माटोळी – फळे व भाज्यांची गणपतीपुढे आरास
मुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात. […]
पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख
मुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात. […]
विश्वातील सर्वात प्राचिन अश्या आपल्या हिंदू धर्मात ईश्वर एकच असला तरी त्याची अनेक रुपं मान्य केली आहेत. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे मान्य करतानाच हिन्दू धर्माने, ईश्वराला सगुण साकार बनवूनही पुजलं आहे. आपला ईश्वर आपण जसा मुर्ती रुपात साकारतो, श्रद्धेने पुजतो, त्याच आणि तेवढ्याच श्रद्धेने आपण निसर्गातही देव शोधतो. ईश्वर सर्वव्यापी असून अवघे चराचर व्यापून वर दशांगुळे उरतो असं मानणाऱ्या आपल्या पूर्वजांनी, निसर्गातल्या विविध चल-अचल रूपातला ईश्वर स्विकारला त्यात नवल ते काय..! […]
कोणतीही निर्मिती होताना प्रत्यक्ष त्याचं साक्षिदार असणं, हा विलक्षण आनंदाचा भाग असतो. निर्मिती, मग ती कोणतीही असो, ती देखणीच असते असं मला वाटतं. माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर एक सुतारकामाचा कारखाना होता. माझं लहानपण हे लहानपणी जसं असावं तसंच होतं, आतासारखं ते मोठ्यांसारखं झालेलं नव्हतं. अभ्यास, तोही चोख, शाळेच्याच वेळेत करायची पद्धत होती. तो एकदा केला, की मग पुढचे अनेक तास गंमतीचेच असतं. क्लास ह्या शब्दाचा जन्मही झाला नव्हता तेंव्हा. त्यामुळे अभ्यास हा शाळेतच करायचा असतो, असं तेंव्हा आम्हाला वाटे. शाळेचे दोन-पाच तास सोडले, तर रात्री झोपेपर्यंतचा वेळ हा मजेचाच होता. […]
आजच्या घडीला दिल्ली, चेन्नई,कोलकाता आणि मुंबई ह्या ४ महानगरांमधील प्लास्टिक कचरा दर दिवशी ६१ लाख किलो पेक्षा जास्त तयार होतो. प्रत्येकाने मनातल्यामनात एक शपथ घ्या की आजपासून मी प्लास्टिकचा, विशेषतः प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कटाक्षाने बंद करेन. आणि रोज दोन जणांना ह्याप्रमाणे प्रवृत्त करेन. […]
भगवंता, तुझी रुपे अनेक, सर्व चराचरातच तू अंशरुपाने वसतोस अशी आमचीही श्रध्दा. आम्ही जे जे डोळ्यांनी बघतो ते ते तुझेच रुप आहे, असा विश्वास साधुसंतांनी आमच्या मनात बाणवला. तरीही मानवरुपात तुझे जे अवतार झाले त्यापैकी सातवा अवतार प्रभूरामचंद्रांचा आणि आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाचा
[…]
हिंदूंच्या देववैविध्यात भगवान श्रीकृष्ण हा मोठा लोकप्रिय देव ! हिंदूंचा धर्मग्रंथच ज्याने निर्माण केला असा हा अद्वितीय तत्ववेत्ता ! अत्यंत सात्विकतेने वागतानाच वेळ पडल्यास ” नरो वा कुंजरो वा ” म्हणणारा, स्थानिकांना कमी पडते म्हणून दही-दूध-लोणी बाहेर नेण्यास प्रतिबंध करणारा, १६ सहस्र नाडयांवर ( नारींवर नव्हे) हुकूमत असलेला योगीराज, नृत्य,सूर आणि स्वरराज्य यावर ज्याचे अधिपत्य होते […]
‘वंदे मातरम’ने सध्या देशात वादळ उठलं आहे. एकेकाळी स्वातंत्र्याचा मुलमंत्र असलेला हा शब्द आज वादाचं कारण झालाय. ‘वंदे मातरम’चा जयघोष करतच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे सर्व जाती-धर्माचे (मुसलमानहा) क्रांतिकारक, स्वातंत्र्य योद्धे हसत हसत सुळावर चढले, तेच ‘वंदे मातरम’ म्हणण्यासाठी आज कायदे करायची वेळ आली आहे, हे काही चांगल्याचं लंक्षण नव्हे..एकेकाळी आणि आजही ज्याचा जयघोष ऐकून नसानसांत […]
माझा आक्षेप आहे तो मुंबईचं माॅडेल डोळ्यासमोर ठेवण्याला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली, तिची अंतर्गत परिस्थिती पार मोडकळीला आलेली आहे. बाहेरून स्वर्ग दिसणारी मुंबई फक्त २०-२५ टक्के धनिकांची आहे आणि ते ही बाहरून मुंबईत आलेल्यांची. मुंबईत वाहतुकीचे, पर्यावरणाचे, निवासाचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. मुंबईतील बहुसंख्य स्थानिक कधीच महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर गेलेले आहेत. मुंबईतले उद्योग कधीच उठले आहेत आणि त्याजागी सेवा उद्योग आलेले आहेत आणि तेथे बहुसंख्य बाहेरून आलेले लोक काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे. मुंबईतल्या गिरण्या, मोठमोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि तेथील स्थानिक माणूस मुंबईतच उपरा झालेला असून तिथेच कुठेतरी वाॅचमनची नोकरी करत आहे. ज्या उद्योगांमुळे मुंबई जगभरात प्रख्यात झाली, ते उद्योग प्रदुषणाचं कारण देत मुंबईबाहेर गेलेले आहेत. साधारण २०-२५ वर्षांपू्वी सोन्याचा धुर निघणारा, मुंबईचं इंडस्ट्रीयल हार्ट असणारा सीएसटी रोड आणि ठाणे-बेलापूर रोड आज मोठमोठाले हाऊसिंग काॅम्प्लेक्सेस आणि आयटी-बिपीओ कंपन्यांनी भरून गेलाय. मुंबईची औद्योगिक नगरी बनवणारे सर्व उद्योग मुंबबाहेर जाण्याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, हे उद्योग अभे असलेल्या जमिनिंना आलेला सोन्या-रुप्याचा भाव आणि दुसरं म्हणजे ते करत असलेलं प्रदुषण. […]
आज प्रमुख शहरांमधील रोज वाढणारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आणि पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लक्षात घेता ती तोकडी पडते की काय असे चित्र बघावयास मिळते किंवा शहरातील नागरिकांस सर्व दृष्टीने सोयीची नाही असे स्पष्ट होते. तरी बरं मुंबईतील बहुसंख्य नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करून घेतात, नाही तर…! आजच्या घडीला शहरात वाहनांची एवढी कोंडी होते की एखाद्या ठराविक स्थानापर्यंत पोहचण्यास विलंब होतो. […]
कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात तरी नक्की आहे. कदाचित देशात इतरत्रही असावी असं टिव्हीवरील इतर प्रांतात विविध व्यक्तींच्या केल्या जाणाऱ्या सत्कारांच्या क्लिप्स पाहून जाणवतं. मोठी व्यक्ती म्हणजे, ज्या व्यक्तींनी समाजात समाजासाठी काही भरीव कार्य केलंय अशा व्यक्ती. मग त्या व्यक्तीचं ते कार्य समाजसेवेचं असो वा शिक्षण […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions