नवीन लेखन...

एकावन्नावा वसुंधरा दिन

आज एकावन्नावा वसुंधरा दिन जगभर साजरा केला जात आहे. या वर्षीचा विषय आहे, ‘रिस्टोअर द अर्थ’- पृथ्वीचे पुनर्जीवन करा. दर वर्षी २२ एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिवस’म्हणजेच अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. पहिला वसुंधरा दिवस २२ एप्रिल १९७० रोजी अमेरिकेत साजरा झाला. […]

सनदी सेवा दिवस

दरवर्षी २१ एप्रिल रोजी भारतात सनदी सेवा दिवस म्हणजेच National Civil Service Day म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रशासनात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. […]

रामनवमी

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला. हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. […]

जागतिक संगीतोपचार दिन – २६ मार्च

जगभरात २६ मार्च हा दिवस जागतिक संगीतोपचार दिन म्हणून साजरा केला जातो. संगीतोपचार हा एक स्वास्थ्यवर्धक उपाय आहे. आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बर्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणार्‍या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे. […]

‘मंदारमाला’ नाटकाचा पहिला प्रयोग – २६ मार्च १९६३

२६ मार्च १९६३ या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी मंदारमाला हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते. […]

वैश्विक अन्न दिन

आज दिनांक १६ ऑक्टोबर. आज संपूर्ण जगात ” वैश्विक अन्न दिन ” साजरा केला जातो. आजच्या दिवसाला एक गोष्ट आपण ठरवूया की १) अन्न वाया घालवायचं नाही. २) जेवढं अन्नदान शक्य आहे तेवढं नक्कीच करु. लक्षात घ्या की, अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे. […]

वैश्विक हात स्वच्छ धुण्याचा दिन

१५ ऑक्टोबर २००८ रोजी हा दिन पहिल्यांदा साजरा केला गेला. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने ही तारीख नियुक्ती केली होती. २००८ हे साल आंतरराष्ट्रीय स्वच्छतेचे होते. […]

आंंतरराष्ट्रीय खास लहान मुलींसाठीच असलेला दिवस

११ ऑक्टोबर २०१२! या दिवशी युनायटेड नेशन्स मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील मुलींकरिता  `मुलींच्या दिना’ची सुरुवात करण्यात आली. या दिनाची पार्श्वभूमी मुलींना आंतरराष्ट्रीय पातळीवर येणार्‍या अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे ही आहे. हा दिन जगभरात साजरा होण्यासाठी व या दिनाची सुरुवात होण्यासाठी जगभरात कार्यरत असलेली प्लॅन नामक स्वयंसेवी संंस्थेने पुढाकार घेतला. या दिवसाला जगभरात साजरा करण्याची सुरुवात प्लॅन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ” मी मुलगी आहे ” या मोहिमेने झाली. […]

जागतिक टपाल दिन

आजच्या टपाल दिनापासून तरी निदान आपण आपल्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींंना, मित्रमंडळींना एक महिन्याआड पत्र लिहूयात. त्या जुन्या भावना पुन्हा अनुभवूयात आणि येणार्‍या नवीन पिढीला या साहित्यप्रकाराची नव्याने ओळख करुन देऊ. इतर संस्कृती पाळताना ही संस्कृती पुन्हा कशी वृद्धींगत होईल याचा विचार करुया. चला तर मग लागू कामाला आणि इतरांनाही थोडं कामाला लावू. […]

न्यु सेंच्युरी थिएटर – न्युयॉर्क

आज दिनांक ६ ऑक्टोबर. १९२१ साली याच दिवशी न्युयॉर्कमध्ये उच्चभ्रु असं ब्रोडवे थिएटर उभारण्यात आलं होतं. त्या थिएटरचं नाव होतं न्यु सेंच्युरी थिएटर. हे थिएटर न्युयॉर्कमधील नावाजलेलं शहर मॅनहॅटन येथे वसलेलं होतंं. थिएटरची आसन व्यवस्था १७०० इतकी होती. या संपूर्ण थिएटरचं स्थापत्य हबर्ट जे. क्रॅप यांचं होतं आणि या थिएटरवर मालकी हक्क शुबर्ट या संस्थेचा होता. […]

1 59 60 61 62 63 73
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..