नवीन लेखन...

शैक्षणिक

सुखकर हवाई प्रवास

जून-जुलै महिन्यापासून अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांच्या आई-बाबांची तिकडे जाण्यासाठी तयारी सुरू होते. काहींचा हा प्रवास पहिलाच असल्यामुळे मानसिक ताण असतो. या प्रवासाची मानसिक व शारीरिक तयारी करावी लागते. हवाई प्रवास मुख्यत्वे कित्येक तासांचा प्रवास एका बंदिस्त जागेत करावा लागतो. […]

वैमानिकांचे प्रशिक्षण महागडे तरी महत्त्वाचे…

सामान्य लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, एवढा भरमसाठ पगार घेऊन हे वैमानिक लोक संप का करतात? मुळात यांना एवढा पगार का देतात? त्यांच्या प्रशिक्षणावर एवढा खर्च का करावा लागतो? या सर्वांचे उत्तर एकच. ते म्हणजे त्यांचे उत्तरदायित्व. […]

जिवापेक्षा काहीही मौल्यवान नाही…  

आपल्या देशातील मागील काही महिन्यातील आत्महत्येच्या घटना पाहिल्या तर त्यातील काही आत्महत्या विचार करण्यास प्रवृत्त करणार्‍या होत्या. ज्या आत्महत्या कोणा अशिक्षित व्यक्तीने नव्हे तर चांगल्या उच्चशिक्षित लोंकानी केलेल्या होत्या . […]

माती ‘मातीमोल’ कशी?

खडकांची झीज होऊन माती तयार होते. ठिसळ गहू-ज्वारीचे पीठ दळायला दहा अश्वशक्तीची चक्की लागते. मग पाषाणहृदयी, वज्रतुल्य, कठीण खडकांची माती करायला निसर्गाला किती बळ आणि वेळ खर्च करावा लागत असेल? अशा महत्प्रयासाने तयार झालेल्या संपत्तीला मातीमोल ठरविणारे हे कोण असे पंचांगपंडित? […]

माणसाची बुद्धी गंजते?

संगणक कसा चालतो? त्यामध्ये काय आहे की त्यामुळे त्याला माणसाची बुद्धी असल्याचा भास निर्माण होतो? सगळेच तंत्रविज्ञान माणसाने स्वत:साठी निर्माण केले आहे. पण संगणक माणसाला सल्ला देतो असे दिसते. त्यामुळे हे शास्त्र काही वेगळे आहे. निश्चितच विज्ञान खूप प्रगत झाले आहे. […]

जगातली पहिली दिनदर्शिका

दिनदर्शिकेचा इतिहास इनिहा, मानवाने शेतकरी म्हणून जीवनास सुरूवात केली तेव्हापासून अस्तित्त्वात आला. त्यापूर्वी त्याला ऋतू आणि त्यांचा काळ आणि क्रम याबद्दल फारसे ज्ञान नव्हते. हिवाळ्यानंतर हवामानात ऊब येऊन झाडांना पाने-फुले येऊ लागतात हे देखील त्याला फार उशीरा कळले. […]

जमिनीची धूप कशी होते?

माती वाहून लुप्त होते, त्याला आपण जमिनीची धूप झाली असे म्हणतो. धूप होत असलेली जमीन अनुत्पादक होत होत शेवटी वांझ बनते. ज्या गतीने निसर्गात जमीन तयार होते. त्यापेक्षा ती खराब होण्याची गती जास्त होते तेव्हा त्या जमिनीवर अवलंबून असलेली जीवनसृष्टी धोक्यात येते. […]

‘लीप’ सेकंदाची दुरुस्ती

लीप सेकंदाची दुरुस्ती काही लीप वर्षाप्रमाणे नियमित नसते. ती दुरुस्ती सुचवण्याचे अधिकार ब्यूरो इंटरनॅशनल टेम्स (बिट) यांना आहेत. त्यांना इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिस यांची मदत होते. त्यांच्या सूचना जगातील 50 अत्यंत अचूक अशा आण्वीय पहचाळ बाळगणा या प्रयोगशाळांकडे पाठवण्यात येतात. विशिष्ट अणू-रेणूच्या आंदोलनावरील कार्यपद्धती असलेली घडचाळे अचूक असतात. (प्रतिदिन ती घड्याळे एक अब्जांश सेकंदाची चूक करू शकतात.) […]

समृद्धी आणि विनाश या सिंचनाच्या दोन बाजू कशा?

पाणी जीवनामृत आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरक्रिया पाण्यामुळेच शक्य होतात. मनुष्याच्या आणि काही प्राण्यांच्या शरीरात ७० टक्के पाणी असते. टोमॅटो, कलिंगड या पिकात तर त्याहून जास्त पाणी असते. ताण बसून कोमेजणाऱ्या झाडांना पाणी दिले की, ते तरारते. म्हणूनच म्हणतात, ‘ए फर्टाइल लॅण्ड विदाऊट वॉटर इज देझर्ट. […]

1 41 42 43 44 45 168
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..