हर मर्ज की दवा…. ज़िंदा तिलिस्मा…
जिंदा तिलिस्मात … खरं तर बोली भाषेत जिंदा तलिस्मा… living magic …. जादुई औषध .. एकही कृत्रिम रसायन न वापरता केलेलं … सगळ्या गोष्टी नैसर्गिक … वनौषधी वापरून केलेल्या … म्हणूनच बहुतेक इथल्या उर्दू-हिंदी बोली भाषेत … हर मर्ज की दवा … इतका हैदराबादच्या जनमनाचा त्यावर विश्वास आहे (जसा आपल्याकडे अमृतांजन … कैलास जीवन यावर असतो तसा). पुढच्या वर्षी बरोबर १०० वर्ष होतील, या युनानी औषधाला. हकिम मोहम्मद मोईझुद्दीन फारुकी यांनी हे जादुई औषध १९२० साली निर्माण केलं आणि त्याचा प्रभाव … करिष्मा थोडा थोडका नाही तर शंभर वर्ष लोकमनावर आहे. […]
