विडा घ्या हो नारायणा – भाग ५
चुन्याबरोबर सहजपणे मिसळला जाणारा आणि आपला रंग चुन्याला देणारा कात हे आयुर्वेदातील एक अप्रतिम “लाईफसेव्हींग ड्रग” आहे. खैराच्या झाडाच्या जून सालींचा काढा करून खैराच्याच लाकडाने ढवळत त्या काढ्याचा केलेला खवा म्हणजे कात होय. पूर्णतः नैसर्गिक. उत्तम रक्तस्तंभक. रक्तशुद्धी करणारा. अनेक त्वचारोगांवर वापरला जाणारा हा कात. […]
