नवीन लेखन...

शैक्षणिक

भारतीय स्त्री वैज्ञानिक जानकी अम्मल

अम्मल ह्या  एक प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ आणि पेशी शास्त्रज्ञ होत्या  ज्यांनी अनुवंशशास्त्र, उत्क्रांती, वनस्पति भूगोल आणि मानववंशशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. पद्मश्री पुरस्कार विजेत्या जानकी अम्मल या भारतीय विज्ञान अकादमीच्या संस्थापक फेलो आहेत. […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक असीमा चटर्जी

असीमा चॅटर्जी  या भारतीय सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ होत्या  ज्या  सेंद्रिय रसायनशास्त्र आणि फायटोमेडिसिन क्षेत्रात त्यांचा कामासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांचे  सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे विंका अल्कलॉइड्सवरील संशोधन, एपिलेप्टिक औषधांचा विकास आणि मलेरियाविरोधी औषधांचा विकास आहे. त्यानी  भारतीय उपखंडातील औषधी वनस्पतींवर देखील मोठ्या प्रमाणात काम केले. भारतीय विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ सायन्स मिळविणारी त्या  पहिल्या महिला होत्या. […]

भारतीय स्त्रीशास्त्रज्ञ शिना राणी

५७ वर्षीय शीना राणी ह्या  हैदराबादमधील डीआरडीओच्या हाय-टेक लॅबमध्ये शास्त्रज्ञ आहेत . त्या  १९९९ पासून अग्नि मालिकेतील सर्व क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण नियंत्रण प्रणालींवर काम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण मोहिमेला ‘मिशन दिव्यास्त्र’ असे नाव दिले होते. […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक मंजू शर्मा

मंजू शर्मा या भारतीय जैवतंत्रज्ञानी आणि भारतातील अनेक वैज्ञानिक संशोधन आणि धोरण-निर्धारण संस्थांच्या प्रशासक आहेत. त्या   गुजरातमधील गांधीनगर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्चच्या अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक होत्या. त्या  भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयात जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव होत्या   आणि २००७ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. […]

मराठीतील कोशवाङ्मय

मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे. मराठी भाषेत कोशरचना सुरू होऊन आता सुमारे १५० वर्षे लोटली आहेत. मराठीत १९व्या शतकात जी कोशरचना झाली ती सामान्यतः शब्दकोश-स्वरूपाची झाली. संस्कृतीच्या विकसनशील काळात आधी शब्दकोश निर्माण होतात; त्यानंतर ज्ञानकोशांची रचना होऊ लागते. अव्वल इंग्रजी काळात शब्दकोश रचनेमागच्या प्रमुख प्रेरणा इंग्रजी राज्यकर्त्यांची मराठी भाषा शिकण्याची गरज आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांची धर्मप्रसाराची गरज या होत्या. […]

भारतीय स्त्री वैज्ञानिक मेधा खोले

मेधा १ डिसेंबर २०११ पासून हवामानशास्त्र (हवामान अंदाज) विभागाच्या उपमहासंचालक आहेत. हवामानशास्त्र क्षेत्रात त्यांना २१ वर्षांचा अनुभव आहे , त्यानी हवामानशास्त्र खात्याच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. त्या  देशासाठी अल्पकालीन हवामान अंदाज सुधारण्यासाठी काम करत आहेत . अल्पकालीन अंदाज, ज्यामध्ये पुढील ४८ तासांसाठी अंदाज वर्तवले जातात, हा हवामानाच्या सर्वात महत्वाच्या पैलूंपैकी एक आहे असे त्या मानतात. […]

कथा क्रेडिट कार्डच्या उत्क्रांतीची

व्यवहारात चलन व नाण्यांचा शोध लागण्यापूर्वी आपल्या देशात व जगातही अनेक ठिकाणी ‘बार्टर सिस्टिम’ किंवा ‘वस्तु-विनिमय प्रणाली’ वापरली जात असे. नंतर दगड तसेच लोखंड, जस्त, कथिल, सोने, चांदी, तांबा, पितळ इत्यादि धातूंची नाणी वापरली जाऊ लागली. पण जसा कागदाचा शोध लागला तश्या कागदाच्या चलनी नोटा व्यवहारात अधिक वापरल्या जाऊ लागल्या. […]

आयुर्वेद जडी बुटी भाग ६- अमृतकुंभ गुळवेल ( गिलोय)

गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्‍या बारीक दोर्‍यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. तिची पाने हृदयाच्या आकाराची असतात आणि फांद्या लांब असतात. याचे फळ साधारण वाटाण्याच्या आकाराचे व लाल रंगाचे असते. […]

आयुर्वेद व जडीबुटी – भाग ४ : गोकर्ण अर्थात अपराजिता

पावसाळा सुरू व्हायचाच अवकाश की, निसर्गातल्या मोकळ्या पडीक जागांवर आपोआप रुजलेले गोकर्णाचे वेल, गर्द निळ्या रंगाने नजरेस पडू लागतात. भारतातल्या निरनिराळ्या भाषांत ह्याला निरनिराळी नावे आहेत. […]

व्हेल शार्क – देवाचा मासा

व्हेल शार्क म्हटले की मन संभ्रमात पडते. व्हेल हा तर सस्तनी आणि शार्क कास्थिमत्स्य. मात्र व्हेल शार्क म्हणजे पृथ्वीवर जगणारा आकाराने सर्वांत मोठा शार्क, १४ मीटर लांबीचा आणि सरासरी १२ १२ टन वजनाचा कास्थिमत्स्य संकटग्रस्त ठरला आहे. […]

1 6 7 8 9 10 168
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..