नवीन लेखन...

आपल्या रोजच्या आहारासंदर्भात अतिशय मौल्यवान माहिती या सदरात दिली जात आहे.

आहाररहस्य-आहारातील बदल भाग ७०

बदललं, सारंच बदललं. ते गोरे इंग्रज काय येऊन गेले, तथाकथित स्वातंत्र्य आम्हाला देऊन गेले पण जाताना आमचे भारतीयत्व घेऊन गेले. आमची सर्व दिनचर्या बदलली, रात्रीचर्या बिघडली, ऋतुचर्या ही बिनसली, आचार बदलला विचार बदलला उच्चार ही बदलला आहार बदलला विहार बदलला जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोनच बदलला. एवढा बदलला कि आपण बदलतोय, बदललोय हे कधी लक्षातही आलेलं नाही. आपल्या […]

आहारातील बदल भाग ६९ – चवदार आहार भाग ३१

आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात, बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकतो ? एक. दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिली तर…. दोन अडीज मोसंबी. यापेक्षा जास्त खाल्ली जाणारही नाहीत. आणि हल्ली कोणाचे एवढं प्रेम ऊतु जाणारही नाही ! पण मोसंब्याचा ज्युस (रस ) काढून दिला तर ? एक ग्लास अगदी सहज. आग्रहाने, स्पेशल कोणी आणून […]

आहारातील बदल भाग ६८ – चवदार आहार भाग ३०

चव समजण्यासाठी जीभ हा एक अतिशय महत्वाचा अवयव आपल्याला त्याने दिलेला आहे. त्याचा यथायोग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. चव कळण्यासाठी लाळ पण तेवढीच आवश्यक आहे. जेवढा वेळ अन्न तोंडात घोळले जाईल, तेवढी लाळ चांगली मिसळली जाईल, परिणाम पुढे पचन सुलभ होईल. आपल्या पोटात काय जाणार आहे. हे चवी मार्फत त्याला आधीच कळत असते. “त्याला” फसवून […]

आहारातील बदल भाग ६७ – चवदार आहार -भाग २९

रसाचा आणखी एक उपप्रकार म्हणजे अनुरस होय. मुख्य चवी बरोबर आणखी एक चव मागाहून जाणवते तो अनुरस. जसे मध खाताना गोड लागतो, पण मध पोटात गेल्यावर जीभेवर एक प्रकारची तुरट चव रेंगाळत रहाते. त्याला मधाचा अनुरस म्हणतात. कोणतेही पदार्थ एकल रस प्रधान असत नाहीत. म्हणजे मध फक्त गोडच असतो असे नाही. अग्निच्या कमी अधिक असण्यामुळे, पंचमहाभूतांच्या […]

आहारातील बदल भाग ६६ – चवदार आहार -भाग २८

आपण आहारातील या चवी वेगवेगळ्या अभ्यासल्या. प्रत्यक्षात मात्र अगदी एकाच चवीचे पदार्थ आपण खात नाही. किंवा जे पदार्थ खातो, त्यात अनेक चवी एकत्र झालेल्या असतात. किंवा असेही काही पदार्थ आहेत, ज्यांच्यामधे एकापेक्षा जास्ती चवी चाखायला मिळतात, काही पदार्थांचे परिक्षण करून कोणत्या कोणत्या चवी त्यांच्यात चवी मिळतात, हे ऋषींनी अभ्यासून ठेवले आहे. जसे लसूण. हिचे संस्कृत नाव […]

आहारातील बदल भाग ६५ – चवदार आहार -भाग २७

तुरटी कशी ? या प्रश्नाचे उत्तर अनुभुति घेतल्याशिवाय येत नाही. ती तुरट आहे. हे उत्तर तर सर्वांनाच माहिती आहे. कशाप्रमाणे गोड वगैरे वर्णन करता येईल. पण तुरट म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर काय देणार ना ? त्यासाठी तुरटी चाखून पाहिल्यावर जे लागते त्याला तुरट म्हणतात. असेच सांगावे लागेल. यालाच अनुभुति म्हणतांत. प्रत्येक गोष्ट सिद्धत्वाच्या कसोटीवर […]

आहारातील बदल भाग ६४ – चवदार आहार -भाग २६

सहा चवीपैकी शेवटची राहिली तुरट चव. तुरट या नावातच तुरटीची चव ज्याला ती तुरट असे लक्षात येते. हिरडा, पालेभाज्या, कात, सुपारी, त्रिफळा चूर्ण ही काही तुरट चवीची उदाहरणे आहेत. सर्व तुरट पदार्थ वातवर्धक आणि कफ शामक आहेत. हिरडा सोडला तर बाकी सर्व तुरट पदार्थ मलविबंध करवतात. (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन. ) स्तंभन म्हणजे आकुंचित करणे हे महत्वाचे […]

आहारातील बदल भाग ६३ – चवदार आहार -भाग २५

औषध म्हणजे कडू. हे लहान मुलांनापण माहिती आहे. औषध लागू पडते, ते त्याच्या अंगभूत गुणांमुळे. त्याची चव, त्याचे गुण, त्याची मात्रा, त्याची कार्यकारी शक्ती, त्याचा पोटात गेल्यावर होणारा परिणाम, त्याचे विभिन्न अवयवांवर होणारे वैयक्तिक किंवा एकत्रित परिणाम, त्याचा प्रभाव, त्यामुळे आतमधे होणारे भौतिक अथवा रासायनिक किंवा भावनिक बदल या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. शिवाय औषध […]

आहारातील बदल भाग ६२-चवदार आहार -भाग २४

  कडू चवीचे जेवणातील पदार्थ म्हणजे ओल्या हळदीचे लोणचे, बांबूच्या कोंबाची भाजी, कारल्याची भाजी, मेथीचे पराठे, शेवग्याच्या पाल्याची भाजी. याचा अर्थ हे पदार्थ मधुमेहाचे शत्रू आहेत का ? हो. नक्कीच. फक्त प्रमाण लक्षात ठेवावे. पानाच्या डाव्या बाजूला ! मधुमेहाचा शत्रू म्हणजे कडू चव असे का म्हटले जाते ? मधुमेहात शरीराला चिकटण्याचा गुणधर्म वाढतो. मग तो, क्लेद […]

आहारातील बदल भाग ६१-चवदार आहार -भाग २३

मधुमेहाचा कडू चवीशी खूप जवळचा संबंध आहे. विपरीत नावामधे पण आहे आणि गुणानेदेखील दिसतो. गोड पदार्थ आळस, जडत्व निर्माण करतात. कडू पदार्थ हलकेपणा आणतात. गोड पदार्थांनी वजन वाढते, तर कडू पदार्थामुळे वजन कमी होते. गोडाने चिकटपणा वाढतो. कडू पदार्थामुळे चिकटपणा कमी केला जातो. गोड पदार्थ कफ वाढवतो. कडू कफ कमी करतात. गोड पदार्थ शक्तीदायक असतात, तर […]

1 26 27 28 29 30 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..