नवीन लेखन...

भारतीय शिल्पशास्त्राची सहा मुलतत्वे

ज्या भौतिक वस्तुच्या निर्मितीशास्त्राला इंग्रजीत “ इंजिनिअरिंग” म्हणतात त्याला शिल्पशास्त्र असे व्यापक अर्थ असलेले भारतीय नांव आहे. शिल्पशास्त्र मनुष्य जन्मापासून विकसित होत गेले. आधुनिक अभियांत्रिकी शास्त्रांत अंतर्भाव असलेली अनेक शास्त्रे प्राचीन भारतांत विद्यमान होती. भृगु ऋषींनी या शिल्पशास्त्र विषयाचे दहा उपशास्त्रे, बत्तीस विद्या व चौसष्ठ कला या मध्ये विभागणी केली. वास्तुशास्त्र हे सातवे उपशास्त्र. […]

गढीची माती सिमेंटहून मजबुत

घामणगांव ( जिल्हा –अचलपूर-महाराष्ट्र) येथे २५० वर्ष जूनी गढी (मातीचा किल्ला) आहे. या गढीची माती सिमेंटपेक्षा उत्तम काम देते.  ३५ वर्षांपूर्वी दगड व ही माती वापरून बांधलेल्या गांवातील विहिरी अजूनही इतक्या मजबून आहेत की छिन्नी हतोडयाने फुटत नाही. […]

हिंदी भाषा – इतिहास, भूगोल आणि अंकगणित

नागपूरातील कोणतीही मराठी व्यक्ती घराच्या बाहेर पाऊल टाकल्या हिंदीमध्ये बोलचाल सुरू करते मग समोरची ब्यक्ती मराठी पानवाला, रिक्षावाला, भाजीवाला किंवा चहावाला का असेना. कारण त्याच्या रक्तातच हिंदी असते. त्याचेसाठी वर्षाचा प्रत्येक दिवसच राष्ट्रभाषा दिवस असतो. याच्याविरुध्द परिस्थिती म्हणजे ७० ते ८० वर्ष नागपूरात वास्तव्य करणारे अमराठी. ते कधीही मराठी बोलण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करणार नाहीत, मराठी बातम्या ऐकणे तर दूरच. कारण नागपूरचे मराठी लोक त्यांच्याशी हिंदीतच बोलतात. भारताच्या कोणत्याही शहरात हे दृष्य तुम्हाला दिसणार नाही. […]

भारतीय शब्दकोषातील पंचांगे

पंचांग या संस्कृत शव्दाचा अर्थ पांच अंगे (पंच+अंग). माणुस गणना करण्यासाठी एका हाताच्या पांच बोटांचा उपयोग, एकेक बोट दुमडून करतो. अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तो एका समुहांत (पंचांगात) समाविष्ठ करतो. अशाच कांही पंचागांचे संक्षिप्त वर्णन….. […]

वाढदिवस की घटदिवस

इंग्रज गेले पण कांही भंपक पध्दती सोडून गेले. कोशल्येने रामाचा वाढदिवस साजरा केल्याची कथा ना वाल्मिकींना सुचली ना गदिमांना सुचली. कॉंव्हेंटमधल्या मुलांना रामनवमी म्हणजे लॉर्ड रामाचा हॅपी बर्थडे येवढेच शिकवले जाते. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..