नवीन लेखन...

आपल्या रोजच्या आहारासंदर्भात अतिशय मौल्यवान माहिती या सदरात दिली जात आहे.

याला जीवन ऐसे नाव भाग ५

गंगोत्री,यमनोत्री हरिद्वारचे पाणी वेगळे, नाशिक सातारा पुण्याचे वेगळे, बार्शी सोलापूर यवतमाळचे वेगळे आणि कोकणाले वेगळे! म्हणजे पचायला कमी जास्त वेळ घेणारे ! केमिकली एचटुओ. पण फिजिकली त्यात एच आणि ओ बरोबर आणखी कितीतरी रसायने पिण्याच्या पाण्यात देखील आढळतात. कोकणातले पाणी तर सर्वात प्रदूषित. वरून येणारी सर्व केमिकल, शिवाय समुद्रातून भरतीच्या वेळी नदीमधे मागे फिरणारे पाणी जमिनीमध्ये […]

याला जीवन ऐसे नाव भाग ४

आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे. बाहेरील उष्णतेमुळे अंगातील पाण्याची पण वाफ होत असते. घाम येत असतो. पाणी कमी होत असते. पाणी कमी झाले तर नाजूक अवयवांना त्रास होतो, म्हणून पाणी भरपूर प्यावे असे आजकाल डाॅक्टरमंडळींकडून सांगितले जाते. बरोबर आहे, काही चूक नाही. पाण्याला जीवनच म्हटले आहे. पण अति तिथे माती हे पण विसरून चालणार […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३

निसर्गातील प्रत्येक क्रियेचा कर्ता तो परमात्मा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक क्रियेचा नियंता, प्रणेता, भोक्ता तो आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचेच एक छोटे रूप. एक रिमोट तर दुसरा सेन्सर. हे एकमेकांच्या सान्निध्यात, समोरसमोर असले तरच चॅनेल बदलणार. संवाद जुळणार. माझ्या शरीरात मला काय हवंय, काय नकोय याचा निर्णय तो घेतो. मन त्याची इच्छा ज्ञानेंद्रियाकडून विचारून घेतं आणि […]

याला जीवन ऐसे नाव भाग २

आरोग्याच्या बाबतीत अमुक एक नियम करून चालत नाही. मागे अनेक वेळा सांगितल्या प्रमाणे देश, प्रकृती, सवय, मनाची अवस्था, आवडनिवड, उपलब्धता इ. अनेक गोष्टींवर आरोग्याचे मापदंड बदलत असतात. प्रत्येकाला एकाच तराजूत तोलता येणारे नसते. एखाद्याच्या प्रकृतीतला नेमकेपणा, आवश्यकता, गरज, योग्य पथ्यापथ्य हा जाणकार वैद्यच सांगू शकतो. त्याहीपेक्षा अचूकपणे फॅमिली डाॅक्टर / वैद्य सांगू शकेल. कारण त्या वैद्याला […]

याला जीवन ऐसे नाव भाग १

जीवन म्हणजे पाणी. आजपासून पाण्यावर चर्चा सुरू करू. कारण पाणी कसे प्यावे, किती प्यावे, यामधे बरीच मतमतांतरे आढळतात. ग्रंथामधे जे संदर्भ आले आहेत, त्या अनुषंगानेच माहिती पुरवली जाईल. जे व्यवहारात दिसते आणि ग्रंथात आहे, त्यानाच आपण आधार मानूया. ग्रंथ कोणते ? आयुर्वेदाचे सर्वाना सहज समजतील, असे ग्रंथ म्हणजे अष्टांग संग्रह आणि अष्टांग ह्रदय. म्हणून आपण हे […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७५

विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार. चहातून चपाती खाणे, केळ्याची शिकरण खाणे, माश्यांचे जेवण झाले असले तरी […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७४

यहा सब कुछ चलता है ! पंजाबमधे मोदक, केरळमधे डाल बाटी, गुजरातमधे रस्सम, कलकत्याला पुरणपोळी, कसं विचित्र वाटते ना ऐकायला सुद्धा ! पण महाराष्ट्रात, सब कुछ चलता है मक्के की रोटीपासून, सर्व डोसाआयटम, रोसगुल्ला, मख्खनवाला, बिर्याणी, पासून थाई, मेक्सिकन, इटालीयन, चायनीज पर्यंत सर्व पदार्थ घराघरात सुद्धा बनवले जात आहेत. ते एवढे अंगवळणी झाले आहेत, कि ते […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७३

अस्सल भारतीय बैठकीची पंगत बदलली. जमिनीवर मांडी घालून जेवायला बसणे आपण विसरून गेलो आहोत आणि टेबलखुर्चीचा वापर करणे प्रेस्टीजीयस वाटू लागले आहे. काहीजणांना खाली बसताच येत नाही, त्यांच्या या सवयी विषयी मला बोलायचेच नाही. पण त्यांच्यावर ही वेळ का आली, ती वेळ आपल्यावर येऊ नये, याचे परिक्षण तरूण पिढीने करावे. आज सर्व घरांमधे, हाॅटेलप्रमाणेच काटकोनात बसून […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७२

शाळेत जाताना पाण्याच्या बाटल्या किती पालकांनी नेल्या आहेत ? मला तर आठवतच नाही. कधी न्यावीच लागली नाही. शाळेत स्टीलचे पिंप ठेवलेले असायचे. खेळून झाले की, धावत पहिल्यांदा जाऊन पिंपातले पाणी पिण्याची मजा काही औरच होती. संपली ती मजा ! घरचा डबा नेला असला तरी पाणी शाळेतलंच ! मला आठवतंय, पाण्याची बाटली फक्त वार्षिक सहलीच्या वेळी कपाटावरून […]

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७१

आहारातील बदल आपण किती मान्य करायचे किती अमान्य करायचे, किती बदलांना अंगवळणी पाडायचे, कितींकडे दुर्लक्ष करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण जेवढे नैसर्गिक अन्नापासून लांब जाऊ, तेवढे आरोग्यापासून देखील लांब जात चाललो आहोत. माणसाचे आयुष्य विज्ञानाच्या, उपकरणांच्या सहाय्याने वाढले असेलही, पण केवळ संख्यात्मक दर्जा वाढवणे महत्वाचे नसून, जगण्याच्या गुणात्मक दर्ज्यात वाढ किती झाली आहे हे […]

1 25 26 27 28 29 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..