नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

अच्युताष्टकम् – मराठी अर्थासह

हल्ली बहुतेक सार्वजनिक आणि अनेक खासगी पूजांनंतर ‘घालीन लोटांगण’ या प्रार्थना श्लोकांमध्ये समाविष्ट ‘अच्युतं केशवं’ या श्लोकाने सुरुवात होणारे हे अत्यंत रसाळ आणि सोपे अष्टक श्रीमद शंकराचार्यांनी ‘स्रग्विणी’ वृत्तात (रररर) रचले आहे. श्रीविष्णूची विविध नावे व मुख्यतः राम व कृष्ण अवतारांभोवती गुंफलेले हे स्तोत्र अत्यंत गेय आणि लोकप्रिय आहे. […]

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ७ – पारिजात

पारिजातकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते. गावात बहुतांश लोकांच्या अंगणात पारिजातचे झाड असतेच. पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण अतिशय प्रसन्न असते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे. […]

श्रीगणेशाचे आध्यात्मिक महत्त्व

गणपतीच्या चार हातात कुऱ्हाड, दोरी, मोदक आणि कमळ आहे. कुऱ्हाड, आध्यात्माच्या कुर्‍हाडीने इच्छेचा नायनाट करता येतो. दोरी हे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे आपल्याला संसारापासून, भौतिक जगापासून दूर करण्यास मदत करते, ज्यामध्ये आपण गुंतलेलो असतो. मोदक हे साधकाला आध्यात्मिक साधनेतून मिळणाऱ्या आनंदाचे प्रतीक आहे. आणि कमळ म्हणजे आत्म-साक्षात्काराच्या त्या दैवी अवस्थेसाठी ज्याची प्रत्येक मनुष्य जाणीवपूर्वक किंवा नकळत इच्छा करतो. […]

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ६ – कदंब

निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. हिरवाकंच डेरेदार पसारा आणि त्यात मधेमधे डोकावणारी पिवळी गोल फळं. कदंबाला दृष्ट लागेल असा डोळ्यांना सुखावणारा वृक्ष. कदंबाचा पसारा आणि दैवी गुण यामुळे त्याला देव वृक्ष असे संबोधतात. […]

सूर्यमण्डलस्तोत्रं – मराठी अर्थासह

सूर्यमंडल स्तोत्र भविष्य पुराणांतर्गत एक भाग आहे. यालाच सूर्यमंडल अष्टकम् असेही नाव आहे (परंतु श्लोकसंख्या ८ पेक्षा अधिक आहे). सूर्याच्या स्तुतीला वाहिलेल्या या स्तोत्राची रचना इन्द्रवज्रा वृत्त तसेच अनुष्टुभ छंदात केली आहे. […]

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ५ – बेल वृक्ष (बिल्व वृक्ष)

बेल वृक्ष (बिल्व वृक्ष) : बेल हा पानझडी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ईगल मार्मेलॉस आहे. लिंबू व संत्रे या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. बेल हा वृक्ष मूळचा उत्तर भारतातील असून नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, बांगला देश, कंबोडिया, थायलंड इ. देशांत निसर्गत: वाढलेला आढळतो. भारत, श्रीलंका, जावा, फिलिपीन्स व फिजी या देशांत बेलाची लागवड […]

संस्कार आणि संस्कृति

कर्म आणि संस्कार ह्या मध्ये एक सूक्ष्म धागा आहे जर त्याला जाणीवपूर्वक, युक्तीने तोडण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आले तर पूर्ण जीवनच बदलून जाईल. […]

काशी विश्वनाथ धाम

काशी विश्वनाथ धाम हे भारतीय संस्कृती आणि श्रद्धा यांचा सर्वात जुना आणि महान केंद्रबिंदू आहे. आज ते गेल्या तीन हजार वर्षातील सर्वात मोठे आणि भव्य स्वरूप अनुभवत आहे. 250 वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिरोे नूतनीकरण केले. त्यानंतरचे हे सर्वात मोठे नूतनीकरण आहे. […]

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ४ – शमी

याचा प्रसार भारतातील उष्ण व रूक्ष प्रदेशांत सर्वत्र आहे. जमिनीत आत ओलावा आणि वर वाळू असली तरी हा वृक्ष चांगला वाढतो. हा वृक्ष काटेरी आहे. पानांच्या विरुद्ध बाजूला अणकुचीदार, बाकदार काटे असतात. जुनी पाने गळण्याच्या वेळेसच नवीन पालवी फुटते. फुले पिवळी, गुलाबी लहान आणि एका दांड्यावर असतात. […]

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ३ – उंबर ( औदुंबर)

नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते, किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. […]

1 18 19 20 21 22 77
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..