कृषी, शेतीविषयक माहिती, घडामोडी यावरील लेखन

हा जुगार तुम्ही खेळून बघा !

शेतकरी दरवर्षी जुगार खेळतात. हाती असेल नसेल तितके शेतीत गुंतवतात, पाऊस-पाणी चांगले झाले, पिकांना थोडा बरा भाव मिळाला, तर किमान गुंतविले तितके तरी वापस येण्याची आशा असते, नफा हा प्रकार तर त्यांच्यासाठी बादच आहे आणि निसर्गाने दगा दिला, तर होत्याचे नव्हते होऊन तो भिकेकंगाल होतो. परत पुढच्या वर्षी कर्ज काढून असाच जुगार खेळला जातो, एक दिवस […]

न्याय मिळेल का न्याय?

या देशाच्या संविधानाने सामान्य लोकांना न्याय देणारे अनेक कायदे, नियम तयार केले आहेत, त्यांचे प्रामाणिकपणे पालन झाले, तरी अनेक पीडितांना सहज न्याय मिळू शकेल; परंतु हे कायदे, नियम बासनात गुंडाळून नोकरशाही आपली समांतर न्यायव्यवस्था चालविते आणि त्यात लाच दिल्याखेरीज कोणतेही काम होत नाही. खरेतर ही अनागोंदी संपविण्याचे काम निस्वार्थी, नि:स्पृह आणि धाडसी राजकीय नेतृत्वच करू शकते. […]

बळीराजा की बळीचा बकरा?

भारतासारख्या “कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणार्‍या” देशात आज शेतकर्‍यांची जी भयानक अवस्था “मायबाप सरकार” नावाच्या व्यवस्थेने करुन ठेवली आहे त्यामुळे त्याला थेट आत्महत्येचाच मार्ग अवलंबायला लागला आहे. भारत “कृषीप्रधान” वगैरे असता तर आज शेतकरी राजासारखा राहिला असता. मात्र या “कृषीप्रधान” देशाची अवस्था गेल्या काही वर्षात “दलालप्रधान” करुन ठेवण्यात आमच्या राज्यकर्त्यांचा मोलाचा हातभार आहे. […]

शेतकर्‍यांना ‘येलो जर्नालिझम’ची डागणी

सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर ‘येलो जर्नालिझम’च्या माध्यमातून डागण्या ठेवल्या जात आहेत, शेतीचा अभ्यास न करता काहीजण, वड्याचं तेल वांग्याला, वांग्याचं वड्याला लावून लिहितायत, शेतकरी आणि शेती पुढील हे नवं संकट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या वृत्तपत्रांनी आणीबाणीच्या काळातही कुणासमोर झुकण्याची भूमिका घेतलेली नाही, अशा वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे लिहलं जातंय. हा हट्टहास का केला जात आहे? हा […]

डाळींबाची आकाशझेप

दुष्काळ म्हटल्यावर डोक्यावर हंडे घेऊन वणवण फिरणाऱ्या स्त्रिया, जमिनीला पडलेल्या मोठ्या भेगा, खोल गेलेल्या विहिरी असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. आपला देश कृषीप्रधान आहे, म्हणूनच आपल्या शेतकऱ्यांना मौसमी पावसावर अवलंबून राहावं लागतं. प्रतिकूल परिस्थितीतही माणूस बरंच काही शिकत असतो. बुलढाणा जिल्हातील ज्ञानेश्वर गायकवाड या एका यशस्वी शेतकऱ्याची ही कथा. बुलढाणा हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा. गायकवाड कुटुंबाची […]

कर्ज धरतीचे – अन्न (आपले भोजन)

खाण्याचे सर्व पदार्थ अन्न, भाज्या,फळे इत्यादी आपल्याला जमिनीतून मिळते, हे जमिनीचे कर्ज आहे आणि आपल्याला हे कर्ज फेडणे गरजेचे आहे. असे नाही केले तर जमीन ही आपल्यला शाश्वत व निरंतर करण्यास असमर्थ ठरेल. दुसर्‍या शब्दात बँकेप्रमाणे तिचे ही दिवाळे निघेल. हे सोपं आणि सरळ गणित आहे.
[…]

भविष्यात कृमी-कीटक खाण्याची वेळ कोणावर न येवो !

रोज वाढणार्‍या लोकसंख्येचे प्रमाण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे अल्प प्रमाण यापुढे मागणी-पुरवठ्याचे व्यस्त गणित भूक, कुपोषण आणि प्रदूषणावर मात करण्यास असमर्थ ठरणार आहेत. येणार्‍या काळात वाढत्या लोकसंख्येला आळा घातला नाही तर माणसाला जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोत कमी पडतील.
[…]

उर्जेचा एकच स्त्रोत, फक्त्त अणुउर्जा का?

उर्जेचा प्रश्न सोडविण्याच्या नादात स्थानिकांचे दैनंदिन जीवन भकास आणि उजाड होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. अणुऊर्जानिर्मिती प्रक्रियेत हवा, पाणी, आणि पर्यावरण प्रदूषणासकट काही वेळा वैचारिक प्रदूषण होऊन स्थानिकांस व पोटापाण्याच्या व्यवसायास बाधा पोहोचार नाही याचा विचार होणे गरजेचे आहे. जपानसारखी परिस्थिती निमार्ण झाल्यास त्याला कसे तोंड देणार? ह्यासाठी प्रकल्पा नजीकच्या नागरिकांचे जीवन सुरक्षित असणे गरजेचे आहे.
[…]

श्री प्रभाकर देवधर, यांचा ‘अणुउर्जा प्रकल्पांना विरोधाची महत्वाची कारणे”

पत्रात आपण आपले परखड आणि प्रांजळ विचार मांडून सरकारचे कुठे चुकते, कसा भ्रष्टाचार होतो, कसे चुकीचे निर्णय घेतले जातात, अणुउर्जेपेक्षा सौर उर्जा कशी स्वत आहे, सौर उर्जेचा वापर केल्याने वीज कशी स्वत मिळू शकते, निसर्गाचा पर्यायाने वातावरणातील तापमानाचा आणि पर्यावरणाचे रक्षण कसे चांगल्या रीतीने करता येते, विजेची बचत म्हणजेच वीज निर्मिती याचे विश्लेषण खुपच चांगल्या रीतीने केले आहे.
[…]

1 7 8 9 10 11