नवीन लेखन...

आपली लोकशाही कुठे चाललीय?

आपल्या देशात बहुपक्षीय पद्धतीची संसदीय लोकशाही आहे. गेली ७० वर्ष लोकशाहीचा हा गाडा चाललाय. लोकशाहीत दोन महत्वाचे भाग असतात. एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष. किंबहूना विरोधी पक्षाची भुमिका लोकशाहीत जास्त महत्वाची असते. सत्ता हा विषयच असा आहे की, ती मिळाल्यावर स्खलन होण्याची शक्यता जास्त असते, मग सत्तेवर कुणीही असो. […]

सावित्रीच्या आजच्या लेकी..

स्वत:ला मोठ्या अभिमानाने ‘सावित्रिच्या लेकी’ म्हणवून घेणाऱ्या आजच्या आधुनिक स्त्रिया शिक्षणाने फक्त साक्षर झाल्या, सुशिक्षित व्हायचं मात्र विसरल्या, असं म्हटलं तर चुकू नये. मला वाटतं सावित्रीच्या कार्याचा अर्थ स्त्रियांना केवळ साक्षर करणं एवढाच नव्हता, तर त्यांना त्यांचा त्या त्या काळातील अधिकार मिळवून द्यायचा, असाही होता. हे जर आजच्या स्त्रियांना समजत नसेल, तर मग आजच्या स्त्रियांना स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असं मी समजतो. […]

देशद्रोहासम गुन्हा दाखल करा

जर कसाबवर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तर मग या पुलाच्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिका, राज्य शासन आणि रेल्वे प्रशासनातील संबंधीत अधिकारी व या विभागाचे नगरसेवक, आमदार व खासदार यांच्यावर देशातील निरपराध नागरीकांच्यी जिविताविरुद्ध संगनमताने कट रचल्याचा गुन्हा का दाखल होऊ नये? देशाच्या नागरीकांविरुद्धचा कटाचा गुन्हा, देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखाच मानला जावा. […]

शबरीमलाच्या निमित्ताने..

शबरीमालाच कशाला, आपल्या प्रत्येक रूढी-प्रथा-परंपरा या का आणि कधी अस्तित्वात आल्या, त्या त्याकाळची समाज व्यवस्था, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती आणि त्यातील किती परंपरा आता सुरु ठेवायला हव्यात आणि कालानुरूप त्यात बदल करावेत की नाही ह्याची कल्पना अभ्यासांती प्रत्येकाला येऊ शकेल. हा अभ्यास केवळ हिन्दूंनीच करावा असं माझं म्हणणं नाही. आपल्या देशातील सर्वच धर्म-पंथाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे. […]

पुन्हा नव्याने 

सगळंच विसरुन मागचं जगेन  म्हणतो नव्याने मलाच मी ओळखेन पुन्हा मी नव्याने — श्रीकांत पेटकर कौशल 

आहे मनोहर तरी.. (भाग तिसरा)

पुढच्या काही महिन्यात भाजप, भाजपचे वाचाळ नेते, भाजपशी संबंधीत संघटना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल मिडियावरील भाजप भक्त यांना अावर घातलेला दिसला नाही, तर मग ‘नोटा’ च्या प्रमाणात वाढ होणार हे निश्चित..! ह्याचे परिणाम अर्थातच भाजपलाच भोगावे लागणार, कारण ‘नोटा’चा पर्याय वापरणारे बहुसंख्य भाजपचे मतदार आहेत आणि ते ‘नोटा’ वापरून आपला निषेध नोंदवतायत, असं मी माझ्यावरून समजतो. […]

शबरीमला….. अस्वस्थ वर्तमान..

केरळातल्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश असावा की नसावा यावरुन देशात युद्धसदृष परिस्थिती आहे. स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाही, ही काही कालच घडलेली घटना नाही. गेली ८०० वर्ष ही प्रथा सुरू आहे. अधे मध्ये ह्या प्रथेला किरकोळ विरोध व्हायचा, पण पूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटलेले माझ्या स्मरणात नाहीत. मग आताच अशी बेबंद परिस्थिती निर्माण होणं हा निवडणुकांच्या मोसमात काही किंवा सर्वच राजकारणी पक्षांच्या स्वार्थाचा भाग आहे, हे ओळखणं अवघड नाही. […]

आहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)

मोदी सरकारचा जनाधारावर येत्या निवडणुकीत ‘नोटा’ परिणाम करेल, असं मला वाटतं, त्याचं मला वाटणारं सर्वात पहिलं कारण म्हणजे, स्थानिक पातळीवरचा भ्रष्टाचार आणि त्यात लोकप्रतिनिधींचा असलेला अप्रत्यक्ष सहभाग. […]

आहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)

भाजपच्या चौखूर उधळलेल्या वारूला खीळ बसली ती नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थानसहीतच्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकालांनी. ह्या हिंदी पट्ट्यात झालेल्या निवडणुकांत तीन राज्यांमध्ये भाजपने सत्ता गमावली. भाजपच्या या राज्यांतील पराभंवामागे त्या त्या राज्य सरकारांचा कारभार, अँटी इनकॅबन्सी इत्यादी काही कारणांप्रमाणे मतदारांनी ‘नोटां’चा केलेला प्रभावी वापर हे देखील एक कारण आहे. […]

मराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं ?

हा लेख स्वत:च्या व इतरांच्या जातीकडे त्रयस्थ नजरेतून पाहाणाऱ्यांसाठी आहे. इतरांनी वाचून स्वत:ला त्रास करुन घेऊ नये आणि जातीविरहित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या माझ्यासहीत इतरांनाही त्रास देऊ नये ही विनंती. […]

1 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..