नवीन लेखन...

देवगड हापूस 

मूळ देवगड हापूस आंबा, हे प्रकरण काय आहे, हे ज्याने तो एकदा खाल्लाय त्यालाच कळू शकतं. पुलंनी उगाच नाही त्याला “सगळ्यांचो बापुस” असं म्हटलंय. एकदा का देवगड हापूस मुखात गेला, की इतर सगळे आंबे त्याच्यापुढे अगदी फिके वाटू लागतात. त्याचं रूप, त्याची कांती अगदी वेगळी असते. सुरकुतलेला , थकलेला, मरगळलेला देवगड हापूस असूच शकत नाही. तुकतुकीत […]

रंग अवकाशाचा मुक्तयात्री – अशोक साठे

आमच्या मेंदूच्या एका कप्यात चक्रावर्तासारखा तू का भिरभिरत असतोस? काही निमित्तांनी (आता नाट्यसंमेलन) अंधारानंतर सायक्लोरामावर पडलेल्या लख्ख पहाट प्रकाशासारखा का आठवत राहतोस? जसाच्या तसा! तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्यक्ष क्षण तळहातावर स्वातीच्या थेंबाचा मोती ठेवावा, तसा मनचक्षूसमोर सजीव होऊन उलगडत राहतोस (हे जरा शब्दबंबाळ वाटतंय ना?) नाटकाची संहिता वाचताना हळूहळू अस्पष्ट, पण मग साकार दिसणाऱ्या पात्रासारखा, प्रसंगासारखा (हे तुला जवळचं वाटेल). […]

भारतमातेच्या वीरांगना – ५७ – मीरा बहन

७ नोव्हेम्बर १९२५ साली त्या भारतात आल्या, त्यांना घ्यायला सरदार वल्लभाई पटेल, महादेव देसाई आणि स्वामी आनंद गेले होते. इथे आल्यावर त्या हिंदी भाषा शिकल्या, भगवद्गीता शिकल्या, आणि गांधीजींच्या आश्रमाची पूर्ण कार्यपद्धती स्वीकारली, मैडलीन च्या मीरा बहन झाल्या, स्वाभाविकच आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचासुद्धा त्या हिस्सा बनल्या. तत्पूर्वी १९३१ साली लंडन ला झालेल्या गोलमेज परिषदेच्या त्या हिस्सा बनल्या. १९३१ साली असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला परिणामी दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यातून बाहेर आल्यावर त्यांनी भारताची बाजू इतर देशांसमोर मांडायला सुरवात केली. […]

स्वातंत्र्यदिन आणि मोरु

१५ ऑगस्टला सकाळी मोरुचा बाप मोरुला उठवायला आला. “अरे मोरु ऊठ, आज स्वातंत्र्यदिन. बघ सगळीकडे कशी देशभक्तीपर गाणी लागली आहेत. चल लवकर आटपून झेंडावंदनाला जा. स्वातंत्र्यदिन आपण उत्साहाने साजरा करायला हवा.” […]

गुरूवंदना गायन गृप (आठवणींची मिसळ १४)

माझ्या साडूंनी (कै.रमेश वैद्य) निवृत्तीनंतर एक छान उपक्रम सुरू केला होता. ते स्वतः उत्तम गायक होते. ते गीतकारही होते. त्यांच्या अनेक रचना रेडीओच्या सुगम संगीतात अनेकदा चांगल्या चांगल्या गायक-गायिकांनी गायल्या. गायनावर त्यांचे खूप प्रेम होते. निवृत्तीनंतर ते इच्छूकांना गायन शिकवत असत. पण मी म्हणतो तो उपक्रम आगळावेगळा होता. दर गुरूवारी त्यांच्या घरी गाण्याची एक खास बैठक होई. त्यांत भाग घेणारे बहुतेक सर्वच जण निवृत्त झालेले होते. कांहीनी नोकरी पूर्ण केली होती तर कांही जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पण सर्वांच गायनावर प्रेम होतं. ह्या दोन-अडीच तासांच्या बैठकीत सर्वजण वीस वीस मिनिटे गात असत. जे थोडे कच्चे होते, तेही हळूहळू चांगले गाऊ लागत. कारण इतर सदस्य त्यांना उत्तेजन देत. ह्या बैठकींना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनांतखूप महत्त्वाचं स्थान मिळालं त्यांच्या या गृपला अकरा वर्षे पूर्ण झाली तेव्हां सर्वांनी मिळून एक गाण्याचा कार्यक्रमच सादर केला. दोनशेहून अधिक श्रोते त्या कार्यक्रमाला हजर होते. मला त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. काल कांही कागद चाळतांना मी त्या कार्यक्रमाच्या वेळी जे भाषण केले होते ते हाती आले. मी कांही मोठा वक्ता नाही की माझी भाषणे नोंदली जावीत. परंतु निदान तुम्हांला ते सादर करावं असं मनात आलं म्हणून इथे देत आहे. […]

