नवीन लेखन...

भारताच्या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील.

जन्म: १९ डिसेंबर १९३४

पहिल्या महिला राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी महिलांच्या उद्धारासाठी नेहमीच प्रयत्न केले. केवळ भारतातच नव्हे तर विदेशात ठिकठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचा यशस्वी सहभाग राहिला.

कार्यकाळ: २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७

भारताच्या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील. डॉ. अब्दुल कलाम यांच्यानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील बांबोरी येथे झाला. घरची श्रीमंती, त्यात पाच भावात एकच लाडकी बहीण असल्यामुळे त्यांचे लहानपण लाडाकोडात गेले. जळगाव येथे एम.ए. पदवी घेतल्यानंतर मुंबई येथून एलएल.बी.ची परीक्षा देऊन त्या कायदेतज्ज्ञ झाल्या. १९६२ साली त्या जळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. त्यांनी ८ नोव्हेंबर २००४ ते २३ जुलै २००७ या काळात राष्ट्रपतिपदाची जबाबदारी पार पाडली. भारताच्या राष्ट्रपतिपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्याच महिला. सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्याच्या मंत्री होत्या. १९७९ ते ८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९८५ साली त्या राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर उपाध्यक्षा म्हणून निवडून आल्या. हा कार्यकाळ संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या. १९८९ला त्या मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. आंतरराष्ट्रीय समाज कल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्यांची उपस्थिती होती. प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेल्या परिषदेत त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. राजस्थानाचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..