नवीन लेखन...

फोर्टमध्ये फिरताना – भाग १

मुंबईत रहाणारा मुंबईकर फोर्ट भागात गेला नाही असे उदाहरण मिळण्याची शक्यता फारच धूसर आहे. आपल्यातले बरेचजण फोर्टमध्ये जातात ते ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने.

सकाळी “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” किंवा “चर्चगेट” स्टेशनवर उतरायचं. निमुटपणे बाहेर पडायचं. “ब़ेस्ट”ची बस किंवा शेअर टॅक्सी पकडायची किंवा मग एक-दोन-एक-दोन करत ऑफिस गाठायचं. दिवसभर ऑफिसमध्ये राबून संध्याकाळी पुन्हा सकाळचाच कार्यक्रम उलट्या दिशेने राबवायचा….

कधी दुपारी शक्य झालंच तर फोर्टमधल्याच एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं. संध्याकाळी किंवा शनिवारी येताना फोर्टमधल्या दुकानांमधलं विंडो शॉपिंग किंवा फेरीवाल्यांकडून काही लहानमोठी खरेदी करायची. साधारणपणे ९० टक्के लोकांची फोर्टची वारी याच पद्धतीने वर्षानुवर्षे सुरु असते. पण फोर्ट म्हणजे नेमकं काय हे बर्‍याच कमीजणांनी अनुभवलं असेल.

मीसुद्धा कदाचित यातलाच एक झालो असतो. माझं पहिलं ऑफिस लायन गेटजवळ होतं आणि दुसरं बॅलार्ड इस्टेटला. त्यामुळे फोर्टमधून नियमितपणे प्रवास होतच होता. मात्र फिरण्याची आवड असल्याने फोर्टमधला बराचसा भाग मी पायी फिरलो आहे. बर्‍याचशा जुन्या बिल्डिंग्जमध्येही जाऊन आलोय.

फोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या कॅमेर्‍यांचं प्रस्थ नसल्याने दुर्दैवाने फोटो मात्र काढले गेले नाहीत. ती रुखरुख कायमची रहाणार आहे.

आता काळाच्या पडद्याआड गेलेलं “रिदम हाऊस” म्हणजे आमचं दुपारच्या वेळी संगीताची मेजवानी मिळवण्याचं हक्काचं स्थान. इथे असलेल्या रेकॉर्डस आणि कॅसेटस तिथेच बसुन हेडफोनवरुन ऐकण्याची सोय “रिदम हाऊस”मध्ये होती.

कॅफे मिलिटरी – जुन्या आठवणींना उजाळा

बाजूलाच असलेल्या “वेसाईड इन”मधलं टिपिकल “कॉन्टिनेन्टल” जेवण आणि कस्टर्ड तसंच “कॅफे मिलिटरी”मधलं पारसी पद्धतीचं जेवण कोण विसरेल? त्याबरोबरच “जहांगिर”मधल्या “कॅफे समोवर”ची ऐटही वेगळीच होती. “समोवर” आता बंद झालंय पण त्याच सुमारास “समोवर”बद्दल एक लेख मी लिहिलेला आहे.

“कॅफे मिलिटरी”च्या मालकाशीच काय तर सगळ्या वेटर्सशीसुद्धा त्यावेळी मैत्री झाली होती. फोर्टमधली नोकरी १९८६ मध्ये सोडल्यानंतरही अगदी आजतागायत मी “कॅफे मिलिटरी”च्या वार्‍या सुरुच ठेवल्यात. मध्यंतरी “कॅफे”चा “पारसी बाबाजी” गेल्याचं कळलं तेव्हा हळहळायला झालं.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे नुकतीच “फोर्ट वॉक” ची एक जाहिरात बघितली. त्याचबरोबर “मराठीसृष्टी” वर गणेश साळुंखे यांनी मुंबईच्या ऐतिहासिक वारशावर लिहिलेले लेख वाचताना मी बघितलेली ७०-८० च्या दशकातली मुंबई डोळ्यासमोर उभी रहात असे. त्यामुळेच वाटलं की माझ्या बघण्यातलं ७० ते ९० या दशकातलं फोर्ट कसं होतं ते एकदा मित्रमंडळींसोबत शेअर करावं.

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..