नवीन लेखन...

भारतीय शब्दकोषातील पंचांगे

पंचांग या संस्कृत शव्दाचा अर्थ पांच अंगे (पंच+अंग). माणुस गणना करण्यासाठी एका हाताच्या पांच बोटांचा उपयोग, एकेक बोट दुमडून करतो. अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तो एका समुहांत (पंचांगात) समाविष्ठ करतो. अशाच कांही पंचागांचे संक्षिप्त वर्णन खालील प्रमाणे;

१-खगोल घटना – यातील पांच अंगे म्हणजे वार, तिथी, नक्षत्र,योग व करण .
• वार- सगळ्यांनाच माहित असलेला –सोमवार ते रविवार – ७
• तिथि –शुक्ल पक्ष व कृष्णपक्षात प्रत्येकी १५, शुक्ल प्रतिपदा ते पौर्णिमा,कृष्ण प्रतिपदा ते अमावास्या -३०.
• नक्षत्र – २७- अश्विनी भरणी इत्यादि , प्रत्येक दिवशी कोणतेतरी नक्षत्र उदितमान असते.
• योग – २७-
• करण -६० अधिक माहितीसाठी कोणतेही पंचांग उघडून पहा.

प्राचीनकाली ग्रंथ केव्हा पूर्ण झाला हे या पांच गोष्टींनी व्यक्त करत कारण ह्याच पांच गोष्टी हजारो वर्षानी पून्हा एकत्र येण्याची शक्यता असते.

२- जीव शास्त्र (बॉटनी) – झाडाची मुळे, खोड,पाने,फुले व फळे यांना वृक्षाचे पंचांग म्हणतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये यांचा उपयोग होतो जसा शतावरीच्या मुळांपासून शतावरी सत्व, गिलोय सत्व –वेलीच्या दांड्यांपासून, रुईच्या पानांचा चीक, फुलांपासून गुलकंद, आवळ्यापासून च्यवनप्राश इत्यादि.

३-पंचलवण- आयुर्वेदात पांच प्रकारची लवणे (मीठे ) सांगितली आहेत, त्यापैकी तीन सर्वांच्या परिचयाची असतील.
• समुद्री लवण –समुद्राच्या पाण्यापासून बनवलेले , मीठागराचे मीठ जे आपण रोज स्वयंपाकात वापरतो.
• सौवर्चल लवण -सैधव मीठ- काळे मीठ, गंधकाचा वास व चव असलेले हे मीठाच्या खाणीत सापडते.
• रोमक लवण- सांबरलवण –राजस्तानच्या सांबर या खा-या पाण्याच्या तलावाच्या पाण्यापासून बनवलेले.
• औभिड लवण – खारट मातीपासून बनवलेले , आयुर्वेदिक औषधी म्हणून वापरतात. .

४- पंचगव्य – गाईपासून मिळणारे पांच घटक –दुध, दही, तुप, गोमुत्र व गोमय . हिंदु लोक श्रावणीला या पंचगव्याचे सेवन धार्मिक विधी म्हणून करतात.

५-पंच मृदा- माती पांच प्रकारची असते, सुपिक माती , वारुळाची माती, गेरु, खडूची माती व क्षार माती (सलाईन). धातु वितळवण्यासाठी लागणा-या मुषा (कृसीबल) अशा मातीपासून बनवत असत.

६- पंचमहाभुते- पृथ्वी, आप (पाणी), अग्नि, वायु आणि आकाश. तैतरिय ब्राम्हण ग्रंथांत सर्वप्रथम ही संकल्पना आढळते. यापैकी कुठल्याही गोष्टीत प्रदुषण वाढले की पर्यावरण विघडते. या पंचमहाभुतांना देवता स्वरुप मानले गेले व त्यांच्या स्तुतीवाचक अनेक सुक्ते वेदांत आठळतात, जसे भूमि सुक्त, जल सुक्ते (आपोहिष्ठा, नदीसुक्त ) इत्यादि.

माणसाला ईश्वराने ११ इंद्रिये दिली आहेत त्यापैकी एक मन, पांच ज्ञानेंद्रिये व पांच कर्मेंद्रिये अशी एकुण ११ इंद्रिये. त्यापैकी मनाची व्याप्ती व शक्ती कोणालाच अजून कळली नाही.

७-पंचेंद्रिये (ज्ञानेंद्रिये) ज्यामुळे ज्ञान प्राप्त होते. जसे डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा . काही जनावरांची काही इंद्रिये मनुष्यापेक्षा आघिक कार्यक्षम असतात. जसे कुत्र्याची वास घेण्याची शक्ती, घार गरुड यांची नेत्रदृष्टी इत्यादि.

८-पांच कर्मेंद्रिये- या कर्मेंद्रियाकडून कार्य घडते, ती कर्मेंद्रिये अशी आहेत वाणी ,हस्त (हात) , पाद (पाय), पायु (मलमुत्र नि:सारण करणारी इंद्रिये) व उपस्थ (जननेंद्रीय) .

९- पंच आब –पांच नद्या-झेलम (वितस्ता) चिनाब, रावी, सतलज व बियास (व्यास). अशा पांच नद्या ज्या प्रदेशात वाहतात त्याला पंजाब असे नाहे.

१०- पंचलोह (पंचधातु) – हा मिश्र धातु मुर्ती किंवा अंगठ्या बनवण्यास वापरतात, यात सोने १ भाग,चांदी ४ भाग, शिसे ८ भाग, तांबे ८ भाग,व लोखंड ०.१ भाग,असे या धातुंचे मिश्रण असते .

११ –पंचरत्ने -१-हिरा, २-मोती, ३-माणिक ,४-पाचु व ५- नीलम अशी पंचरत्ने

१२- पंचांम्ल (अॅससिड )- पांच फळाचे रस -१-बोरे,२-डाळिंब, ३-चिंच, ४-लिंबु व ५- आमसुल

१३- पंचद्रावक – धातु वितळविण्याचे कामी येतात असे पांच सेंद्रिय (ऑरगेनिक ) पदार्थ . १-गुंज, २-टाकणखार, ३-मध, ४-तुप व ५-गुळ / काकवी

१४- पंचवायु – योगशास्त्रात मनुष्य शरिरातील पांच प्रकारचे वायु (हवा) असतात असे सांगितले आहेत. त्याबद्दलची माहिती खालिलप्रमाणे.

वायु शरिरातील ठिकाण शाररिक क्रिया
प्राण मस्तक व छाती प्राशन, स्फुर्ती, अग्रगती, चेतना
अपान मुत्रपिंड उर्ध्व्गती, अधोगती, निष्कासन
समान नाभि आंतर्शोष, स्थिरीकरण, एकत्रीकरण
उदान कंठ वृध्दी,वाणी, उच्चार , उर्ध्व्गती
व्यान संपुर्ण शरिर संचारण , प्रसरण

संदर्भ –

• रसार्णव – टीका इंद्रदेव त्रिपाठी ,चौखंबा प्रेस, काशी.
• हिंदु धर्माचा शब्दकोष –स्वामी हर्षानंद, रामकृष्ण मठ, बंगळुरू
• औषधी दर्शन –लेखक नाडकर्णी, धुतपापेश्वर प्रकाशन पनवेल, मुंबई

— प्रा. अशोक नेने
भ्रमण ध्वनी -8329509522

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..