कृषी, शेतीविषयक माहिती, घडामोडी यावरील लेखन

उर्जेचा एकच स्त्रोत, फक्त्त अणुउर्जा का?

उर्जेचा प्रश्न सोडविण्याच्या नादात स्थानिकांचे दैनंदिन जीवन भकास आणि उजाड होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. अणुऊर्जानिर्मिती प्रक्रियेत हवा, पाणी, आणि पर्यावरण प्रदूषणासकट काही वेळा वैचारिक प्रदूषण होऊन स्थानिकांस व पोटापाण्याच्या व्यवसायास बाधा पोहोचार नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. जपानसारखी परिस्थिती निमार्ण झाल्यास त्याला कसे तोंड देणार? ह्यासाठी प्रकल्पा नजीकच्या नागरिकांचे जीवन सुरक्षित असणे गरजेचे आहे.
[…]

श्री प्रभाकर देवधर, यांचा ‘अणुउर्जा प्रकल्पांना विरोधाची महत्वाची कारणे”

पत्रात आपण आपले परखड आणि प्रांजळ विचार मांडून सरकारचे कुठे चुकते, कसा भ्रष्टाचार होतो, कसे चुकीचे निर्णय घेतले जातात, अणुउर्जेपेक्षा सौर उर्जा कशी स्वत आहे, सौर उर्जेचा वापर केल्याने वीज कशी स्वत मिळू शकते, निसर्गाचा पर्यायाने वातावरणातील तापमानाचा आणि पर्यावरणाचे रक्षण कसे चांगल्या रीतीने करता येते, विजेची बचत म्हणजेच वीज निर्मिती याचे विश्लेषण खुपच चांगल्या रीतीने केले आहे.
[…]

तलाठ्याची नोंदवही..!

आपल्या प्रत्येकाला कधी जमिनीचे, राहायच्या जागेचे, किंवा गावाच्या शेती संबंधित व्यवहारासाठी गावाच्या तलाठ्याकडे तर कधी तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कचेरीत जाण्याची वेळ येते. अश्या कार्यालयीन कामकाजात बर्‍याच वेळा ७/१२ (सात बारा), गाव नमुना किंवा हक्काचे पत्रक किंवा गाव नमुना नंबर ६ (फेरफार) असे शब्द वारंवार कानावर पडतात पण त्याचा अर्थ लागत नाही.
[…]

शेवाळ्यापासून प्रथिन समृद्ध अन्न !

मानवाने निसर्गावर सातत्याने केलेल्या कुरघोडीने ऋतुमानात बदल होत आहेत. कुठे जास्त पाऊस पडून ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते तर काही ठिकाणी पाऊस कमी पडून कोरडया दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना दाहीदिशा भटकंती करावी लागते.
[…]

आळींबी (मशरूम) एक बहुविध औषधी भाजी

विविध आजारांवर रामबाण औषध असलेले आळींबी (मशरूम) हे बुरशीजन्य पिक आहे. महाराष्ट्राच्या वैदर्भीय जंगलांमध्ये नैसर्गिकरीत्या उगवणारी आळींबी (मशरूम)अत्यंत चवदार असते. शेतातील टाकाऊ संसाधनांचा वापर करून निर्यातक्षम आळींबी (मशरूम)चे उत्पादन करणे शक्य आहे.
[…]

पेढांब्यात सामुहिक शेतीचा यशस्वी प्रयोग !

सर्वांनी मिळून २००६ मध्ये ‘श्री सत्यनारायण केळी प्रकल्प’ हाती घेतला. ५० एकर क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्याचा निश्चय करण्यात आला. त्यापैकी ३० एकर या शेतकऱ्यांच्या मालकिची तर २० एकर मुंबईला राहणाऱ्या नातेवाईकांकडून भाडेपट्टयावर घेतलेली होती. ही सर्व जमीन पडीक स्वरूपाची होती. प्रारंभी शेतीच्या यशाविषयी अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या.
[…]

इलेक्ट्रिकल इंजिनिअरची दुग्धव्यवसायात क्रांती!

नोकरीच्या मागे न लागता स्वमेहनतीने बेसखेडा जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्री रवी पाटील या होतकरु तरुणाने दुग्धव्यवसायात क्रांती घडविली आहे. पुणे येथील एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘चॅलेंज’ म्हणून त्याने दुग्धव्यवसाय स्विकारला आणि यशस्वीही करुन दाखविला. कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता परिश्रमाने या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करुन जिल्ह्यातील युवकांसाठी तो आदर्श ठरला आहे. कुटूंबाने शेतकरी असलेल्या या युवकाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देऊन ही किमया साधली आहे.
[…]

कोकणचा मेवा – भाग १

आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे… कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते.
[…]

कोकणचा मेवा – भाग २

रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदेही पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो. कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात […]

गुणसंपन्न बोर

शुष्क, कोरड्या, पडीक जमिनीवर वाढणारी बोर आणि रुई यांच्यासारखी झाडं अनेक गुणांनी समृद्ध असतात.
[…]

1 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..