सहा चवीपैकी शेवटची राहिली तुरट चव. तुरट या नावातच तुरटीची चव ज्याला ती तुरट असे लक्षात येते. हिरडा, पालेभाज्या, कात, सुपारी, त्रिफळा चूर्ण ही काही तुरट चवीची उदाहरणे आहेत. सर्व तुरट पदार्थ वातवर्धक आणि कफ शामक आहेत. हिरडा सोडला तर बाकी सर्व तुरट पदार्थ मलविबंध करवतात. (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन. ) स्तंभन म्हणजे आकुंचित करणे हे महत्वाचे […]
औषध म्हणजे कडू. हे लहान मुलांनापण माहिती आहे. औषध लागू पडते, ते त्याच्या अंगभूत गुणांमुळे. त्याची चव, त्याचे गुण, त्याची मात्रा, त्याची कार्यकारी शक्ती, त्याचा पोटात गेल्यावर होणारा परिणाम, त्याचे विभिन्न अवयवांवर होणारे वैयक्तिक किंवा एकत्रित परिणाम, त्याचा प्रभाव, त्यामुळे आतमधे होणारे भौतिक अथवा रासायनिक किंवा भावनिक बदल या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. शिवाय औषध […]
कडू चवीचे जेवणातील पदार्थ म्हणजे ओल्या हळदीचे लोणचे, बांबूच्या कोंबाची भाजी, कारल्याची भाजी, मेथीचे पराठे, शेवग्याच्या पाल्याची भाजी. याचा अर्थ हे पदार्थ मधुमेहाचे शत्रू आहेत का ? हो. नक्कीच. फक्त प्रमाण लक्षात ठेवावे. पानाच्या डाव्या बाजूला ! मधुमेहाचा शत्रू म्हणजे कडू चव असे का म्हटले जाते ? मधुमेहात शरीराला चिकटण्याचा गुणधर्म वाढतो. मग तो, क्लेद […]
मधुमेहाचा कडू चवीशी खूप जवळचा संबंध आहे. विपरीत नावामधे पण आहे आणि गुणानेदेखील दिसतो. गोड पदार्थ आळस, जडत्व निर्माण करतात. कडू पदार्थ हलकेपणा आणतात. गोड पदार्थांनी वजन वाढते, तर कडू पदार्थामुळे वजन कमी होते. गोडाने चिकटपणा वाढतो. कडू पदार्थामुळे चिकटपणा कमी केला जातो. गोड पदार्थ कफ वाढवतो. कडू कफ कमी करतात. गोड पदार्थ शक्तीदायक असतात, तर […]
कडू चव म्हणजे फक्त मधुमेहवाल्यांसाठीच आहे, आमचा काही संबंध नाही, असं नाही. मधुमेह होऊ नये यासाठी देखील रोज खाण्यात कडू असावे. जसे तिखटाचा अॅण्टीडोट आंबट आहे, तसे गोडाचा कडू असे समजावे. ज्यांना गोड खूप आवडते त्यांनी अगदी तेवढ्या प्रमाणात नाही, पण कडू जरूर खावे. गोड खाऊन मधुमेह झालाय ना, आता तेवढेच कडू खातो, म्हणजे गोड […]
कोणालाही मनापासून न आवडणारी पण, यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देत असल्यामुळे वैद्य मंडळीना आवडणारी चव म्हणजे कडू. खरंच आहे. रोग नावाने कितीही मधुर वाटला तरी, प्रत्येक औषधात दडून बसलेली कडू चव मात्र रूग्णाचे जीवन गोड बनवते. या कडू चवीचा वापर युक्तीने जो वैद्य करतो, तो यशवान, गुणवान आणि परिणामी धनवान बनतो. जसा कडू रस आपल्याला […]
कोकणातील आणखीन एक झणझणीत तिखट पदार्थ म्हणजे माश्याचे कालवण ! कच्ची हळद, धने, आले आणि तिरफळाचा वास घमघमणारी. सुक्या लालेलाल मिरचीचा ठसका असणारी, ही मिरची जर काश्मिरी वापरली तर बघूनच समाधान ! आणि नेहेमीचे ओला नारळ आणि कांद्यालसणीचे वाटप. आंबटपणासाठी कोकणात कोकम आणि गोवन फूडमधे चिंचेचा कोळ. फोडणी म्हणजे मोहोरीचा तडका नाही. पिवळसर लाल दिसणारी माश्याची […]
मिरी मिरची असं प्रत्येक पदार्थाबद्दल लिहायचं झालं तर शेकडो पदार्थ सुचतील, पण ज्यांना तिखट पदार्थांच्या दरबारात मानाच्या खुर्च्या आहेत, त्यांना सलाम तर केलाच पाहिजे ना ! त्यातीलच एक मानाचे पान आल्याचे. चहापासून बटाटावडा आणि चटणीपासून भाजीपर्यंत सर्वांना हवे असणारे आले पित्ताला वाढवणारे आहे. याची विशिष्ट अशी चव आणि स्वाद देखील मनाला प्रसन्न करतो. उपवासाच्या विविध व्यंजनामधे […]
नेहमीच्या वापरातील मसाल्याच्या तिखट पदार्थांच्या यादीतील एक प्रमुख औषधी घटक म्हणजे मिरी. जिथे मिरची वापरता येणार नाही, अशा ठिकाणी मिरी वापरावी, एवढी तिखट. हिच्या तिखटपणापेक्षा भगभगीतपणा लक्षात रहातो. तोंडाची, जीभेची हायहुय करत, सर्वांना हाऽय् हाऽय् म्हणायला लावणारी, डोळ्यातून पाणी वाहायला भाग पाडणारी ही काळी मिरी आता जगप्रसिद्ध झाली आहे. सूप असो वा सॅलेड, मिरीशिवाय चवच नाही. […]
तिखट पदार्थात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मिरची. कोशिंबीरी लोणच्या पासून ते सर्व भाज्या आणि फक्त मिरचीच्या ठेच्यापर्यत आपला ठसका दाखवणारी ही मिरची, तिखट पदार्थात आपले स्थान अबाधित राखून आहे. अति सर्वत्र वर्ज्ययेत, या न्यायाने प्रदेश विचार करून, मिरचीचा वापर युक्तीने करावा. काही जण मिरच्या चराचरा चावून खातात, त्यांना भविष्यात काही गंभीर आजारांना सामोरे […]