नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

ज्ञात अज्ञात पंढरपूर १ – चंद्रभागा मंदिर

पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० टाळकरी उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर. मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही. गावकऱ्याना हे मंदिर चंद्रभागेचे आहे हे ज्ञात नाही तर महाराष्ट्र अन् परराज्यातील गावोगावातून भक्तांना काय कळणार? […]

वाढदिवस की घटदिवस

इंग्रज गेले पण कांही भंपक पध्दती सोडून गेले. कोशल्येने रामाचा वाढदिवस साजरा केल्याची कथा ना वाल्मिकींना सुचली ना गदिमांना सुचली. कॉंव्हेंटमधल्या मुलांना रामनवमी म्हणजे लॉर्ड रामाचा हॅपी बर्थडे येवढेच शिकवले जाते. […]

स्तुत्य आणि अनुकरणीय वाट !

कोरोनामुळे जग बदलत आहे, अजूनही बदलणार आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांवरच नाही तर सामाजिक परंपरा आणि चालीरीतीवरही याचा परिणाम होत आहे, यापुढेही तो होणार आहे. मात्र, हा बदल महाराष्ट्रातील जनता लढाऊ वृत्तीने आणि सामाजिक जाण भान जपत स्वीकारत आहे, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल. आषाढी एकादशी आणि वारीच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला. लाखो विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत जवळपास पंधरा दिवस साजरा होणारा पंढरीच्या वारीचा महोत्सव यंदा सरकारी नियम पाळून अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. […]

श्री वेंकटेश मंगलाशासनम् – मराठी अर्थासह 

स्वामी `प्रतिवादी भयंकर’ अण्णा रचित मंगलाशासनम् म्हणजे व्यक्तिगत स्वार्थांपासून दूर होऊन अत्युच्च पातळीची भक्तिपूर्ण प्रार्थना जेथे केवळ भगवंताच्याच कल्याणाचा विचार केलेला असतो. मंगलाशासनम् म्हणजे भक्ताची वेंकटेशाबद्दलची सततची वचनबद्धताच होय. […]

अंतरंग – भगवद्गीता – भाग २

प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही! अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले. […]

अंतरंग – भगवद्गीता – भाग १

एकुण काय तर एका पानावर १० श्लोक छापले तर केवळ ७० पाने; म्हणजे गीता हे एका छोट्या गोष्टीच्या पुस्तकाइतके लहान पुस्तक आहे. उत्तम कलाकृती म्हणून गाजलेले पुस्तक किंवा चित्रपटसुद्धा काही वर्षांनंतर विस्मृतीच्या पडद्याआड जातात. गाणी किंवा चित्रपटाचे संगीत तर रोज नवीन येते आणि जुन्याला मागे ढकलते. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्याइतके आणि आजही लोकांना आकर्षक वाटावे असे गीतेत आहे तरी काय? उत्तर अगदी सोपे आहे. […]

श्री वेंकटेश स्तोत्रम् – मराठी स्वैर अनुवादासह

आपल्या आराध्य देवतेची स्तुती करून तिला प्रसन्न करून कृपाप्रसाद प्राप्त करणे हे कोणाही भक्ताचे उद्दिष्ट असते. स्तोत्र पठण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा यांनी मुख्यत्त्वे तोडक वृत्तात (सससस) रचलेल्या या स्तोत्रात श्री व्यंकटेशाचे गुणवर्णन व स्तुती आहे. कृपा किंवा उपकार एखाद्या गोष्टीची परतफेड म्हणून किंवा कारणाविना निर्हेतुक असू शकतात. येथे याच निर्हेतुक कृपेची तसेच आपल्या हातून जे अनेक अपराध, दुष्कृत्ये घडल्रेली आहेत त्याबद्दल क्षमा मागून याचना केली आहे. […]

मी पाहिलेला होक्काइदो – साप्पोरो (जपान वारी)

हाकोदाते पाहिल्यानंतर पुढे ओढ लागली ती म्हणजे होक्काइदोची कॅपिटल सिटी पाहण्याची. “साप्पोरो” हे होक्काइदो मधील सर्वात मोठे शहर असुन इकडे येण्याचा सगळ्यात सोयीस्कर मार्ग म्हणालं, तर हवाई मार्ग.साप्पोरो Planned City असल्यामुळे, शहराची रचना पद्धतशीर आहे. […]

जपान देश आणि इथली माणसं ! (जपान वारी)

जपान या देशात 47 prefectures (राज्य म्हणूयात) आहेत. बाकी सविस्तर माहिती Google च्या कृपेने आजकाल एका Click वर उपलब्ध आहे. तर या देशाच्या चार मुख्य भूभागातील एक आहे “होक्काइदो”. “होन्शू” या मुख्य भूभागानंतरचा जपान मधला मोठा भुभाग. जपानच्या नकाशात पाहिलं तर सगळ्यात मोठा प्रदेश दर्शवणारा हा होक्काइदो. ‘जपान मधला स्वर्ग’ म्हटलं तरी अतिशयोक्ती वाटू नये इतका इथला निसर्ग सुखावणारा आहे. होक्काइदो ची राजधानी असलेले शहर म्हणजे “साप्पोरो” त्या बद्दल नंतर सविस्तर पाहुया… […]

1 17 18 19 20 21 71
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..