सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.

अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्‍या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे.

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ४

भारताच्या शोधार्थ निघालेला ख्रिस्तोफर कोलंबस, १४९२ साली जेंव्हा अमेरिकेच्या खालच्या बाजूला कॅरेबियन बेटांवर पोहोचला, त्यावेळी युरोपमधे ख्रिश्चन धर्मात, कॅथलिक पंथाचाच एकछत्री अंमल होता. त्यासुमारास कॅथलिक पंथ हा कर्मठ कर्मकांडामधे आणि धर्मगुरुंच्या मनमानी कारभारामधे बंदिस्त झाला होता. सामान्य जनतेची घुसमट होत होती. या परिस्थितीचा कडेलोट होऊन, सोळाव्या शतकात मार्टिन ल्युथर, जॉन कॅल्व्हीन आणि एलरिच झ्विंगली या नवीन […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ३

छोट्या गावांमधे विरंगुळ्याची दोन मुख्य साधनं म्हणजे खेळ आणि चर्च. सकाळी सहा, सात वाजल्यापासून शेतात, फॅक्टरीत, बॅंकेत, मोटारीच्या दुकानात, दिवसभर इमाने इतबारे काम केलं की चार, पाच वाजताच संध्याकाळचं जेवण आटोपून घ्यायचं. मग पावलं वळतात ती चर्चकडे किंवा शाळा कॉलेजच्या gym कडे. चर्चमधे choir मधे समूहगान करणे हा देखील एक आवडीचा विरंगुळा. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत बरेच […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग २

एकदा पेनसिल्व्हेनीयामधे असताना, आमच्या लॅबमधल्या टेरा नावाच्या एका टेक्नीशियन मुलीच्या लग्नाला जाण्याचा योग आला. तिचं गाव पेनसिल्व्हेनीया आणि न्यूयॉर्क या राज्यांच्या सीमेजवळ, न्यूयॉर्क राज्यात होतं. न्यूयॉर्क राज्याचा वरचा बराचसा भाग डोंगर, झाडी, शेती आणि कुरणांनी भरलेला असून हा भाग शेती आणि डेअरीसाठी प्रसिद्ध आहे. टेराच्या गावाला जायचा रस्ता असाच गर्द झाडीने भरलेल्या टेकड्यांमधून जाणारा होता. मधे […]

अमेरिकेतील धार्मिकता – भाग १

अमेरिकेचं आधुनिक, शहरी, चंगळवादी रूप डोळ्यांसमोर आणलं की त्यात धार्मिकतेला फारसा वाव असेल असं वाटत नाही. झगमगते शॉपिंग मॉल्स, अत्याधुनिक गाड्या, हॉलिवूड आणि वॉलस्ट्रीट, फास्ट फूड आणि जंक फूड, टीन प्रेग्ननसीज आणि सर्रास होणारे घटस्फोट, शस्त्रबळावर जगभर चाललेली पुंडगिरी या सगळ्यात येशु ख्रिस्ताला कुठे जागा असेल का असा प्रश्न मनात येतो. अमेरिकेत येईपर्यंत ख्रिश्चन धर्माबद्दल आणि […]

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ७

एकतर इथली सगळी स्टोअर्स प्रचंड मोठाली. त्यात नवखा माणूस हरवला तर शोधायला मुश्कील अशी परिस्थिती. आतातर सेलफोनशिवाय एकाच दुकानात एकमेकांना शोधणं अवघड वाटतं. आठ नऊ वर्षांपूर्वी, सेलफोन्सशिवाय, आम्ही सात आठ जण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुकानांतून फिरून, एवढया धुमश्चक्रीमधे आमचा एकही मेंबर कसा हरवला नाही, याचंच आश्चर्य वाटतं. अर्थात दळणवळणाची साधनं नसतानाही, आपल्या सेनेच्या सार्‍या तुकड्यांना नियंत्रणात […]

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ६

मी रांगेत उभा राहून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो. लोकांच्या carts नुसत्या भरभरून ओसंडून वहात होत्या. माझ्या cart मधे जेमतेम तीन चार वस्तू असल्यामुळे, इतरांच्या तुलनेत माझी cart म्हणजे, गुटगुटीत पोरांमधे एखादंच किरकिरं पोर असावं, तशी दिसत होती. लोकांच्या चेहर्‍यावरून कृतार्थतेचा आनंद नुसता ओसंडून वहात होता. लोकांनी खरोखरच वर्षभराचं शॉपिंग या काही मिनिटांतच केलं असावं हे […]

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ५

बर्‍याच दुकानांमधे या सेलसाठी दुकानाची नेहमीची व्यवस्था (arrangement) बदललेली असते. काही दरवाजे बंद केलेले असतात. काही isles देखील बंद केलेल्या असतात. त्यामुळे लोकांचा लोंढा एका ठरावीक दिशेने आणि ठरावीक ठिकाणी वळवता येतो आणि एकंदर गोंधळ थोडा कमी होतो. शिवाय सेलमधल्या सर्व वस्तू एक दोन दिवस आधीपासूनच मांडून ठेवलेल्या असतात. प्रत्येक दुकानामधे विविध कंपन्यांच्या सेल मधे लावलेल्या […]

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ४

दुसर्‍या दिवशी पहाटे चारला उठून प्रातर्विधी उरकून साडेचारपर्यंत घरातून निघायचे होते. लढाईची स्ट्रॅटेजी ठरवता ठरवताच साडेबारा वाजले होते त्यामुळे सगळे जण गजराची वाट पहात पहात झोपी गेलो. पहाटे गजर झाल्यावर एकच धांदल उडाली. सगळेजण लगबगीने तयार होऊ लागले. नोव्हेंबरचा महिना असल्यामुळे कडाक्याची थंडी पडली होती. सगळ्यांनी स्वत:ला गरम कपडयांत लपेटून टाकलं होतं. गुर्जरांचं घर पहिल्या मजल्यावर […]

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ३

आमच्यासारखंच आणखीन एक कुटुंब, गुर्जरांच्या घरी येऊन डेरे दाखल झालं होतं. माधवराव आणि नलिनीबाई देशमुख हे साधारण पन्नास पंचावन्नच्या आसपासचं जोडपं आणि नितीन व निकीता ही त्यांची मुलं. देशमुख कुटुंबदेखील आमच्यासारखंच नवशिकं! त्यांचा देखील हा थॅंक्सगिव्हींगचा पहिलाच सेल. गुर्जरांनी तीन चार वर्ष अमेरिकेत काढली असल्यामुळे ते अनुभवी झाले होते. त्यामुळे ओघानेच नेतृत्वाची जबाबदारी अनुपमाकडे आली. “प्लॅनिंग […]

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग २

आमचं सू सेंटर हे छोटं गाव, आयोवा राज्याच्या अगदी वायव्य (north west) कोपर्‍यात येतं. तिथून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर साउथ डकोटा राज्याची हद्द सुरू होते. थोडं वेगळ्या दिशेने उत्तरेला गेलं की मिनेसोटा राज्याची हद्द सुरू होते आणि नैऋत्य दिशेला (southwest) गेलं की तासा दीड तासानी नेब्रास्का राज्याचा काही भाग लागतो. ही सगळी राज्यं तशी भरपूर मोठी […]

1 2 3 4 5 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..