नवीन लेखन...

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग १

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – १०७
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक १२
निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग १

नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

वाग्भटजी लिखित अष्टांग ह्रदय या ग्रंथात याचे रहस्य वाग्भटजीनी उलगडून दाखवलेले आहे.
वाग्भटजी या श्लोकात असे म्हणतात, की हे जे मी पुढे सांगणार आहे, ते नित्य आचरणात आणायचे आहे.
काय ? तर श्लोकातील पहिला मुद्दा सांगताना ते म्हणतात, हितकर असलेला आहार विहार.

आपल्याला हितकर असलेला आहार आपण घ्यावा, हितकर म्हणजे नेमका कसा ? आपल्या प्रकृतीला अनुरूप असावा. जर वाताची प्रकृती असेल तर आहारामध्ये तेलाचा वापर करावा. आपण ज्या प्रदेशात राहतो, त्या प्रदेशात उत्पन्न होणाऱ्या तेलबीयापासून काढलेले तेल वापरावे. उगाच टीव्हीवर दाखवले जाते, किंवा वाॅटसपमहाराज सांगतात म्हणून राईसब्रानतेल, करडई तेल, बदाम तेल, वापरायची आवश्यकता नाही. जे तेल आपण यापूर्वी कधी खाल्लेले नाही, ते पचवायचे कसे, हा पेच ‘आतमधे’ निर्माण होतो. आणि तोपर्यंत हे तेल पचनातून बाजूला (सायडींगला) काढून ठेवले जाते. आणि खरंतर नंतर त्याचेच टायर पोटावर दिसू लागतात. तेल वापरताना ते कच्चेच वापरावे. तेलकट म्हणजे तळलेले. असे तेल त्रास देईल, पण कच्चे ( म्हणजे गरम करायच्या अगोदर, नुसतेच वरून घेतलेले) वापरले गेले तर अगदी कोलेस्टेरॉल न वाढवता, आपले योग्य ते पोषणही करेल. तेलावरील खूपश्या गोष्टी यापूर्वी आरोग्यटीप मधे चर्चून गेल्या आहेत.

जर पित्ताची प्रकृती असेल तर आहारात तूपाचा वापर करावा. तूप म्हणजे गाईचेच. आणि गाय म्हणजे गावठी म्हणजे भारतीय वंशाची, जिच्या पाठीवर वशिंड आहे ती ! हे आपण पूर्वी पाहिलेले आहे.

आणि प्रकृती जर कफाची असेल तर युक्तीने मधाचा वापर करावा. हा मध नैसर्गिकरीत्या तयार झालेला असल्यास उत्तम. मध कधीही गरम पदार्थासोबत घेऊ नये. म्हणजे गरम पाण्याबरोबर किंवा गरम चपातीवर गरम दुधात घालून घेऊ नये. मध उष्ण गुणधर्माचा आहे, म्हणून आणखी गरम केला तर पित्त वाढण्याची शक्यता जास्त असते.

आपली प्रकृती वाताची, पित्ताची, कफाची किंवा मिक्स टाईपची असेल तर आपल्या आहारात तसे हितकर (आवश्यक) बदल करणे अपेक्षित आहे. रोगाच्या लेबलनुसार आहार वेगवेगळा असतो. रोगाच्या अवस्थेनुसार आहार बदलत असतो. जसे काविळीच्या पहिल्या अवस्थेत आहार तेलाशिवाय घ्यावा, तर पंधरा वीस दिवसानंतर तेलाचा वापर सुरू करावा, नाहीतर वात वाढून अशक्तपणा देखील वाढू शकतो.
ज्यांना पित्त आहे, त्यांनी तिखट पदार्थ, मांसाहारी पदार्थ यावर संयम ठेवावा. तर कफाचे रोग असलेल्यांनी दूध, दही, गोड पदार्थ काही दिवसासाठी का होईना, बंद करावेत.
सरसकट आहार ठेवला तर पोटात केवळ कचरा होईल. जे आपल्याला हितकर होणार नाही.

आपले प्रकृतीमान काय आहे, हे अधेमधे जवळच्या वैद्याला दाखवून (म्हणजे वैद्याचे योग्य ते तपासणी शुल्क देऊन ) समजून घ्यावे. आपण निरोगी राहिलात तर वैद्याना आनंदच होणार आहे. पण सर्व नियम पाळून, सगळेच जण निरोगी झाले तर भविष्यात वैद्यबुवा दुःखी होणार नाहीत, याचीही काळजी आपणच घ्यावी, ती सोय आयुर्वेदात केलेली आहे. आपली निरोगी अवस्था निरोगी कशी ठेवता येईल, यासाठी देखील वैद्याची मदत घेता येईल. याला ‘स्वस्थवृत्त’ म्हणतात.

रोग झाला की, वैद्य आठवावा, गरजेपुरता त्याला वापरावा. त्याने दिलेला औषधसल्ला पाळावा. नंतर रोग विसरावा. (आणि वैद्य देखील !  )

म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली आहे, गरज सरो, वैद्य मरो !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
२७.०७.२०१७

आजची आरोग्यटीप

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..