नवीन लेखन...

शैक्षणिक

अतितप्त अ‍ॅल्टिप्लॅनो

आपण जसे अधिकाधिक उंचीवर जाऊ, तशी हवा थंड होत जाते. त्यामुळे अतिशय उंचीवरील पठारासारख्या ठिकाणांचं किंवा उंच पर्वतांवरचं तापमान कमी झालेलं असतं. परंतु जशी उंची वाढत जाते, तसा त्या ठिकाणी होणारा सूर्यप्रकाशाचा मारा अधिकाधिक तीव्र होत जातो. तीव्र सूर्यप्रकाश झेलणारी ही ठिकाणं त्यामुळे, एका अर्थी ‘तप्त’ ठिकाणं ठरतात. […]

जिवंत जीवाश्म

सन १९९४ मधली गोष्ट… ऑस्ट्रेलिआतल्या सिडनीपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या, वोलेमाय राष्ट्रीय उद्यानातील डोंगरदऱ्यांतून काही जणांची भटकंती चालू होती. या भटकंतीदरम्यान, डेनिस नोबल यांना पाइनच्या प्रकारातलं एक अनोळखी सूचिपर्णी झाड आढळलं. […]

स्फिंक्सची निर्मिती

इजिप्त हा देश पुरातन संस्कृतीच्या निदर्शक असणाऱ्या, विविध रचनांबद्दल प्रसिद्ध आहे. या रचनांतील एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अर्थातच पिरॅमिड. परंतु पिरॅमिडबरोबरच तिथली जी आणखी एक लक्षवेधी रचना सुप्रसिद्ध आहे, ती म्हणजे गिझाचा ‘ग्रेट स्फिंक्स’. गिझाच्या सुप्रसिद्ध ‘ग्रेट पिरॅमिड’च्या जवळच, दक्षिण दिशेला वसलेला हा स्फिंक्स म्हणजे एक भव्य अश्मशिल्प आहे. […]

अँडिझवरचे उंदीर

अतिउंचीवरील परिस्थिती ही सजीवांसाठी राहण्याच्या दृष्टीनं अत्यंत बिकट असते. अतिथंड तापमान, अत्यंत शुष्क हवा, प्राणवायूची कमतरता, खाद्याचा अभाव, अशा सर्व कारणांमुळे, अधिकाधिक उंचावर जावं तसं तिथे आढळणाऱ्या पशु-पक्ष्यांची संख्या रोडावत जाते. […]

कुटुंब समृद्धी बाग आणि राहाणीमान

कुटुंब’समृद्धी बागेमुळे आपले घर व परिसर आकर्षक दिसतो. कुटुंबाचे आहार पोषण मूल्य सुधारते. जेवण रुचकर होते. शेतीच्या उत्पादनात चढउतार आले तरी कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर त्याचा अनिष्ट परिणाम होत नाही. […]

भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.

भारताचे तेरावे राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रणव मुखर्जी यांची कारकिर्द आदर्शवत अशीच आहे. माध्यम क्षेत्रातील एका खासगी पत्रिकेच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले आहे. […]

स्वच्छतेसाठी साबणाची गरज

पुष्कळ वेळा पुरेसे पाणी वापरूनही कपड़े स्वच्छ होत नाहीत. आपण त्या वेळी साबणाचा उपयोग करतो. कपडे स्वच्छ करण्यामध्ये साबण नेमकं काय करतो? आपल्या शरीरातून व केसांमधून घामाबरोबर तेलकटपणा किंवा स्निग्धांश बाहेर पडतो. शिवाय आपण तेल, व्हॅसलिन वापरतो. आपल्या खाण्यामध्ये लोणी, तूप, तेल हे पदार्थ असतातच. […]

गोरं करणारा साबण

गोरं करणाऱ्या क्रीम आणि गोरं करणाऱ्या साबणांचा खप फार मोठ्या प्रमाणात होतो. त्वचेला रंग कशामुळे येतो? आपल्या त्वचेमधील मेलेनॉसाइट पेंशींमधून स्त्रवणाऱ्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. खरं तर याच मेलॅनिनमुळे आपल्या त्वचेला अतिनील किरणांपासून सुरक्षा मिळते म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या सावळी त्वचा असणं ही एक निसर्गाने आपल्याला दिलेली भेट आहे. […]

साबण आणि डिटर्जंट यांतील फरक

डिटर्जंट आणि साबण ( तेल वापरून बनवलेले) यांमध्ये रासायनिकदृष्ट्या काहीच साम्य नाही. डिटर्जंटमध्ये तरीदेखील साबणाचे बरेचसे गुण आढळतात, ते कसे? डिटर्जंट म्हणजेच कार्बनीद्रव्य (पेट्रो-रसायने) असलेले संश्लेषित पदार्थ. साबणाच्या रेणूप्रमाणे डिटर्जंटच्या रेणूच्या कार्बनी मूलकाच्या एका टोकाचा भाग ‘जलरोधी’ तर दुसऱ्या टोकाकडील भाग ‘जलप्रेमी’ असतो. अशाप्रकारचे रेणू पाण्याचा पृष्ठीय ताण करतात. कमी त्यामुळेच डिटर्जंटमध्ये साबणाचे गुणधर्म येतात. साबणाशी तुलना करता डिटर्जंट हे अधिक कार्यक्षम आहेत. यामागे काय कारण असेल? […]

भारताच्या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील.

पहिल्या महिला राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी महिलांच्या उद्धारासाठी नेहमीच प्रयत्न केले. केवळ भारतातच नव्हे तर विदेशात ठिकठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचा यशस्वी सहभाग राहिला. […]

1 5 6 7 8 9 155
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..