नवीन लेखन...

ट्रॅक्टर

आजकाल शेतीच्या कामासाठी बैलजोडीपेक्षा ट्रक्टरचा वापर खूपच वाढला आहे आणि ते योग्यही आहे. ट्रक्टरच्या सहाय्याने नांगरट, काकऱ्या घालणे, जमीन भुसभुशीत करणे, जमीन सपाटीकरण, पेरणी करणे, आंतरमशागत करणे, मालाची वाहतूक करणे इ. कामे सुलभरीत्या, दर्जेदारपणे, कमी वेळेत, वेळेवर आणि कमी त्रासात तसेच कमी खर्चात होऊ शकतात. किंबहुना शेती व्यवसायाच्या भरभराटीत ट्रक्टरचे स्थान फार महत्वाचे आहे. शेती व्यवसायाला ट्रक्टर हे वरदान आहे. हे कृषीयंत्र बैलजोडी सांभाळण्यापेक्षा शेती व्यवसायात सर्व दृष्टीने परवडण्यासारखे आहे.

अर्थात, ट्रक्टर विकत घेताना निरनिराळ्या कंपन्यांच्या जाहिरातीला बळी न पडता अभ्यासांती अनुभव जमेला धरावा आणि गुणवत्ता, दर्जेदारपणा आदी आवश्यक असणाऱ्या ट्रक्टरची निवड करावी. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, पडताळणी करून तो विकत घ्यावा. कारण तो घेण्यासाठी फार मोठे भांडवल गुंतवावे लागते.

विशेषतः आवश्यक असतील तेवढी सुरुवातीला ट्रक्टरचालीत औजारे घ्यावीत म्हणजे अडचणी येत नाहीत. नंतर मात्र सवडीने जशी जमतील तशी इतर औजारे घ्यावीत. ट्रक्टर औजारासाहित स्वयंपूर्ण असणे कधीही चांगले. घेतलेला (खूप भांडवल घालून) ट्रक्टर सुलभतेने चालवा. त्याची कार्यक्षमता कमीत कमी १०-१५ वर्षे टिकून राहायला हवी. आपण ट्रक्टरची योग्य प्रकारे काळजी घ्यावी.

ट्रक्टर काम झाल्यानंतर उन – पाऊस यांपासून सुरक्षित अशा जागी निवाऱ्याला ठेवावा. काम झाल्यानंतर धूळ, चिखल अगर काडीकचरा काढून स्वच्छ करावा. ट्रक्टर नेहमी एकहाती असावा. ड्रायव्हर सारखे बदलू नयेत आणि ट्रक्टर चालू करण्यापूर्वी काही गोष्टी काळजीपूर्वक करायला हव्यात.अगदी पहिली गोष्ट म्हणजे इंजिनटाकीतले तेल पुरेसे आहे कि नाही ते पाहावे. पाम्पामधले वंगण / तेल डीप स्टीकच्या सहाय्याने तपासावे. रेडीएटरमधील पाणी कमी झाले असेल तर ते भरावे. एअर क्लीनर स्वच्छ करावा. ट्रान्स्मिशन ऑईल डीपस्टीकच्या सहाय्याने तपासावे. टायरमधला हवेचा दाब योग्य आहे ना याची खात्री करावी. (पुढच्या चाकात ०.८ ते १.९ आणि मागच्या चाकात १,५ ते २.५ केजी सें. मी. असावा.) फॅनबेल्ट तपासावा. ज्या ठिकाणी ग्रीस लागते असे भाग तपासावेत. महत्वाचे नट आणि बोल्ट तपासावेत. बॅटरीमधल्या पाण्याची पातळी योग्य आहे कि नाही ते तपासावे. इ. गोष्टी पाहून खात्री करून मगच किल्ली फिरवून ट्रक्टर चालू करावा.

ट्रक्टर चालू करताना पहिल्यांदा इंधनकॉक चालू करावा. गिअर शिफ्ट लिव्हर आणि पिटीओ लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावा. थ्रोटल लिव्हर तीनचतुर्थांश जागेवर ठेवावी. क्लच दाबून ट्रक्टरची चावी ऑनच्या बाजूने फिरवावी. अशा पद्धतीने ट्रक्टर चालू करावा. ट्रक्टर बंद करताना थ्रोटल लिव्हर ओढावी आणि इंजिनची गती कमी करावी. क्लच पेडल दाबावे. गिअर शिफ्ट लिव्हर न्युट्रल पोझिशनला ठेवावी. मेन स्वीच ऑफच्या बाजूला फिरवावे. गरज असेल तर पार्किंग ब्रेक लावावेत.

ट्रक्टर चालू असताना अचानक वेगळा आणि साधारण आवाज ऐकू येऊ लागला कि ट्रक्टर थांबवून त्याचे कारण शोधावे. जर इंजनातून सतत काळा धूर निघत असेल तर त्यावरचा भर कमी करावा. ट्रक्टर गतीमध्ये असताना त्वरित गिअर बदलू नये. ट्रक्टरमागे घेताना औजारे जोडताना आपण दक्षता घ्यावी. ड्राबर पट्टी अगर औजारांवर उभे राहू नये. नेहेमी क्लच हळुवार सोडवा. रोडवर चालवताना दोन्ही चाकांना ब्रेक लागतो का नाही ते तपासावे. उतारावरून जाताना नेहेमी ट्रक्टर गिअरमध्ये असावा. वळणावर ब्रेक दाबताना गती कमी करावी. पुली गतीत असताना बेल्ट लावू अगर काढू नये.

मॅन्युअलप्रमाणे ट्रक्टरच्या सर्व्हिसिंग करून घ्याव्यात. काही तास कामाचे झाले की सुचनेनुसार फिटरकडून ट्रक्टरची देखभाल करून घ्यावी. म्हणजे पुढे भविष्यात एखादा मेजर घोटाळा होत नाही. ट्रक्टर यंत्राची आपण जशीन काळजी घेऊ तसा तो आपल्याला साथ देईल. अलीकडे ट्रक्टरनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सुधारणा केल्यात. सुविधा निर्माण केल्यात. त्यामुळे ट्रक्टरची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते आणि त्यामुळेच देखभालीकडे जास्त लक्ष देण्याची गरज पडते. मॅन्युअलचा अभ्यास करून या महागड्या पण उपयुक्त यंत्राची देखभाल सतत ठेवावी.

Vasant Charmal
Krushi – Sheti
Schedule – 26 oct 16 – 17:00
Search for a photo of tractor and use it

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..