नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

वास्तुकलेचा जनक ग्रीस

जुन्या काळच्या पौर्वात्य आशियाई आणि पाश्चिमात्य युरोपीय जगाच्या मध्यावर ग्रीस हा देश येतो. या भौगोलिक स्थानामुळेत्याला अनन्यसाधारण व्यापारी महत्त्व होते. ग्रीसने जगात अनेक अनमोल देणग्या दिल्या त्यापैकी एक म्हणजे वास्तुकला. प्राचीन ग्रीक संस्कृतीचा रसायनात रुजून आजची पाश्चिमात्य संस्कृती घडली. […]

राष्ट्रीय कॅलेंडरचा वापर

राष्ट्रीय कॅलेंडरची तारीख दररोज आकाशवाणी व दूरदर्शनवर प्रसारण सुरु होताना सांगितली जाते. प्रमुख वर्तमानपत्रांमध्येही आतल्या पानावर रोजचे पंचांग दिलेले असते. तिथेही भारतीय राष्ट्रीय सौर तारीख दिलेली असते. रिझर्व्ह बॅंकेच्या कॅलेंडरमध्येही या तारखांचा उल्लेख असतो. राष्ट्रीय सौर कॅलेंडरही काही संस्था प्रकाशित करु लागल्या आहेत. आपणही सौर कॅलेंडरचा वापर करु या. सुरुवात स्वतःपासून करु. […]

मानसोल्लास ग्रंथातील पाकशास्र

भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक  अशी बिरूदे असणारा राजा सोमेश्वर याचा ‘मानसोल्लास’ अर्थात ‘अभिलषितार्थचिन्तामणि’ हा ग्रंथ. (शतक १२ वे). हा ग्रंथ म्हणजे एक ज्ञानकोशच आहे. राजा सोमेश्वर हा चालुक्य कुलातील राजा असून त्याने स्वत: या ग्रंथाला ‘जगदाचार्यपुस्तक’ असे नाव दिली आहे. राजाचा आहार असा या मांडणीचा विषय असला तरी तत्कालीन पाककृतींचा परिचय त्याद्वारे करून देणे असा या लेखाचा प्रमुख उद्देश आहे. आधुनिक काळात पाकशास्त्र विषयाचे प्रशिक्षण महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थाना उपलब्ध आहे. परंतु १२ व्या शतकात सोमेश्वर राजाने सांगितलेले अन्नाविषयीचे तपशील आजच्या काळातही उपयुक्त आहेत. […]

आकाश कंदील तेजाचा दूत

दिवाळी या शब्दातच दिव्याचे महत्व अधोरेखित होते. ज्यावेळी विद्युत पुरवठा उपलब्ध झालेला नव्हता अशा काळात आकाशकंदीलाचे महत्व विशेष होतेच. […]

पंप रामायण

उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनीन आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच  प्रसिद्ध पावले. या रामायणाचा कर्ता नागचंद्र  याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक  व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते. […]

संकासुर.. प्रवास एका असुराचा… देवत्वाकडे

एका असुराने ज्ञानाचं भांडार सामान्य जनांसाठी खुलं केलं म्हणून त्याचा वध झाला. वध होण्यापूर्वी तो हे ज्ञानाचं संचित घेऊन समुद्रातील एका शंखात लपला. देवांच्या विनंतीवरून विष्णूने माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंखात लपलेल्या या असुराचा वध केला….. शंखात लपलेला म्हणून शंखासुर…. संकासूर. डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणूनही शंकासूर. […]

राष्ट्रीय कॅलेंडर आणि इंग्रजी कॅलेंडर

राष्ट्रीय आणि इंग्रजी ही दोन्ही कॅलेंडर सूर्यावर आधारित आहेत. त्यामुळे त्यात १२ महिने आणि ३६५ दिवस आहेत. प्रत्येक दिवस हा तारखेने दर्शविला जातो आणि तारीख मध्यरात्री बदलते. ऋतूंशी मेळ रहावा म्हणून यामध्ये ४ वर्षातून १ दिवस जास्त घ्यावा लागतो. त्यामुळे या शृंखलेतील चौथे वर्ष हे ३६६ दिवसांचे असते. या कारणामुळे इंग्रजी कॅलेंडर सुटसुटीत आहे. वरील सर्व गोष्टी राष्ट्रीय कॅलेंडरलाही लागू असल्यामुळे राष्ट्रीय कॅलेंडर ही वापरण्यास सोपे आणि सुटसुटीत आहे. राष्ट्रीय कॅलेंडरचा वेगळेपणा आता पाहू. […]

जुन्या गोष्टी नवे बदल (राष्ट्रीय कॅलेंडर)

भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरची ही उपेक्षा आपण किती काळ सहन करणार ? सरकारने ते करावं असं नुसतं म्हणून चालणार नाही. जनतेकडून यासंबंधीची चळवळ उभी राहिली तरच या कॅलेंडरचे अस्तित्व राहील. अन्यथा कागदोपत्री असलेले हे अस्तित्वदेखील काळाच्या ओघात नाहीसं होईल की, काय असे वाटते.  […]

गृहनिर्माणातील पागडी संस्कृती

‘पागडी’ हा शब्द घरासंदर्भात वापरला जातो. मुंबईकरांच्या अतियंत जिव्हाळ्याचा असलेला हा शब्द, हल्लीच्या पुनर्विकास आणि त्यातून मिळणाऱ्या ओनरशिप घरांच्या काळात हळुहळू विस्मृतीत चाललाय. पण एकेकाळी मुंबईत कुठेही घर घ्यायचे असलं, की ते पागडीनेच मिळायचं. आजची वैभवशाली मुंबई घडवलीय, ती अशाच पागडीच्या घरात राहून कष्ट करणाऱ्या मुंबईकरांना. या अर्थाने ‘पागडी’ या शब्दाशिवाय मुंबईचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. […]

1 26 27 28 29 30 71
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..