नवीन लेखन...

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग ५

आयुर्वेद म्हणजे काही केवळ पाळेमुळे नव्हे. हे जगण्याचे शास्त्र आहे. जीवन म्हणजे काय ? का जगावे ? कोणासाठी जगावे ? किती वर्षे जगावे ? कसे जगावे ? या सगळ्याची उत्तरे या शास्त्रात मिळतात, एका ओळीत सांगायचं तर, आयुर्वेद म्हणजे सगळ्यांचा बाप आहे. आता पिताश्री म्हटलं तर तत्वज्ञान ऐकून घेणं, ओघानं आलंच ना. ! […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ४

इथे वापरलेला सम शब्द हा सर्वधर्मसमभाव यामधल्या सम पेक्षा थोडा वेगळा आहे. समभाव हवाच, पण नको त्या ठिकाणी नको. इतर जण जर सम भावाने पाहात असतील, कृती करत असतील तर समभाव आपणही जरूर दाखवावा. नको त्या ठिकाणी समभाव दाखवत गेलो तर अबू चे रूपांतर बाबूत होते आणि नंतर हे डोक्यावर चढून बसतात. […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ३

आपले सगळे अवयव बघा कसे “दाते” आहेत. कोणत्याही अपेक्षांशिवाय आपल्याला आतून आपलेपणाने सतत देत राहातात. रसरक्त, अश्रु, स्तन्य, लाळ इ.इ. काही वेळा तर सर्व अंतस्रावी ग्रंथी आपली परवानगी न घेता सुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे ते, न मागता तयार करून देतात. असा दाता व्हावं. […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग २

आपल्यासाठी हितकर काय आहे आणि अहितकर काय आहे, हे एकतर वैद्यबुवा सांगतील किंवा आपले स्वतःचे शरीर सांगेल. तसंच करावं. इतर कोणाचंही ऐकू नये. याचा अर्थ मनमानीपणा नव्हे. पण बिनधास्त खावं बिनधास्त फिरावं. खाताना भीती नको, खाल्ल्यानंतर खाल्लेल्याची आठवण नको. पावसात भिजताना सर्दीची आठवण नको. सर्दी झालीच तर रडतराहूपणा नको. सतत वर्तमानातील आनंद घेत राहवे. […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग १

रोग झाला की, वैद्य आठवावा, गरजेपुरता त्याला वापरावा. त्याने दिलेला औषधसल्ला पाळावा. नंतर रोग विसरावा. (आणि वैद्य देखील !) म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली आहे, गरज सरो, वैद्य मरो ! […]

विडा घ्या हो नारायणा – भाग १३ (शेवटचा)

तेरा गुणांचा विडा आपल्या शरीरासाठी आहे.घेतलेला आहार सहजपणे पचून जावा यासाठी हे पान तयार करून खाल्ले जाईल, पचन पूर्ण ही होईल. पण मनोरोगांचे काय ? त्यातील आमाचे पचन कोण करणार ? आत्मरोगांचे काय त्यासाठी हे हिरवे नागवेलीचे पान काऽही उपयोगाचे नाही. […]

विडा घ्या हो नारायणा – भाग बारा

सहा वेळा पान खाल्ल्यानंतर तोंडात जी लाळ तयार होते, ती गिळावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेळी केवळ चावून थुंकायचे आहे. आणि नंतरची लाळ येईल तेवढी सावकाश निर्माण करून गिळायची आहे. […]

विडा घ्या हो नारायणा भाग ११

कोणतेही शुभकार्य करत असताना देवाला देखील मानाचा विडा द्यायची श्रद्धा आहे. त्यामागे असलेले आरोग्याचे तेरा संदेश मात्र ओळखता यायला हवेत. पाश्चात्य बुद्धीने विचार केलात तर मात्र तीन तेरा वाजलेच म्हणून समजा ! […]

विडा घ्या हो नारायणा – भाग १०

धार्मिक कार्यापासून लावणीच्या फडापर्यंत, हा विडा पोचलेला दिसतो. विडा घ्या हो नारायणा या आरतीनंतर म्हणण्याच्या आळवणी पद्यापासून ते अगदी कळीदार कपूरी पान कोवळं छान, घ्या हो मनरमणा, या लावणीपर्यंत या विड्याची रंगत गाजत होती, गाजत आहे, आणि गाजत राहणार आहे. […]

विडा घ्या हो नारायणा – भाग ९

पान खाणे या प्रकारात, पानातील हे सर्व मिश्रण चावणे आणि चघळणे या दोन क्रिया महत्त्वाच्या !

पान तोंडातल्या तोंडात घोळवल्याने जीभेला उत्तम व्यायाम होतो. वर खाली, डावीकडे उजवीकडे,व तिरपी जीभ वळल्याने जीभेला जोडले गेलेले सर्व छोटे मोठे स्नायु अगदी स्वरयंत्रापर्यंत, ताणले जातात. आणि शब्दोत्पत्तीला मदत होते. गळ्यापासून टाळूपर्यंत जीभेला फिरावेच लागते. टाळू शकतच नाही. […]

1 … 15 16 17 18 19 … 57
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..