नवीन लेखन...

अष्टपैलू आचार्य

आचार्य अत्रे हे हाडाचे शिक्षक होते, त्यांनी सुरुवातीला मुंबईत काही महिने शिक्षकाची नोकरी करताना इंग्रजी, गणित, संस्कृत विषय शिकविले. नंतर पुण्यात येऊन कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक म्हणून १८ वर्षे काम केले. तसेच पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींसाठी आगरकर हायस्कूलची स्थापना केली. १९३७ साली नगर पालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर शिक्षकांसाठी ट्रेनिंग काॅलेज काढले. प्राथमिक शाळेसाठी, नवयुग वाचनमाला व दुय्यम शाळेसाठी अरूण वाचनमाला, अशी पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली. […]

नाटककार स. पां. जोशी

1950 साली सानेगुरुजींच्या निधनानंतर, सानेगुरुजी स्मारकाच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी सपांमधील नाटककार जागा झाला. गुरुजींच्या ‘आंतरभारती’ संकल्पनेवर आधारित ‘जीवनकला’ या सपांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रथम प्रयोग डोंबिवलीच्या स. पां. जोशी विद्यालयाच्या प्रांगणात 9 जानेवारी 1951 रोजी झाला. याच नाटकाचा दुसरा प्रयोग 11 फेब्रुवारी 1951 रोजी झाला. त्यावेळी ‘नवशक्तिकार’ प्रभाकर पाध्ये यांच्या हस्ते नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या नाटकास आचार्य अत्र्यांची प्रस्तावना लाभली होती. शं. दि. डोंगरे कृत हिंदी अनुवादाचे प्रकाशन ऑक्टोबर 1951 मध्ये झाले. […]

कण्हेरी मठ

कोल्हापूरचे स्नेही डॉ कुळकर्णी यांचेकडून या स्थानाबद्दल वारंवार ऐकले होते. ते तिथे बरेचवेळा जाऊन -येऊन असतात. हो ,भक्त निवास आहे मठात ! नंतरची उत्सुकता वाढली – ABP माझा कट्टया वर ” अदृश्य “काडसिद्धेश्वर स्वामीजींची बातचीत ऐकल्यावर ! […]

स्वाभिमान

स्वाभिमान हा माणसाचा एक जन्मजात गुण आहे. प्रत्येकात असतोच. आणि असावाही. पण अतिरेक झाला की ते फारच असह्य होते. आणि जेव्हा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा खूप खूप वाईट वाटते अशावेळी सयंम ठेवावा लागतो नाही तर भयंकर वाईट प्रसंग येतात. तर कधी कधी आपल्यालाच मनाला मुरड घालून गप्प बसावे लागते. […]

दाद द्या आणि शुद्ध व्हा – आरती प्रभू !

एकाच प्रसंगाच्या आसपास दोन सुंदर रचना ऐकायला मिळाल्या. पूर्वापार ऐकत आलोय तरीही तू-नळीच्या कृपेने एकीचा चक्क भावपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळाला. प्रसंग समांतर भावनांना वेढून उरलेला आणि दोन्ही गायिका, दोन्ही गीतकार,दोन्ही संगीतकार एकाच तोलामोलाचे आहेत म्हणून की काय उन्नीस-बीस करायला मन धजावत नाही. […]

खिद्रापूर !

खिद्रापूर – सांगलीपासून सुमारे ५१ किमी अंतरावर, नृसिंहवाडीपासून जवळ ! फार पूर्वी गेलो होतो पण आताची नजर जरा वेगळी होती. राष्ट्रीय वारसा, पण बऱ्यापैकी दुर्लक्षित ! […]

ते रवी, मी साधा तारा

सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला. मी ही असाच एक. […]

आवड तुमची अंदाज आमचा

न्याहरीची तऱ्हा या नावाने कविता पाठवली होती. आणि अनेकांच्या प्रतिसादांतून आम्ही काही स्वभावाचा अंदाज बांधला आहे. आर्थात अंदाज म्हणजे अगदी खरा किंवा चूक असा नसतो म्हणून फार मनावर घेऊ नये आणि तसेही मी फार मोठी मानसशास्त्रज्ञ नाही. त्यामुळे विनंती आहे की वाचा आणि सोडून द्या. आहे काय नाही काय. पण अंदाज यासाठी गाढा अभ्यास करावा लागतो? म्हणून आता मी जे अंदाज बांधले आहेत ते पडताळून पाहण्याची गरज नाही. […]

गिरीश कर्नाड !

पुण्याच्या प्रभात चित्रपट गृहात (आताचे किबे थिएटर) मी पत्नीसह “उंबरठा ” पाहायला गेलो होतो ,प्रामुख्याने स्मिता पाटीलसाठी ! जब्बारचा चित्रपट, संगीत हृदयनाथांचे आणि एका स्त्रीवादी कथानकाचा वृत्तपत्रांनी गाजावाजा केला म्हणून! तिकिटांच्या रांगेत असताना आधीच्या शोमधील “सुन्या सुन्या मैफिलीत ” कानांवर पडत होते. इतक्या सुंदर गाण्याबाबत वर्तमानपत्रात काहीसा विरोधी सूर कां अशा विचारात मी पडलो. […]

1 79 80 81 82 83 286
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..