भारतमातेच्या वीरांगना – ५६ – नेली सेनगुप्ता

१९३३ सालच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अधक्ष्या होत्या. ब्रिटिश त्यावेळी एकही अधिवेशन पूर्णत्वास जाऊ नये असे बघत असे, जे अध्यक्ष नियुक्त होतील त्यांना अटक करणे, जी जागा निश्चित होईल तिथे निर्बंध लावणे, त्यातच श्रीमती नेली ह्यांच्याकडे कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षता आली कारण पूर्व नियोजित अध्यक्ष श्री मदन मोहन मालवीय ह्यांना अटक करण्यात आली. श्रीमती नेलीं च्या अध्यक्षीय भाषणा नंतर त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. ह्या अटक सत्राला त्या घाबरल्या नाहीत तर प्रत्येकवेळी तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी आपले सामाजिक जीवन तसेच चालू ठेवले. […]

संवेदनशीलतेतही ‘प्रवीण’

प्रवीण पांडे म्हणजे महसूल विभागातील आगळंवेगळं व्यक्तीमत्त्व. महसूल विभागात आदराने घेतलं जाणारं नाव. आदरयुक्त दरारा ते प्रेमळतेचा अथांग सागरच.महसूल विभाग म्हटलं की, केवळ काम आणि कामच. कधीही विरंगुळा नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कामाचा मारा सुरुच असतो.त्यात कामातूनच विरंगुळा मिळवून लोकांची कामे झटपट कशी मार्गी लागतील, यावर त्यांचे लक्ष असते.हीच बाब हेरून लोकांची कामे लवकर आणि वेळेत करण्यावर प्रवीण पांडे यांचा भर असतो. […]

स्मरणशक्ती आणि विस्मरणशक्ती – भाग २ (आठवणींची मिसळ १३)

चिं. वि. जोशींच्या “वायफळाचा मळा” या पुस्तकांत एक लेख आहे. “स्मरणशक्तीचे प्रोफेसर”.लेखकाला गाडीत एक प्रोफेसर भेटतात. प्रोफेसर साहेब लेखकाला स्मरणशक्ती कशी वाढवावी, लहान सहान गोष्टी कशा लक्षात ठेवाव्यात ह्याबद्दल उदाहरणासहीत लेक्चर देतात. […]

कॅज्यूअल्टी

बंगल्याबाहेर गाडीची चाहूल लागताच चार वर्षांचा समीरने धावत धावत जाऊन त्याच्या पप्पांना गाडीतून बाहेर पडल्या पडल्या पायाला घट्ट मिठी मारली. डॉ. विजय यांनी लाडाने त्यांच्या समीरला उचलून घेतले आणि बंगल्याच्या पायऱ्या चढु लागले. मुलाला बघून त्यांचा दिवसभरातील थकवा आणि ताण तणाव कुठल्या कुठे पळून गेला. समीर सोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर डॉ. आनंद यांनी गरम पाण्याचा शॉवर घेतला […]

विविधतेतून एकता – Unity in diversity

हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे एकतेची भावना निर्माण होईलच. याशिवाय आपण आपल्याकडून आपल्या आसपास असलेल्या अशा एखाद्या कुटुंबालाही आपल्यात सामावून घेऊन एकतेची भावना जागृत ठेवूया. […]

1 68 69 70 71 72 283
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..