नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

हरवले माझ्या कोकणातले काही तरी

काही गोष्टी काळाच्या ओघात दिसेनाशा होणार असतात हे आपण जाणून असतो पण काही करू शकत नाही. पण त्या गोष्टी दृष्टीआड झाल्या की हुरहूर लागून राहाते. मी गावाकडे कोकणात बऱ्याच वेळा जात असतो. जेव्हा जातो तेव्हा काही जुन्या गोष्टींची आठवण होते आणि मनात त्या काळाची आणि आजची  तुलना सुरु होते. मग काय हरवले ह्याची एक यादीच मनात घेर धरू लागते. […]

फोर्टमध्ये फिरताना – भाग २

कला, वास्तुशास्त्र, ऐतिहासिक वारसा याचा त्रिवेणी संगम असलेला हा फोर्टचा भाग म्हणजे मुंबईचं सौंदर्य. इथला अनुभव घेण्यासाठी मात्र इथे चालतच जायला हवं. “फोर्ट” हे भारदस्त नामाभिधान बाळगणार्‍या या भागात धोबीतलाव ते कुलाबापर्यंतचा परिसर येतो. […]

ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८

२६ नोव्हेंबर २००८ ला  मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात आले. नॅशनल सिक्युरिटी गार्ड  (एनएसजी) दिल्लीवरून विमानाने ११६३ किलोमीटरचे अंतर पार करून २७ नोव्हेंबर २००८ ला सकाळी तीन वाजता’ मुंबईत पोहचले. एनएसजीच्या ऑपरेशनमध्ये एकूण आठ दहशतवादी मारले गेले. एनएसजीचे दोन कमांडो ठार झाले तर १८ जण जखमी झाले. […]

पाकिस्तानला इशारा देणारा तडाखा

पाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला तरी हा हल्ला महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला आक्रमक कारवाईनेच उत्तर देणे गरजेचे असले तरी भारताने अन्य मार्गांचा अवलंब करून पाकिस्तानची कोंडी केली पाहिजे. […]

फोर्टमध्ये फिरताना – भाग १

फोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या कॅमेर्‍यांचं प्रस्थ नसल्याने दुर्दैवाने फोटो मात्र काढले गेले नाहीत. ती रुखरुख कायमची रहाणार आहे. […]

नोटाबंदी – बर्बादीची दोन वर्ष

भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटांवर प्रहार करून दहशतवादी कारवायांना मिळणारी रसद संपविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशाने काय साध्य केले, याचं स्पष्टीकरण अद्याप पंतप्रधान किंव्हा सरकारने दिलेलं नाही. देशाच्या एकंदर जडणघडणीसाठी नोटबंदीच्या निर्णयाला ऐतिहासिक ठरविण्यात आले होते. […]

आवाजाचा किमयागार – उदय सबनीस

एका क्षेत्रावर आपली पकड मिळवलेली असतानाच वेगळ्या कलाक्षेत्रात आपली ओळख निर्माण करू पाहणं हे एका कलाकारासाठी तसं आव्हानात्मकच असतं. उदय सबनीसांनी मात्र हा धोका पत्करला आणि यशस्वी दुहेरी ओळख निर्माण केली. अभिनय क्षेत्रावर आपली चांगलीच पकड मिळवलेली असतानाच म्हटलं तर संबंधित आणि म्हटलं तर तशा स्वतंत्र अशा आवाजाच्या जादुई दुनियेवरही आपली छाप उमटवण्यात उदयला चांगलंच यश मिळालं आहे. […]

निसर्गरम्य तळकोकणचा  प्रवास – आरामदायी  तेजस एक्सप्रेसने

कोकणचा निसर्ग रसिक पर्यटकाना सतत बोलावत असतो. त्यातही  ज्याला रेल्वे प्रवास प्रिय त्यांच्यासाठी तर पर्वणीच. विशेषतः खवय्यांना  तर मांडवी एक्सप्रेस चांगले २०-२५ पदार्थ पेश करते. हिरवा गार निसर्ग,लाल मातीचे डोंगर, घाट मार्गात अनेक बोगदे. रत्नागिरी स्टेशन आखीव नीटस मनात भरणारे. स्टेशन बाहेर रेल्वे बांधणीत मृत्यू पावलेल्या कर्मचारी वर्गाच्या स्मृतिस्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. […]

सीकेपी तितुका मेळवावा

महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातील जाती शोधून त्यांना एकमेकांविरुद्ध  झुंजविण्याचे राजकारण सुरु आहे. अशा वेळी दुसऱ्या जातीबद्दल काही चांगले लिहिण्याचे मी धाडस करतो आहे. ही जात म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ! म्हणजेच सीकेपी समाज !! […]

डिसिल्व्हा अंकल

डिसिल्व्हा अंकल… छायाचित्रणाची आवड… आयकर विभागातील सुरक्षित नोकरीत स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याच्या निर्णयातून खऱया अर्थाने त्यांची छायाचित्रकारिता फुलली… […]

1 186 187 188 189 190 223
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..