नवीन लेखन...

सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.

अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्‍या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे.

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग १२

अमेरिकन शेती खात्याच्या (United States Department of Agriculture) २००७ सालच्या सर्वेक्षणाकडे नजर टाकली तर अमेरिकन शेती व्यवसाय व पशुसंवर्धनाच्या संदर्भात बरीच उद्बोधक माहिती मिळू शकते. २००७ साली अमेरिकेत सुमारे २२ लाख फार्म्स होते. मागे उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकन संदर्भात फार्म्स ही संज्ञा किंवा संकल्पना लवचिकपणे वापराय़ची आहे. प्रत्यक्ष कृषी उत्पादन तसेच पशुसंवर्धनाशी निगडीत सर्व व्यवसायांना त्यात समाविष्ट […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ११

जनावरांच्या फार्म्सबरोबर केलेल्या अशा व्यवहारामधे त्यांना लहान पिल्ले पुरवणं (कुक्कुटपालन आणि वराहपालन), त्यांना पशुवैद्यकीय सहाय्य तसंच संतुलित खाद्य पुरवणं आणि शेवटी त्यांचं सारं उत्पादन एकहाती विकत घेणं, हा ठरावीक साचा असतो. अशा करारांवर आधारित उत्पादनाची सुरुवात झाली १९६० च्या दशकात, जेंव्हा मोठमोठ्या पशुखाद्य बनवणार्‍या कंपन्यांनी कुक्कुटपालनाच्या क्षेत्रामधे या प्रकारच्या उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली. मांस उत्पादनाच्या क्षेत्रातल्या मोठ्या […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग १०

सामिष किंवा आमिष खाद्य संस्कृती ही झाली शेती व्यवस्थापनाची अंतिम पायरी. परंतु खाद्य संस्कृतीचे औद्योगीकरण जितक्या झपाट्याने झाले त्यामानाने प्रत्यक्ष शेती व्यवसायाचे औद्योगीकरण बर्‍याच धीमेपणाने झाले. याची सुरुवात झाली ती शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाने शिरकाव केला तेव्हापासून. परंतु या बदलाची झळ जाणवण्यासाठी विसावे शतक निम्मे सरून जावे लागले. दुसर्‍या महायुद्धानंतर खर्‍या अर्थाने शेतकी व्यवसायाच्या बदलत्या स्वरूपाने अमेरिकन […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ९

१९४० च्या दशकापर्यंत घरगुती स्वरूपाची, नवरा-बायको मिळून चालवणारी किरकोळ किराणामालाची दुकाने ठायी ठायी असायची. या दशकाच्या उत्तरार्धात खाद्य संस्कृतीच्या किरकोळ विक्रीच्या अंगाचे खर्‍या अर्थाने व्यापारीकरण सुरू झाले. निरनिराळ्या सुपर मार्केट्सच्या शाखा, मोठ्या आणि मध्यम वस्तीच्या शहरा-गावांमधे उघडू लागल्या. १९७० सालापर्यंत अनेक छोट्या स्थानिक सुपर मार्केट्सचं एकत्रीकरण होऊन त्यांच्या मोठमोठ्या देशव्यापी साखळ्या झाल्या होत्या. ही प्रक्रिया ९० […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ८

अमेरिकन खाद्य संस्कृतीचे औद्योगीकरण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी सुरू झाले. याचा प्रारंभ झाला मांसोत्पादनाच्या उद्योगापासून (Meat Packing Industry). मांसोत्पादनाच्या साखळीतला, कत्तलखाना हा एक मोठा महत्वाचा दुवा आहे. सुरवातीला स्थानिक पातळीवर किरकोळ स्वरूपाचा व्यवसाय करणारे कत्तलखाने, मोठे होता होता आपले स्वरूपदेखील बदलू लागले. त्यामुळे कत्तलखान्यांना जसजसं संघटीत व व्यावसायिक रूप येत गेलं, तसतसं त्या साखळीतला केवळ एक दुवा […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ७

पूर्वी गायीचं दूध हातानं काढावं लागायचं. आता बहुतेक ठिकाणी यंत्रांच्या सहाय्यांनी मिल्किंग पार्लर्समधे गायीचं दूध काढलं जातं. त्यामुळे पूर्वी छोट्या कौटुंबिक फार्म्सवर आई, वडील, मुलं मिळून ३०-४० गायींचं दूध काढता काढता थकून जायची. आता मोठमोठ्या डेअरी फार्म्सवर मिल्किंग पार्लरमधे हजारो गायींचं दूध दिवस रात्र काढलं जातं. बहुतेक डेअरी फार्म्सवर लॅटीन अमेरिकन मजूर हे दूध काढण्याचं काम […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ६

अमेरिकन डेअरी व्यवसायात झालेले दोन प्रमुख बदल म्हणजे: – गायींची वाढलेली दुग्ध उत्पादन क्षमता; ज्यायोगे कमी गायींपासून अधिक दूध उत्पादन शक्य झालं आहे. – डेअरी फार्मस्‌चा वाढत चाललेला आकार आणि त्याचबरोबर त्यांची घटत जाणारी संख्या. २००८ साली अमेरिकन शेती व्यवसायामधे डेअरी उद्योगाचा हिस्सा होता १२%. अमेरिकेतल्या एकूण दुधाळ गायींची संख्या होती ९ दशलक्ष आणि प्रत्येक गायीचे […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ५

फार्मपासून ते जेवणाच्या टेबलापर्यंतचा या बीफचा प्रवास बघणं मोठं मनोरंजक ठरेल. बीफ फार्म्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ब्रीडींग फार्म्सवर बीफ गायींचं प्रजनन केलं जातं आणि वासरांची पैदास केली जाते. जन्मत: वासराचं वजन ६० ते १०० पाउंड असतं. अशा गाया आणि त्यांची दूध पिणारी वासरं मोठमोठ्या चराऊ कुरणांवर (ranches) चरत फिरत असतात. साधारणपणॆ वासरं ६ ते १० […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ४

अमेरिकन शेतीउत्पादनाचा पशुसंवर्धन हा अविभाज्य घटक आहे. याची चार मुख्य अंगे म्हणजे – बीफ (गोमांस) उत्पादन, दुग्धउत्पादन, वराहपालन आणि कुक्कुटपालन. अमेरिकन आहारातल्या प्रथिन (protein) घटकांचा विचार केला तर त्यात अव्वल नंबरावर आहे बीफ (गोमांस). अमेरिकन लोकांचे स्टेक आणि हॅंबर्गर्सचे वेड तर काही विचारायलाच नको. त्यामुळे बीफ उत्पादनासाठी विशिष्ट प्रजातीच्या गाई गुरांचं संगोपन, हा अमेरिकन शेतीमधला सर्वात […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ३

Specialization चं पुढचं पाऊल म्हणजे फार्म्स, एकाच प्रकारच्या जनावरांचे, त्यांच्या जन्मापासून ते कत्तलखान्यात जाईपर्यंत संगोपन करण्याऐवजी, त्या संपूर्ण प्रक्रियेतला केवळ एखादाच टप्पा करतात. त्यामुळे वय किंवा वजनाच्या एकेका टप्प्यानुसार, या वाढणार्‍या जनावरांची रवानगी वेगवेगळ्या specialized फार्मसवर केली जाते. डेअरी फार्म्सवर हा प्रकार कमी दिसतो. बहुतेक डेअरी फार्म्सवर स्वत:च्या फार्मवर पैदा झालेल्या कालवडी वाढवल्या जातात, भविष्यकालीन गायी […]

1 3 4 5 6 7 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..