्हणून आता मी जे अंदाज बांधले आहेत ते पडताळून पाहण्याची गरज नाही. […]

आमचंही – ‘खमंग आणि खुशखुशीत’

लहानपणी परळच्या आमच्या आर.ए.एम. भट हायस्कूल समोर फेरीवाल्यांचा गराडा पडलेला असे. मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर त्याच्या टोपलीतल्या आणि गाडीतल्या खाण्यांवर ताव मारण्याची कला मी बालवयातच आत्मसात करुन घेतली. अर्थात घरच्यांनी रोज आणा दोन आणे हातावर ठेवून या छंदाला खतपाणीच घातलं. […]

वेगळा (कथा) भाग २

जवळ जवळ पंधरा दिवस बाबूचा पाय हा बांधलेल्या अवस्थेतच होता, त्या काळात बायडा दोन तीन वेळा घरी येऊन त्याची विचारपूस करून गेली, ती घरी येई तेव्हा बाबू जागा असला तरी झोपेचे सोंग घेऊन नुसता पडून राही, […]

गिरीश कर्नाड !

पुण्याच्या प्रभात चित्रपट गृहात (आताचे किबे थिएटर) मी पत्नीसह “उंबरठा ” पाहायला गेलो होतो ,प्रामुख्याने स्मिता पाटीलसाठी ! जब्बारचा चित्रपट, संगीत हृदयनाथांचे आणि एका स्त्रीवादी कथानकाचा वृत्तपत्रांनी गाजावाजा केला म्हणून! तिकिटांच्या रांगेत असताना आधीच्या शोमधील “सुन्या सुन्या मैफिलीत ” कानांवर पडत होते. इतक्या सुंदर गाण्याबाबत वर्तमानपत्रात काहीसा विरोधी सूर कां अशा विचारात मी पडलो. […]

बाबूजींचे आशीर्वाद

त्या नंतर काही दिवसांनी माझा आवाज फुटायला लागला. म्हणजे लहानपणी मुलगे स्त्रियांच्या पट्टीत गातात. पण नंतर मुलांची पट्टी बदलते. त्यावेळी असे होते की, कोणत्याही सुरात नीट गाता येत नाही. सगळ्या मुलांना या अवस्थेतून जावे लागते. आपल्याला बहुतेक आता गाणे गाता येणार नाही की काय अशी गोंधळलेली अवस्था निर्माण होते. यावेळी नशिबाने एक अतिशय उत्तम घटना माझ्यासाठी […]

इथे ओशाळला शेक्सपिअर

शेक्सपिअर म्हणतो, ‘नावात काय आहे?’ तर नावातच खूप काही आहे.. कसं? ते बघाच. जगातील कोणत्याही देशांपेक्षा, आडनावांची विविधता फक्त भारतातच आहे.. त्यातूनही महाराष्ट्रात तर, या बाबतीत आडनावांनी कहरच केलेला आहे. […]

झुरळाने काटा काढला! – भाग 2

दोन वर्षांनी मला मशीदबंदरला एका सहकारी बँकेत नोकरी लागली. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मी अर्धापाऊण तास आधीच गेलो तेव्हा वॉचमन बँकेचं दार उघडत होता. मला पाहून तो म्हणाला, “साहेब! बँक उघडायला अजून वेळ आहे, काय नवीन खातंबितं खोलायचंय का?” “नाही मी इथं नोकरीसाठी आलोय. आजपासून हजर व्हायचं आहे.” “असं का मग बसा आत, थोड्या वेळाने […]

वाट पाहुनी जीव शिनला

माणूस कुणाची ना कुणाची वाट पहातच आपलं आयुष्य घालवतो. वयानुसार त्याचे वाट पहाण्याचे संदर्भ, हे बदलत जातात. मात्र ‘वाट पहायचं’ काही संपत नाही. अगदी स्वतःपासून सुरुवात करुयात. आपला जेव्हा जन्म होणार असतो, तेव्हा आपल्या वडिलांची घालमेल होत असते. ते वाट पहात असतात. कधी बाळाचा ‘आवाज’ येतोय? एकदाचा आवाज येतो आणि त्यांचा जीव भांड्यात पडतो. वाट पाहिल्याचं, […]

1 132 133 134 135 136 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..