नवीन लेखन...

आंंतरराष्ट्रीय खास लहान मुलींसाठीच असलेला दिवस

 

११ ऑक्टोबर २०१२! या दिवशी युनायटेड नेशन्स मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील मुलींकरिता  `मुलींच्या दिना’ची सुरुवात करण्यात आली. या दिनाची पार्श्वभूमी मुलींना आंतरराष्ट्रीय पातळीवर येणार्‍या अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे ही आहे.

या दिनाचा इतिहास काहीसा असा आहे  –

हा दिन जगभरात साजरा होण्यासाठी व या दिनाची सुरुवात होण्यासाठी जगभरात कार्यरत असलेली प्लॅन नामक स्वयंसेवी संंस्थेने पुढाकार घेतला. या दिवसाला जगभरात साजरा करण्याची सुरुवात प्लॅन आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ” मी मुलगी आहे ” या मोहिमेने झाली.

मंडळी जरा खोलवर जाऊन विचार केला तर खरच तिच्याशिवाय आपल्याला काहीच दिसणार नाही. मुळात या सृष्टीचं बीजच ती आहे. आपण सगळे तिला आदिशक्ती म्हणून पूजतो.

बघा ना!

आपला जन्म जिच्या उदरातून होतो ती आईसुद्धा ” ती ” च असते.
आपल्या आयुष्यातला पहिला गुरु आईच असते.
अहो एवढंच काय आपण ज्या पाटीवर किंवा वहीवर पहिलं अक्षर लिहितो ती सुद्धा ” ती “,
आपण ज्या पृथ्वीवर रहातो ती सुद्धा ” ती “,
आपण जी विद्या ग्रहण करतो ती पण ” ती “,
आपल्यात जी शक्ती असते ती पण ” ती “,
आपण मोठंं होऊन जी लक्ष्मी कमावतो ती पण ” ती ”
आपण आयुष्यात जी कर्मं करतो ती पण ” ती “,
आपल्याला जी जेवणापूर्वी लागते ती भूक पण ” ती ”
अहो अजून आपल्या जीवनाचं अंतिम सत्य पण ” ती ‘च. चिरनिद्रा!
आपला देह जाळणारी आग पण ” ती ”
त्यानंतर आपल्या देहाची होणारी राख पण ” ती ”
ज्या मातीत ती राख मिसळते ती मातीही ” ती ” च.

अहो भगवंतही ” ती ” चंं महत्व जाणतात, म्हणून तर भगवान श्रीकृष्णांच्या नावाआधी राधा , मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्रांच्या नावाआधी सीतामाईचं नाव आणि भगवान विष्णूंच्या नावाआधी लक्ष्मीमातेचं नाव लावलं जातं. भगवंतांनी जे रामायण आणि महाभारत घडवून आणलं ते ही ” ती ” च्या साठीच. मग आता मला सांगा या ” ती ” च्या जगात आपल्या  ” मी ” चा प्रभाव कुठे आहे? म्हणून, अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्याला पाश्चिमात्य संस्कृतीचं फार अप्रुप वाटतं आणि आपण त्या संस्कृतीला लवकर स्विकारतो; पण मजेची बाब ही आहे की, ते आता आपल्या संस्कृतीचा अभ्यास करुन तिला स्विकारत आहेत.

निदान या दिवसाचं औचित्य साधत आपण एक शपथ घेऊ की ” ती ” आपल्यासाठी संधी नसून आपली जबाबदारी आहे. कधीच तिला खाली पडू देणार नाही. मग बघा ” ती ” आपली शक्ती बनून कशी खंंबीरपणे आपल्या पाठीशी उभी रहाते.

— आदित्य दि. संभूस 

#International Day Of Girl Child #11th October

 

Avatar
About आदित्य संभूस 77 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..