नवीन लेखन...

अमेरिकेचा २४२ वा स्वातंत्र्यदिन

१७७६ साली हा देश ब्रिटीशांच्या शासनातुन मुक्त झाला. २०० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटुनही अजूनही इथे हा दिवस साजरा करण्याचा उत्साह टिकुन आहे. या दिवशी देशाला उद्देशुन राजकीय भाषणे, सार्वजनिक सुट्टी, परेड इथे केले जातात. पण त्याचबरोबर ह्या दिवशी इथल्या मोठमोठ्या शहरात होणारी आकर्षक आतिषबाजी हे मुख्य आकर्षण. देशाची राजधानी वॉशिंग्टन, तसेच मियामी, न्युयॉर्क ह्या शहरांमध्ये होणारी आतिषबाजी बघायला लोकं जगाच्या कानाकोपऱ्यातुन येतात. न्युयॉर्कमध्ये होणारी आतिषबाजी ही सर्वात मोठी आणि आकर्षक मानण्यात येते. १७७६ मध्ये आजच्या दिवशी अमेरिकन वसाहतींमधील प्रतिनिधी सभेने स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला व स्वत:ला ‘स्वतंत्र’ घोषित केले. […]

जागतिक फणस दिवस

फणस हा आरोग्यदायी आहे ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे आपल्याकडे फणस हा फक्त चवीसाठी आणि भुकेसाठी खाल्ला जातो, मात्र खरंतर फणसात जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब-6 आणि जीवनसत्त्व क ची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. जीवनसत्त्व ‘अ’ हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर असते. जीवनसत्त्व ब6 हे मेंदूच्या विकासासाठी पोषक असते आणि जीवनसत्त्व क हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. […]

जागतिक प्लास्टिक बॅग फ्री दिवस

प्लास्टिकचा गैरवापर ही आपली क्षुद्र मनोवृत्ती आहे. पर्यटनाच्या नावाखाली तसेच देवदर्शनाच्या नावाखाली अनेकजण, बसेस, खासगी वहानाने जातात. खाणे-पिणे झाल्यावर, जवळपास सर्व कचरा फेकून देतात. त्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, इतर पदार्थ, पेले वगैरे असतात. हे सर्व कचरापेटीत टाकणे त्यांच्या लक्षात येत नाही की हे मुद्दाम होते, हे समजत नाही. एकाने एका ठिकाणी कचरा केला की दुसऱ्याला त्याचा फायदाच होतो. तो त्या ठिकाणी परत कचरा टाकतो. अशा रीतीने कचऱ्याचे ढीग निर्माण होतात, ते ढीग काढण्याकरिता एक यंत्रणा राबवावी लागते. […]

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ स्थापना दिन

महिलांनी शिकावे, स्वावलंबी व्हावे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी २ जुलै १९१६ रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली. भारतातीलच नव्हे तर मध्य पूर्व आशियातील केवळ महिलांसाठी असलेले हे पहिले विद्यापीठ आहे. […]

देवदूत दिन

पूर्वी राजे महाराजे आपल्या पदरी राजवैद्य ठेवायचे. ते नाडी परीक्षा करुन, जडीबुटीची औषध देऊन उपचार करायचे. कालांतराने आजारांवर नवीन औषधे निघाली. इंजेक्शन देऊन उपचार होऊ लागले. […]

देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक संस्थेचा स्थापना दिन.

आपल्या गुरूच्या आज्ञेवरून १ जुलै १९२५ रोजी ‘देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ या संगीत विद्यालयाची स्थापना केली. गिरगावातील प्रार्थना सभेच्या जागेमध्ये विद्यालय सुरू केले. विद्यालयाचे नामकरण श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले . […]

गुड्स आणि सर्व्हिसेस करप्रणालीची चार वर्षं

वस्तू आणि सेवा कराची ‘ऐतिहासिक’ अंमलबजावणी सुरू झाली, त्यानिमित्त मध्यरात्री संसदेचे अधिवेशन बोलावले गेले आणि १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताचा जो ‘नियतीशी करार’ झाला त्याप्रमाणे समारंभ करून २०१७ सालच्या १ जुलैला वस्तू आणि सेवा कर – गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स- ही नवीन कर प्रणाली आणली गेली. […]

चार्टर्ड अकाऊंटंट्स डे

‘य एष सुप्तेषु जागर्ति’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. ‘असा माणूस जो झोपी गेलेल्यांना जागं करतो’ हा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. कंठोपनिषदातील हे वाक्य श्री अरबिंदो यांनी १९४९ च्या स्थापनेच्या दिवशी ICAI ला ब्रीदवाक्य म्हणून दिलं. […]

पोस्टकार्ड दिवस

भारतात सुरु झालेल्या पहिल्या पोस्ट कार्डची किंमत फक्त ३पैसे होती, त्यावेळी पहिल्या तिमाहित रु. ७.५० लाख पोस्टकार्डांचा खप झाला होता पहिल्या पोस्टकार्डवर डिझाईन आणि छपाईचे काम मेसर्स थाॕमस डी ला रयू या लंडनच्या कंपनीने केले होते […]

महाराष्ट्राचा कृषी दिवस

शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज यांच्या विचारातून या संकल्पनेचा उगम झाला व तो तसाच पुढे चालत राहिला. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडात शेतकऱ्याला खूप महत्वाचे स्थान होते. […]

1 57 58 59 60 61 76
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..