मार्च २३- माझे रायपूरला “मराठी भाषेचा नाटयप्रवास ” या विषयावर व्याख्यान झाले. संयोजक होते – महाराष्ट्र मंडळ ! १९३५ पासून कार्यरत असलेले आणि मराठी मातीपासून दूर रुजलेले हे बी आता फोफावले आहे. त्यांचे वर्षभर अनेकविध उपक्रम सुरु असतात. मी पूर्वी रायपूरला असताना त्यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार होतो. आता तर renovation चे प्रचंड काम त्यांनी हाती घेतलेले आहे. […]
आपल्याला “शिक्षा ” होणार नसली तरीही “प्रायश्चित्त ” तरी आपण घ्यायला हवे. आणि ते सोपे आहे- हात जोडून त्यांची साऱ्यांच्या वतीने माफी मागायची. मगच आपण आपल्या दैनंदिन जीवनात परतू शकू. जितका अपराध मोठा,तितके प्रायश्चित्तही मोठेच ! […]
” शिवरंजनी ” हा मुळातच राज कपूर, शंकर -जयकिशन, लता,मुकेश मंडळींचा आवडता राग ! यातल्या रचना भेदक असतात. “संगम ” (१९६४) मधील “ओ मेरे सनम” हे गाणे याच घराण्यातील ! […]
ताण-तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण-तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण-तणावांना काही देणे-घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे. […]
….. एकेकाळी यालाच आपण “एकत्र कुटुंबपद्धती ” म्हणत होतो आणि हळूहळू त्या पॉटमधील नातं वितळत गेल्यामुळे (अजूनही माझ्या बघण्यात काही सन्माननीय अपवाद आहेत) आता ती “विभक्त कुटुंब पद्धती” झालीय आणि अविभाज्यपणे जीवनपद्धती म्हणून स्वीकारली गेली आहे. सगळी छोटीछोटी घरे म्हणजे सॅलड बाउल्स ! […]
आपले दिवस सरले तेव्हा गाशा गुंडाळलेला बरा, असं त्या वाड्याला वाटत असेल कां ? भर डेक्कनवर, चव्हाट्यावर आपलं वय झाल्याचं वर्तमान प्रसिद्ध केल्याबद्दल संकोच, किंचित उद्वेग आणि बराचसा राग त्या वास्तूच्या मनात आला असेल कां ? किंवा ” मेकअप ” मुळे आपण अधिक तरुण, चित्ताकर्षक, लोभस दिसणार म्हणून आतून नवी हिरवाई जाणवत असणार कां ? […]
हे आर्तपण मला वळणावळणावर भेटलंय. काही वर्षांपूर्वी ग्रेसची कॅसेट आणली होती. नंतर “निवडुंग ” ची भेट. पण त्याआधी सदर कॅसेट. तिथे एक आर्त काव्य भेटलं- […]
माणसे मुळात हरवतात का? ती हरवतात म्हणजे नेमके काय होत असते? आणि हरवण्याच्या (जगाच्या दृष्टीने) कालावधीत ही मंडळी कोठे असतात आणि काय करीत असतात? अशी हरवलेली मंडळी खरंच सापडतात का? असतील तर त्याचे पोस्टर का लागत नाही ?- ” सापडले “म्हणून ! शोधाशोध थांबली याचा आनंद नको का? एक वर्तुळ पूर्ण झाले. […]
पुर्वी जहाजं पोर्ट मध्ये गेली की दहा दहा दिवस थांबायची परंतु आता टाईम इज मनी, जहाज पोर्ट मध्ये कार्गो लोड किंवा डिस्चार्ज करण्यासाठी गेल्यावर चोवीस तासात बाहेर पडून पुढल्या सफरीवर निघतात. वेळेचे आणि त्याहीपेक्षा नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे लागते. […]
माझ्या पत्नीच्या काव्यसंग्रहाला ( ” वाटेवरच्या कविता ” ) शुभाशिर्वाद हवे होते . त्यासाठी तात्यासाहेबांखेरीज वडिलकीचे दुसरे हात कोणते? आम्ही नाशिकला गेलो. […]